भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा | स्त्रोत बळकटीकरणाच्या उपाय योजना

स्त्रोत बळकटीकरणाच्या उपाय योजना

स्त्रोत बळकटीकरणाच्या अपारंपारीक उपाय योजना :-

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडुन अपारंपारीक योजनांचा वापर करुन अस्तित्वातील भूजल स्त्रोतांचे बळकटीकरण करुन त्याची क्षमता वाढविण्यासाठी खालील योजना राबविण्यात येतात.


.

फ्रॅक्चर सिल सिमटेशन (एफ.एस.सी.)

१००१

२.

जॅकेटवेल टेक्नीक (जे. डब्ल्यु.टी.)

६४१

३.

बोअर ब्लास्ट टेक्नीक (बी.बी.टी.)

५४९

४.

जलियभंजन (. एफ.)

१९८४९


फ्रॅक्चर सिल सिमेंटेशन :-

            भूशास्त्रीय आणि भौगोलिक परिस्थितीप्रमाणे, काही स्थळी नाल्याचे खालील प्रस्तरातून सतत भूजल वहन होत असते. त्यामुळे नाल्याचे बाजूस असलेल्या उद्भव विहिरीस आवश्यक प्रमाणात पाणी उन्हाळयापर्यंत उपलब्ध राहत नाही. भूजलाचे वहन रोखल्यास, हे वाहून जाणारे भूजल, विहिरी नजिकचे परिसरात साठून राहून विहिरीत आवश्यकतेप्रमाणे पाझरते आणि पर्यायाने पाण्याच्या साठयात वाढ होण्यास मदत होते.प्रस्तुत, प्रकल्पांतर्गत उद्भव विहिरींच्या खालच्या बाजूस ठराविक अंतरावर नाल्याच्या पात्रात पक्क्या प्रस्तरापर्यंतच्या खोलीची विंधण छिद्रे घेण्यात येतात. सदर विंधण छिद्रात उच्च दाबाने सिमेंटचे द्रावण सोडण्यात येते, जॅकेटवेल भूप्रस्तरातील भेगा सांधे सिमेंटमुळे बूजविले जावून भूपृष्ठाखाली भूमिगत बंधा-यासदृष्य जलावरोधी भिंत तयार होते, त्यामुळे भूजल साठयात वृध्दी होते.जॅकेटवेल:-

नळ पाणी पुरवठा योजनेच्या उद्भवाची स्थिती, त्या भागातील भूस्तरावर अवलंबून असते. भूपृष्ठाखालील सच्छिद्र पाषाणस्तर पाणी साठून ठेवतात आणि भेगा, फटी, सांधे असलेले प्रस्तर हे भूजल वाहून नेण्यासाठी मदत करतात. उद्भव विहिरी भोवतीच्या परिसरात नैसर्गिक प्रक्रियेमुळे अशा प्रकारची अनुकूल भूशास्त्रीय परिस्थिती असल्यास, भूजल पुनर्भरण प्रक्रियेने विहिरीस पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध राहते. मात्र काही ठिकाणी खडकातील सच्छिद्रता मुळातच कमी असते, तसेच भेगा किंवा फटी एकमेकांशी नैसर्गिकरित्या जोडल्या गेलेल्या नसतात, त्यामुळे पाण्याचा साठा आणि वहन प्रक्रिया मंदावते. परिणामत: उद्भव विहिरीस पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही आणि कालपरत्वे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते.