भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणारा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम- व्याप्ती
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ज्या वाड्या / वस्त्या विंधणविहीरीवर अवलंबून आहेत अशा वाड्या / वस्त्यांकरीता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या नियंत्रणाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या अधिनस्त यंत्रणेमार्फत (उप अभियंता (यां), यांत्रिकी उपविभाग, जि.प.मार्फत) सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. तसेच डोंगरी दुर्गम भागात झऱ्यावर आधारीत लघु नळ पाणी पुरवठा योजनांही राबविण्यात येत आहेत.