भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | निरिक्षण विहिरींचे जाळे

Detail News

 • Detail News

  भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा मार्फत सांगली व कोल्हापुर जिल्हयातील पूरग्रस्त गावांबाबत करण्यात आलेली कार्यवाही


  प्रयोगशाळा


  सांगली जिल्ह्यात गुणवत्ता बाधीत असलेल्या पूरग्रस्त गावाची संक्षिप्त माहिती


              सांगली जिल्ह्यात प्रमुख कृष्णा वारणा नदी असुन दि.06.08.2019 रोजी या नद्यांना मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आले तसेच या दोन्ही नद्याच्या उपनद्यांमध्ये पाणलोटाच्या वरील भागातुन धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने पाणी पातळी मध्ये वाढ झाली.त्याच सोबत कर्नाटक राज्यातील आलमट्टी धरणाची पाणी पातळी वाढल्याने सांगली जिल्ह्यातुन वाहणा-या वारणा कृष्णा नदीला पुर येऊन नदी लगतच्या गावामध्ये पुर परिस्थीती निर्माण झाली त्यामुळे उथळ सखल भागात पाणी जमा झाले.त्यामुळे प्रामुख्याने चार तालुक्यातील गावे पुरबाधीत होऊन मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.पिण्याच्या पाण्याचे स्रोत पुराच्या पाण्यात ब-याच दिवस बुडालेले असल्याने जैविक दृष्ट्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत बाधीत झाल्याची शक्यता आहे.

  यात मिरज तालुक्यातील 20 गावे,सांगली मनपा क्षेत्रातील 1,वाळवा तालुक्यातील 37 गावे,शिराळा तालुक्यातील 21 गावे,पलुस तालुक्यातील 25 गावे असे एकुण 104 गावे पुराच्या पाण्याने बाधीत झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने घोषीत केले आहे.

  पुरबाधीत असलेल्या तालुक्यातील स्रोताची माहिती खालील प्रमाणे आहे .

  अ.क्र.

  तालुका

  पुरबाधीत गावे

  पुरबाधीत असलेल्या गावातील स्रोत संख्या

  वापरातील स्रोत संख्या

  1

  वाळवा

  37

  311

  259

  2

  शिराळा

  21

  158

  119

  3

  मिरज

  20

  95

  22

  4

  पलूस

  25

  78

  68

  5

  सांगली

  मनपा क्षेत्र

  1

  -

  -

  एकुण

  104

  642

  468

   

  सांगली जिल्ह्यात एकुण 10 तालुके असुन गुणवत्ता बाधीत पाणी नमुण्याच्या तपासणी करिता एकूण 4 उपविभागीय प्रयोगशाळा कार्यरत आहेत.(1.आटपाडी,2.कवठे महांकाळ,3.जत, 4.इस्लामपुर ) व 1.जिल्हा प्रयोगशाळा सांगली येथे कार्यरत आहे.

              दि.08.08.2019 रोजी नंतर पुरबाधीत असलेल्या गावातील पाणी ओसरु लाग़ल्याने पुरात बुडालेल्या पिण्याच्या पाण्याची साधणे हातपंप विहीरी यांचे पाणी गुणवत्ता तपासणी साठी इस्लामपूर उपविभागीय प्रयोगशाळा(शिराळा वाळवा तालुक्यासाठी) जिल्हा प्रयोगशाळा (मिरज पलुस तालुक्यासाठी)असे तालुक्याची विभाग़णी करुन दोन्ही प्रयोगशाळेकडे बाधीत असलेले पाणी नमुने स्विकारणे सुरुवात करुन त्याचे जैविक पृथकरण करण्यात आले.

   आज दि.28.08.2019 रोजी पर्यंत 1177 नमुने गोळा करण्यात आलेले असुन 1113 नमुने तपासण्यात आलेले आहे. त्यापैकी 131 नमुने गुणवत्ता बाधीत आल्याचे निदर्शनास आले आहे गुणवत्ता बाधीत असलेल्या स्रोताची माहिती त्यात्या संबधीत विभाग़ास पुढील योग्य कार्यवाहीसाठी कळविण्यात आलेले आहे.

  पुरग्रस्त गावातील पाणी गुणवत्ता तपासणी खालील प्रमाणे आहे.

  जिल्हा

  पुरग्रस्त तालुका

  पुरग्रस्त गावे

  गोळा केलेले नमुने संख्या

  तपासलेले नमुने संख्या

  बाधीत आलेले नमुने

  शेरा

  सांगली

  पलुस

  25

  143

  134

  37

  मनपाक्षेत्र 1 हे मिरज तालुक्यात अंतर्भूतआहे.

  मिरज

  21

  320

  286

  59

  शिराळा

  21

  173

  162

  16

  वाळवा

  37

  541

  531

  19

  एकुण

  4

  104

  1177

  1113

  131

   

   

  कोल्हापूर जिल्हयाची पुराची संक्षिप्त माहिती

   

              दिनांक 7 ऑगस्ट 2019 रोजी कोल्हापूर जिल्हयाची पावसाची सरासरी 1643 मी.मी. असून प्रत्यक्षात 1774 मी.मी. पाऊस झाल्याचे दिसून येत आहे, की जी सरासरीच्या 147% आहे. राधानगरी तालुक्यामध्ये 254 %, शिरोळ तालुक्यामध्ये 224%, शाहूवाडी तालुक्यामध्ये 191%, पन्हाळा तालुक्यामध्ये 182%, भूदरगड तालुक्यामध्ये 186%, गडहिंग्लज तालुक्यामध्ये 183%, आजरा तालुक्यामध्ये 166% इतका पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. दिनांक 4 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2019 या दरम्याने बहुतेक तालुक्यांमध्ये सातत्याने 100 मी.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे दिसून येत आहे.

          कोल्हापूर जिल्हयात प्रमुख नदी कृष्णा असून पंचगंगा, वारणा, वेदगंगा, दुधगंगा, कुंभी, कासारी, ताम्रपाणी, हिरण्यकेशी व भोगावती या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. दिनांक 6 ऑगस्ट 2019 रोजी सर्व नद्यांच्या पाणलोटात मोठया प्रमाणात पावसाची पाणी आल्याने व धरणातील विसर्ग वाढल्याने मोठया प्रमाणात या नद्यांना पूर आलेला दिसून येत आहे.

          या पुरामुळे जिल्हयातील 12 तालुक्यांमधील 345 गावे पुराने बाधित झाली. यापैकी शिरोळ, हातकणंगले, करवीर, गगनबावडा यातील 27 गावांत पाण्याचा पूर्ण वेढा पडला. यामध्ये बाधित झालेली कुटूंब संख्या 1,02,557 इतकी असून 4,07,531 लोकांना विस्थापित करावे लागले. पूरपरिस्थितीने जिल्हयातील 163 रस्ते व 107 बंधारे पाण्याखाली गेले. 528 पाणी पुरवठा योजना बाधित झाल्या. 1,05,069 हेक्टर पिकांचे क्षेत्र बाधित झाले.

                          दिनांक 16 ऑगस्ट 2019 तारखेपासून पूरबाधित क्षेत्रातील पाणी नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी येत आहेत. आज दिनांक 28.08.2019 पर्यंत 911 नमुने प्राप्त —ÖÖ»Öê असून 854 नमुन्यांची तपासणी पुर्ण करण्यात आलेली आहे. त्यापैकी 137 नमुने गुणवत्ता बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. सद्यस्थितीमध्ये नमुने कमी दिसत असले तरी येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये उर्वरीत पाणी नमुने प्राप्त करून घेणेसाठी नियोजन करण्यात आलेले आहे.

   

    

  पूरग्रस्त गावांतील पाणी गुणवत्ता तपासणी प्रपत्र

  जिल्हा कोल्हापूर

  अ.क्र.

  पूरग्रस्त तालुका

  पूरग्रस्त गावे

  गोळा केलेली नमुने संख्या

  तपासणी केलेली नमुने संख्या

  बाधित झालेले नमुने संख्या

  शेरा

  1

  आजरा

  10

  57

  47

  11

   

  2

  भूदरगड

  14

  50

  50

  5

   

  3

  चंदगड

  30

  107

  101

  17

   

  4

  गडहिंग्लज

  27

  71

  66

  8

   

  5

  गगनबावडा

  17

  34

  34

  3

   

  6

  पन्हाळा

  42

  89

  88

  14

   

  7

  करवीर

  56+1

  15

  15

  5

  कोल्हापूर मनपा 1 गाव समाविष्ट

  8

  कागल

  36

  89

  87

  22

   

  9

  हातकणंगले

  23

  63

  60

  7

   

  10

  राधानगरी

  22

  46

  45

  3

   

  11

  शाहूवाडी

  25

  60

  60

  9

   

  12

  शिरोळ

  42

  230

  201

  33

   

  एकूण

  12

  345

  911

  854

  137

   

   

  ·         जिल्हयातील प्रयोगशाळांमध्ये नमुन्यांची संख्या वाढल्याने इन्क्यूबेटर कमी असल्याने विभागीय प्रयोगशाळा,पुणे येथून तातडीने इन्क्यूबेटर जिल्हा प्रयोगशाळा कोल्हापूर येथे पाठविण्यात आले आहे.

    

  आवेधन शाखा

   

   कोल्हापूर सांगली जिल्हयातील पूरग्रस्त भागात तातडीने हातपंप/ विंधण विहीरीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत  केलेल्या कार्यवाहीचा अहवाल.

   

   

              कोल्हापूर सांगली जिल्हयात 6 ऑगस्ट 2019 पासून अतिवृष्टी महापूरामुळे मोठया प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. कोल्हापूर जिल्हयातील 12 तालुक्यात 345 गावे तर सांगली जिल्हयात 4 तालुक्यात 104 गावे पूरबाधित झाली  होतीपूरपरिस्थिती कमी होत असताना या पूरबाधित गावांना तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. पूरग्रस्त गावांमधील बाधित हातपंप/ विंधण विहीरी दुरुस्ती शुध्दिकरण करण्यासाठी  सांगली कोल्हापूर जिल्हयात पुरेशी यंत्रणा नसल्याने त्यांनी संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचेकडे मदत मागितली होतीत्यानुसार भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पूरग्रस्त भागातील हातपंप/ विंधण विहीरी तातडीने दुरुस्ती शुध्दिकरण करण्यासाठी महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील हातपंप दुरुस्ती पथके, तांत्रिक कर्मचारीवर्ग आवश्यक हातपंपाचे सुटे भाग उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच पूरबाधित गावातील पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांचे पाण्याचे नमुने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडील रासायनीक प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आले.

   

  कोल्हापूर

   

              कोल्हापूर जिल्हयात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत नागपूर, अहमदनगर, उस्मानाबाद, हिंगोली जिल्हा परिषदेकडील चार हातपंप दुरुस्ती पथके (सुटेभागांसह), 24 कर्मचारी आणि भंडारा, जिल्हा परिषदेकडून काही हातपंप सुटेभाग उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हयातील सहा पथके इतर जिल्हयातील चार पथके अशा दहा पथकांद्वारे पूर ओसरल्यानंतर पांच ते सहा दिवसात पूरबाधित 304 हातपंप / विंधण विहीरींपैकी 112 नादुरुस्त हातपंप तातडीने दुरुस्त करण्यात आले. तसेच पूरग्रस्त गावांमधील 304 पुरबाधित इतर हातपंप / विंधण विहिरींपैकी एकूण 779 हातपंप / विंधण विहिरींचे क्लोरिनेशन करुन शुध्दिकरण करण्यात आले. या तातडीच्या कार्यवाहीमुळे पुरबाधित गावांना लवकरात लवकर हातपंप / विंधण विहिरींद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उपलब्ध करुन देण्यात यश आले आहे.

   

  सांगली

   

              सांगली जिल्हयात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत  औरंगाबाद, बीड, सोलापूर आणि पुणे जिल्हा परिषदेकडील चार हातपंप दुरुस्ती पथके (सुटेभागांसह), 22 कर्मचारी आणि लातूर, जिल्हा परिषदेकडून हातपंप सुटेभाग उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामुळे सांगली जिल्हयात चार पथकांद्वारे पूर ओसरल्यानंतर आठ ते नऊ दिवसात पूरबाधित 104 गावांमधील नादुरुस्त 172 हातपंपापैकी 172 हातपंप तातडीने दुरुस्त करण्यात आले. तसेच पूरबाधित गावांमधील 554 हातपंप / विंधण विहिरींचे क्लोरिनेशन करुन शुध्दिकरण करण्यात आले. या तातडीच्या कार्यवाहीमुळे पुरबाधित गावांना लवकरात लवकर हातपंप / विंधण विहिरींद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उपलब्ध करुन देण्यात यश आले आहे

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संपर्क

मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.