भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | विस्तृत भूजल सर्वेक्षण

विस्तृत भूजल सर्वेक्षण

विस्तृत भूजल सर्वेक्षण

ग्रामिणस्तरावर भूजलाचा विस्तृत अभ्यास १:१०००० या नकाशाव्दारे या विभागाने केलेले आहे. ही योजना १९७३ पासून सुरु केलेली आहे. भूजलाचे मुल्यमापन करण्यासाठी, विहिरींचे मोजमाप, भूशास्त्रीय अभ्यास, जलधारकाची क्षमता चाचणी, हिवाळी व उन्हाळी भूजल पातळीचे नकाशे तयार केलेले आहेत. या योजनेंतर्गत १,७६,१२५ चौ.कि. क्षेत्रफळ व २५१५२ गावासाठी भूजल शास्त्रीय नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. वैयक्तिक शेतकरी, नळ पाणी पुरवठा योजनांसाठी, कृत्रिम भूजल पुनर्भरणासाठी तसेच जलसंवर्धन इत्यादी साठी सदर नकाशे अत्यंत उपयुक्त आहेत.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | संपर्क

मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.