निरिक्षण
विहिरींचे जाळे
राज्यात एकूण १५३१ पाणलोट क्षेत्रांमध्ये ३९२० निरिक्षण विहिरींव्दारे भूजलाचे परिक्षण व मोजमाप करण्यात येते. जलविज्ञान प्रकल्प अंतर्गत राज्यात ११३६ पिझोमिटर्सव्दारे पाण्याच्या पातळीवर सनियंत्रण करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे संकलित केलेली माहिती प्रत्येक मान्सूननंतर राज्यातील संभाव्य टंचाई क्षेत्राचे अंदाज घेण्यास उपयुक्त आहे. भूजल उपश्याचे मुल्यांकन करणे, पुनर्भरण करणे, आर्थिक संस्थाना सहाय्य करणे, शेतक-यांना कर्ज वितरणासाठी सदर माहिती अत्यंत उपयुक्त आहे.