भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | जलस्वराज्य प्रकल्प 1 व 2

जलस्वराज्य प्रकल्प 1 व 2

जलस्वराज्य कार्यक्रम संक्षिप्त टिपणी

राज्यात जागतिक बॅंकेच्या सहाय्याने जलस्वराज्य २ प्रकल्प राबविण्यात येत आहे. जलस्वराज्य - २ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीस शासन निर्णय क्र. जस्वप्र-१२१३/प्र.क्र. /पापु-, दि. ४..४ अन्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. जलस्वराज्य मधील भूजल घटकांतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत खालील  ७ उपप्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

 

)  जलधर निर्धारण व लोक सहभागातून भूजल व्यवस्थापन 

प्रकल्पांतर्गत पुणे, सातारा, अहमदनगर, जळगांव, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा या सात जिल्ह्यातील  अतिशोषित व शोषित पाणलोटांमधील ९७ गावांमध्ये जलधर निर्धारण व लोक सहभागाधारीत भूजल व्यवस्थापन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ही सर्व गावे संबंधित जिल्हाधीकाऱ्यांनी अधिसूचित केलेली असल्याने त्यांची निवड करण्यात आलेली असून या पाणलोटांतील ९७ गावांत जलधर निर्धारीत करणेत आलेले आहेत. जागतिक बँकेने निश्चित करुन दिल्याप्रमाणे निर्धारीत जलधरांचे  लोकसहभागतून भूजल व्यवस्थापन करणेत येणार आहे. या प्रकल्पांतर्गत विस्तृत भूजल सर्वेक्षणाद्वारे जलधर निर्धारण करणे, लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन आराखडा तयार करणे, कृत्रिम भूजल पुनर्भरणाच्या अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना राबविणे, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण, लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे इत्यादी बाबी प्रस्तावित आहेत. प्रकल्पाचा कालावधी सहा वर्ष असून प्रकल्पाकरीता अंदाजे रु. १०८.७७ कोटी खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाद्वारे ९७ गावातील लोकसंख्येला पिण्याचे पाणी शाश्वतपणे उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. 

भूजल व्यवस्थापन कृती आराखडा (GWMAP)

निर्धारित केलेल्या जलधराचा मागणी व पुरवठा आधारित उपाययोजना आराखडा लोकसहभागावर तयार करण्यात आलेला आहे यास भूजल व्यवस्थापन कृती आराखडा (GWMAP) असे संबोधण्यात येते. पुरवठा आधारित उपाययोजनांमध्ये जलधर निहाय उपाययोजना समाविष्ट आहेत.यामध्ये प्रामुख्याने रिचार्ज शाफट, रिचार्ज ट्रेंच, गॅबीयन बंधार, पाणी शोषक चर (WAT) तसेच सिमेंट बंधारे यांचा समावेश आहे.

      जलस्वराज्य्‍-2 अंतर्गत जिल्हयातील जलधर निहाय उपाययोजनाची स्थिती खाली देण्यात आलेली आहे.

अ.क्र.

जिल्हा

उपाययोजना संख्या

पूर्ण केलेल्या उपाययोजना संख्या

Download and Open Geo tagging kmz file with Google Earth

1

पुणे        

 3383

3034

 Pune-Google earth link

2

सातारा     

 173

173

 Satara - Google earth link

3

अहमदनगर 

 304

304

 Ahmednagar- Google earth link

4

जळगाव    

 264

261

 Jalgaon - Google earth link

5

औरंगाबाद  

 165

153

 A'bad - Google earth link

6

अमरावती  

 129

129

 Amravati - Google earth link

7

बुलढाणा   

 546

537

 Buldhana - Google earth link

 

 एकूण

4964

4591

 

 

तसेच या सर्व उपाययोजना (Geo tagging)‍ ‍करण्यात येत असून जलधरापुढे दिलेल्या लिंकवरती पाहू शकता या करीता   GoogleEarth ही संगणक प्रणाली  आपल्या संगणकावर अपलोड करणे आवश्यक आहे. 

   ) पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाडया / वस्त्यांसाठी कमी खर्चाच्या रासायनीक दुषितीकरण सौम्य करण्यासाठी

       करावयाच्या उपाययोजना

पाणी पुरवठा व स्वच्छता संस्थेद्वारे करण्यात आलेल्या पुणे, सातारा, अहमदनगर, जळगांव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, रायगड व रत्नागिरी या  जिल्हयातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या रासायनिक पृथ:करणाच्या अहवालानुसार टी.डी.एस. व फ्लोराईड द्वारा बाधीत वाडी / वस्त्यां पैकी वाड्या / वस्त्यां मध्ये शुध्द व स्वच्छ पेयजलाचा पुरवठा करणेसाठी बाधीत नसलेल्या स्रोतातून वाढीव पाणी पुरवठा करणे/ विरळीकरणद्वारे कृत्रिम भूजल पुनर्भरण करुन गुणवत्ता सुधारणे/ आर ओ सयंत्र बसविणे अथवा नॅनो टेकनॉलॅाजीचा वापर करुन पाणी शुध्द करणे/नविन स्रोत विकसीत करुन देणे प्रस्तावित आहे. प्रकल्पावर अंदाजे रु ८२.५० कोटी खर्च अपेक्षित आहे.

 

  ३) पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाईग्रस्त गावे / वाड्या / वस्त्यांसाठी करावयाच्या उपाययोजना

पाणी पुरवठा व स्वच्छता संस्थेद्वारे करण्यात आलेल्या पुणे, सातारा, अहमदनगर, जळगांव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, रायगड व रत्नागिरी या  जिल्हयातील कमी लोकंख्येची टंचाईग्रत गावे / वाड्या / वस्त्यांना टंचाई कालावधीसाठी शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रकल्पा मध्ये टंचाई कालावधीत शुध्द व स्वच्छ पेयजलाचा पुरवठा करणेसाठी प्रामुख्याने भूजल, झरे अथवा पर्जन्यावर आधारीत साठवण टाक्या, अस्तित्वातील न. पा. पू. चे पुनर्जीवन अथवा स्रोत बळकटीकरण योजना राबविणे प्रस्तावित आहे. प्रकल्पावर अंदाजे रु  . कोटी खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात मिळून वाड्या / वस्त्यां हाताळण्यासाठी अंतिम करणेत आलेल्या आहेत.

 

         )  निरिक्षण विहिरींचे जाळे वाढविणे

राज्याचे एकूण क्षेत्रफळ विचारात घेता सध्याच्या ३८१८ निरिक्षण विहिरी व ११३६ पिझोमिटर्स यांची संख्या पुरेसी नसल्याने जलस्वराज्य  अंतर्गत राज्यातील तांत्रिकदृष्ट्या योग्य सर्व गावांमध्ये निरीक्षण विहीरी स्थापन करून जलसुरक्षकां मार्फ़त भूजल पातळी मोजमाप करण्याचे प्रस्तावित आहे. या निरिक्षण विहीरीद्वारे भूजल पातळी व भूजल गुणवत्ता तपासली जाणार आहे. या प्रकल्पाकरीताचा अपेक्षित खर्च .३७ कोटी रुपये इतका आहे.

   

    ) जलवेधशाळा बळकटीकरण

राज्यातील वेगवेगळया कृषि हवामान क्षेत्रात व प्रातिनिधीक भूगर्भीय स्थिती असणा-या क्षेत्रातील जलशास्त्रीय व भूजलशास्त्रीय परिमाणांची प्रत्यक्ष मोजणी करुन, विविध निष्कर्ष काढण्यासाठी व त्यानुसार भूजल अंदाजासाठीचे निकष निश्चित करण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प टप्पा अंतर्गत जलवेधशाळांचे बळकटीकरण करणे व तेथे स्वयंचलित हवानाम केंद्र बसविणे प्रस्तावित आहे. यावर . कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

 

         )  प्रयोगशाळा बळकटीकरण

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अधिपत्याखालील सहा विभागीय प्रयोगशाळांमार्फत पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची गुणवत्ता तपासणी केली जाते. जलस्वराज्य अंतर्गत या  विभागीय प्रयोगशाळांचे बळकटीकरण तसेच १३८ उपविभागिय व २८ जिल्हा प्रयोगशाळा स्थापित करणे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाकरीता अंदाजे रु . कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच विभागिय व जिल्हा रासायनिक प्रयोगशाळांचे राष्ट्रीय अधिस्विकृती व अधिशोषण बोर्डामार्फ़त प्रमाणीकरण करणे सुध्दा प्रस्तावित आहे.

 

          ) वेळ सापेक्ष पाणी पातळी सनियंत्रण (Real-time Groundwater level data Monitoring)

भूजल पातळीची मोजणी साठी सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील  जिल्हयात अनुक्रमे औरंगाबाद व चंद्रपूर येथे हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाद्वारे पथदर्शी स्वरुपात या दोन जिल्हयातील सर्व गावातील नव्याने स्थापन केलेल्या निरिक्षण विहीरींची पाणी पातळी दर महिन्यास / पंधरवडयास जल सुरक्षकांमार्फत मोजली जावून एस.एम.एस. द्वारे प्राप्त केली जाणार आहे. या माहितीचे देखील पृथ:करण करुन टंचाईग्रस्त भागासाठी उपाययोजना घेण्यास मदत मिळणार आहे. प्रकल्पाकरीता अंदाजे . कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

  

 

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संपर्क

मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.