-
नागपूर विभागाची संक्षिप्त माहिती
1. स्थळ निर्देश - अक्षांश 78015’ ते 80045’¯Öæ¾ÖÔ
- रेखांश 18045’ ते 21035’ˆ¢Ö¸ü.
2. क्षेत्रफळ - 50,377 चौ.कि.मी.
3. ¯ÖŸŸÖÖ - उपसंचालकांचे कार्यालय,
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा,
नागपूर विभाग,नागपूर
म.जि.प्रा.इमारत, ए विंग दुसरा माळा,
तेलंगखेडी रोड, सिव्हील लाईन्स,नागपूर
4. विभागात समाविष्ट एकूण जिल्हे,तालुके व लोकसंख्या :-
अ.क्र.
जिल्हा
जिल्ह्याचे क्षेत्रफळ (चौ.कि.मी.)
जिल्ह्यातील एकूण तालुके
एकूण गावांची संख्या
लोकसंख्या 2001 प्रमाणे (लाखात)
1.
नागपूर
9,802
13
1635
40.67
2.
वर्धा
6,309
8
911
12.37
3.
भंडारा
3,895
7
853
11.36
4.
गोंदिया
5,425
8
951
12.01
5.
चंद्रपूर
11,443
15
1791
20.71
6.
गडचिरोली
14,412
12
1680
9.70
नागपूर विभाग
51,286
63
7821
106.82
5. लागवडी योग्य क्षेत्र - 23411.64 चौ.कि.मी.
वनक्षेत्र - 18049.80 चौ.कि.मी.
6.नदी खोरे क्षेत्र-
अ.क्र.
खो-याचे नांव
क्षेत्रफळ (चौ.कि.मी.)
समाविष्ट पाणलोट संख्या
1.
वैनगंगा
27137.02
161
2.
वर्धा
14222.07
85
3.
प्राणहिता
4073.43
16
4.
इंद्रावती
5446.27
31
एकूण
50878.79
293
3. पर्जन्यमान - शाश्वत पर्जन्यमानाचा प्रदेश
विभागातील सामान्य पर्जन्यमान :
अ.क्र.
जिल्हा
सामान्य पर्जन्यामन
1.
नागपूर
994.95 मि.मी.
2.
वर्धा
920.71 मि.मी.
3.
भंडारा
1330.21 मि.मी.
4.
गोंदिया
1349.61 मि.मी.
5.
चंद्रपूर
1142.07 मि.मी.
6.
गडचिरोली
1354.78 मि.मी.
विभागीय सरासरी
1182.055 मि.मी.
विभागातील मुख्य नद्या :
नागपूर - पेंच, कोलार, कन्हान, वर्धा, वैनगंगा
वर्धा - वर्धा
भंडारा - वैनगंगा बावनथडी
गडचिरोली - गोदावरी, वैनगंगा, इंद्रावती, प्राणहिता
चंद्रपूर - वर्धा, पैनगंगा, इरई
गोंदिया - बाघ, वैनगंगा.
7. विभागातील जिल्हानिहाय पाणलोट क्षेत्र, निरिक्षण विहिरी व पिझोमिटरची संख्या
अ.क्र.
जिल्हा
एकूण पाणलोट क्षेत्र ü संख्या
एकूण निरिक्षण विहिरी संख्या
एकूण पिझोमीटर संख्या
1.
नागपूर
54
116
50
2.
वर्धा
39
112
39
3.
भंडारा
25
74
19
4.
गोंदिया
34
80
26
5.
चंद्रपूर
58
133
27
6.
गडचिरोली
83
112
48
एकूण
293
627
209
8. नागपूर विभागाची भूशास्त्रीय रचना -
अ. क्र.
जिल्हा
भूस्तराचा प्रकार
क्षेत्रफळाची टक्केवारी
समाविष्ट तालुके
1.
नागपूर
डेक्कन ट्रॅप (बेसाल्ट)
50%
नागपूर,हिंगणा,कळमेश्वर,काटोल, कुही, नरखेड,सावनेर
जलजन्य खडक (सँडस्टोन शेल)
15%
नागपूर,सावनेर,कळमेश्वर,कामठी, पारशिवनी,नरखेड,उमरेड,भिवापूर
आर्कीयन्स (ग्रॅनाईट, नाईसेस, शिस्ट इ.)
35%
नागपूर,सावनेर,रामटेक,पारशिवनी, मौदा, कामठी,उमरेड,कुही,भिवापूर
2.
वर्धा
बेसाल्ट
100%
हिंगणघाट,वर्धा, समुद्रपूर, आष्टी, सेलू, आर्वी, देवळी कारंजा
3.
भंडारा
रुपांतरीत खडक (ग्रॅनाईट,नाईसेस,शिस्ट, फिलाईट)
90%
भंडारा,मोहाडी,तुमसर,साकोली, लाखनी
वैनगंगा नदीचा गाळाचा प्रदेश (चौरास)
10%
पवनी, लाखांदूर
4.
चंद्रपूर
रुपांतरीत खडक (ग्रॅनाईट,नाईसेस,शिस्ट)
55%
मुल,नागभीड,सिंदेवाही,गोंडपिपरी, चिमुर, ब्रम्हपुरी,वरोरा,भद्रावती
जलजन्य खडक
30%
भद्रावती,चिमुर,राजुरा,नागभीड, ब्रम्हपुरी, चंद्रपूर
बेसाल्ट
10%
वरोरा, וִÉiÉÒSÉÉ काही भाग
वाळुच्या गाळाचा प्रदेश
5%
भद्रावती,चिमुर
5.
गडचिरोली
रुपांतरीत खडक
84%
गडचिरोली,आरमोरी,वडसा,धानोरा, कुरखेडा,कोर्ची,चामोर्शी,मुलचेरा, अहेरी, ऐटापल्ली,भामरागड
जलजन्य खडक
16%
सिरोंचा
6.
गोंदिया
रुपांतरीत खडक
100%
सडक अर्जुनी, सालेकसा, गोंदिया, गोरेगांव, आमगांव, तिरोडा, अ.मोरगांव, देवरी
इतिहास व संस्कृती - नागपूर विभागाचे मुख्यालय हे नागपूर स्थित आहे. नागपूर विभाग नागपूर,भंडारा,गोंदिया,वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. सहा जिल्ह्यांची संक्षिप्त माहिती खाली नमूद केली आहे.
1. नागपूर : नागपूर शहर हे भारतातील 13 व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. नाग नदीमुळे या शहराला नागपूर हे नाव देण्यात आले. भौगोलिकदृष्ट्या नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्यामुळे शहरामध्ये देशाचा मध्यबिंदु म्हणून झिरो माईलस्टोन हा स्तंभ प्रसिध्द आहे. नागपूर शहराची संत्रानगरी तसेच हिरवे शहर म्हणून सुध्दा ओळख आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी घेतल्या जाते.
नागपूर येथील दिक्षाभुमी हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतल्यामुळे धार्मिक स्थळ म्हणून जगभरात प्रसिध्द आहे.
2. वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांनी स्वतंत्रता आंदोलनाच्या दरम्यान वास्तव्य केले असून ते स्थळ बापु कुटी म्हणून ओळखल्या जाते. तसेच पवनार येथे विनोबा भावे यांचे आश्रम आहे. आष्टी तालुका इंग्रजांशी झालेल्या लढ्याकरीता प्रसिध्द आहे. यामुळे वर्धा जिल्ह्याला ऐतिहासिक महत्व आहे.
3. भंडारा : भंडारा शहराचे नाव भनारा शब्दातून उगम झालेले आहे. येथे तांब्याची भांडी तयार करण्यात येतात. तलावाचे शहर तसेच भात शेतीचे शहर म्हणून सुद्धा या शहराची ओळख आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुका येथे पवन राजाने वास्तव्य केले असल्याने पवनी तालुक्यास ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे.
4. गोंदिया : गोंदिया जिल्हा हा मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांना लागुन आहे. गोंदिया जिल्ह्यात गोंड राज्याचे राज्य होते त्यामुळे जिल्ह्याला गोंदिया हे नांव दिलेले आहे. जिल्ह्याचे 44 टक्के क्षेत्र हे जंगलाने व्यापलेले आहे. गोंदिया हे तेंदुपत्ता संकलन व बिडी उद्योगाचे मुख्य व्यापार केंद्र आहे. गोंद व लाख याचे संकलनाकरीता सुध्दा हा जिल्हा प्रसिध्द आहे.
5. चंद्रपूर : कोळशाच्या विपुल साधन संपत्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्याची ओळख ही ब्लॅक गोल्ड (काळे सोने) म्हणून सुद्धा आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा पेपरमील व सिमेंट कारखान्यांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखल्या जातो. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे व चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे समाजसेवक श्री.बाबा आमटे यांनी कृष्ठरोग्यांकरीता आनंदवन या नावाचे समाज केंद्र पर्यटनाकरीता प्रसिध्द आहे. रामाळा तलाव, तपोवन, जुनोना व अड्याळ टेकडी तसेच गोंड राजाचा किल्लाा असून महाकाली मंदिर, पार्शनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, रामदिघी मंदिर व वढा मंदिर इथले मुख्य धार्मिक पर्यटन स्थळ आहेत.
6. गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याची ओळख महाराष्ट्राचा आदिवासी जिल्हा म्हणून आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कडादेव शिवलींग मंदिर हे वैनगंगा नदीच्या काठावर स्थित असून यास ऐतिहासिक महत्व आहे. हे मंदिर प्रसिध्द राष्ट्रकुट राजाद्वारे निर्माण केल्या गेले आहे. सिरोंचा तालुक्यात सेमनुर गावाजवळ इंद्रावती, प्राणहीता व गोदावरी या तीन नद्यांचा संगम असल्यामुळे प्रेक्षणीय स्थळ म्हणून सुद्धा ओळखल्या जाते.
गडचिरोली जिल्ह्याची मुख्य वैशिष्ट येथील घनदाट जंगल व लोह खनिज संपदा आहे. जिल्ह्यात मसेली, सुरजगढ, मोरेगाव, आरमोरी व देऊळगाव येथे लोह खनिज संपदा आहे.