भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणारा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम- व्याप्ती :-
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ज्या वाड्या / वस्त्या विंधणविहीरीवर अवलंबून आहेत अशा वाड्या / वस्त्यांकरीता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या नियंत्रणाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या अधिनस्त यंत्रणेमार्फत (उप अभियंता (यां), यांत्रिकी उपविभाग, जि.प.मार्फत) सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. तसेच डोंगरी दुर्गम भागात झऱ्यावर आधारीत लघु नळ पाणी पुरवठा योजनांही राबविण्यात येत आहेत.
विद्युत ऊर्जेवर आधारीत दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना :-
वर्ष २००९-१० पासून सदर योजना शासन निर्णय क्र. ग्रापापु-५३१०/प्र.क्र.०४/पापु-१५, दिनांक ११ जानेवारी २०१० नुसार व वर्ष २०११-१२ पासून हया योजना सुधारित शासन निर्णय क्र. ग्रापापु-५३१०/प्र.क्र.०४/पापु-१५,दिनांक २९ डिसेंबर २०११ नुसार राबविण्यात येत आहेत.यामध्ये अस्तिवातील उच्च क्षमतेच्या (२००० लि/तास) विंधन विहिरीमधील हातपंपासोबत १ अश्वशक्तीचा सिंगल फेज पाणबुडीपंप बसविण्यात आला असून या पाणबुडी विजपंपाचे पाणी ५००० लिटर क्षमतेच्या टाकीत साठवून ३० ते ४० घरांना नळ कोंडाळयाव्दारे/घरगुती नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. तसेच नजीकच्या घरांच्या छतावरील पावसाचे पाणी संकलन करुन विंधन विहिरीचे पुर्नभरण करण्यात येते.
सदरची
योजना राष्ट्रीय
ग्रामीण पेयजल
कार्यक्रमांतर्गत
व्याप्ती अंतर्गत
राबविण्यात येत
आहेत.
या
योजनेची आर्थिक
कमाल मर्यादा
रुपये २.५०
लक्ष
आहे.
सदर
कार्यक्रम जिल्हा
परिषदे अंतर्गत
उप अभियंता(यां),
यांत्रिकी
उपविभाग,
जिल्हा
परिषद या
कार्यालयामार्फत
राबविण्यात येत
आहे.राज्यामध्ये
वर्ष २००८-०९
पासून २०१६-१७
पर्यंत २९१५
विद्युत
उर्जेवर आधारीत दुहेरी पंप
नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात
आलेल्या आहेत.
यापुढे
विद्युत दुहेरीपंप योजनांऐवजी
सौर दुहेरीपंप योजना राबविण्यात
येतात.
सौर ऊर्जेवर आधारीत दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना :-
सदर योजना शासन निर्णय क्र. ग्रापापु-५३१०/प्र.क्र.२१७/पापु-१५, दिनांक २१ ऑगस्ट, २०१० व त्यानंतर शासन निर्णय क्र. पापुस्व ग्रापापु-५३१०/प्र.क्र.२१७/पापु-१५, दिनांक २९ डिसेंबर २०११ व शुध्दीपत्रक दि. १७ ऑक्टोबर २०१२ व शासन निर्णय क्रमांक लपापु-२०१६/ प्र.क्र. ०६/पापु-१५, दिनांक २१.०१.२०१६ च्या मार्गदर्शक सुचनानुसार राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत व्याप्ती अंतर्गत राबविण्यात येत आहेत.सदर योजनेमध्ये विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या १ अश्वशक्तीच्या पाणबुडीपंपा ऐवजी सौरऊर्जेवर चालणारा पाणबुडी पंप बसवून हया योजना राबविण्यात आल्या असून योजनेतील उर्वरीत बाबी संमातर आहेत.या योजनेची आर्थिक कमाल मर्यादा रुपये ५.१० लक्ष आहे. सदर कार्यक्रम जिल्हा परिषदे अंतर्गत उप अभियंता(यां), यांत्रिकी उपविभाग, जिल्हा परिषद या कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.राज्यामध्ये वर्ष २००९-१० पासून २०१६-१७ पर्यंत ३९३५ सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहेत.
भारतातील ७५% पेक्षा अधिक लोकसंख्या ही खेडयात राहते व ८५ % ग्रामीण भागाला भूजलावर आधारीत पाणी पुरवठा केला जातो. म्हणूनच ग्रामीण भागातील पाणी पुरवठयासाठी विंधण विहिरींवर इंडिया मार्क-II चा हातपंप हा महत्त्वाचा घटक आहे.आपणास विदितच आहे की, उन्हाळयात पाणी पातळी खोल गेल्यामुळे हातपंपाव्दारे पाणी उपसा करणेस अडचणी निर्माण होतात. जर पाणी पातळी हातपंपाने पाणी उपसण्याच्या मर्यादेच्या खाली म्हणजेच ३६ मी. च्या खाली गेल्यास हातपंप कार्यरत राहत नाहीत. विंधण विहिरीत ३६ मी.च्या खाली पाणी असतांनाही लोकांना पाणी पिण्यास उपलब्ध होत नाही, असे झाल्याने त्या भागात पाणी टंचाई घोषीत करण्यात येते. यामुळे ग्रामीण भागातील स्त्रियांना अडचणींना सामोरे जावे लागते.