जागतिक बॅंक पुरस्कृत राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामधे महाराष्ट्रास अव्वल क्रमांक
राज्यामध्ये राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सन 2016 पासून राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये विविध तांत्रिक बाबींवर आधारित प्रकल्प राबविण्यात येत असून देशा मधले काही नावीन्यपूर्ण उपक्रम जसे की 336 निरीक्षण विहिरींवरती स्वयंचलित संयंत्र बसवणे, मोबाईल व्हॅन द्वारे जलधर क्षमता चाचणीची माहिती प्राप्त करणे, राज्य भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राची उभारणी करणे, सर्वंकष शास्त्रीय बाबींची पायाभूत माहिती आधारे निर्णय आधार प्रणाली विकसित करणे इत्यादी उपक्रम हाती राबविण्यात आलेले आहेत. याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे असा आहे. राज्याच्या भूजल संपत्तीचं संरक्षण संवर्धन होण्ययाकरिता हा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक बँकेने हैदराबाद येथे दि.१७/०४/२०२३ रोजी झालेल्या आढावा मिशन मध्ये राज्याचे भूजल आयुक्त श्री. चिंतामणी जोशी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामधे देशातील राज्य व केंद्र शासनाच्या एकूण 49 अंमलबजावणी यंत्रणा आहेत. सन 2021 मधे 33 व्या क्रमांकावर असतांना गेल्या एक वर्षभरामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रमवारीतील मुल्यांकनामधे महाराष्ट्रास अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील तसेच प्रधान सचिव श्री संजीव जयस्वाल यांनी सदर प्रकल्पास बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य करुन गती दिली. राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प हा अंतिम टप्प्यात असून पुढील टप्प्यामध्ये प्रकल्पाची वाटचाल होत आहे. याकरिता अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प तसेच आधुनिक तंत्रज्ञान व प्रणालीवर आधारित जसे की कृत्रिम बुद्धिमत्ता, IoT इ. काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती श्री. चिंतामणी जोशी यांनी या ठिकाणी दिली. ग्रामीण भागासोबतच शहरी भागात देखील भूजलाच्या व्यवस्थापनाकरिता या प्रणालीमध्ये समावेश करणे आवश्यक असल्याचे मत पुरस्कार घेतेवेळी जोशी यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.