GSDAGSDAGSDA

आवेदनाचे दर

  • Home
  • आवेदनाचे दर

वर्ष 2022-23 विंधण विहिर कार्यक्रमासाठी विंधण यंत्रामार्फत करावयाच्या कामाचे व  दनुषंगिक बाबींचे दर

सर्वसाधारण सुचना

  1. सदर दर हे पुढील एक वर्षापर्यंत किंवा नव्याने दर निश्चित होईपर्यंत लागू राहतील.
  2. कूपनलिका / विंधण विहीरींमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शक सुचना, शासन परिपत्रक क्रमांक आपना 1008/प्र.क्र. 43 / पापु-15 पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई दिनांक 5 मे, 2009 अन्वये निर्गमीत केल्या आहेत. तसेच मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील जनहित याचिका क्र. 36/2009 Measures for prevention of fatal accidents of small children due to their falling in Abandoned Borewell and Tubewells या विषयी दिनांक 02.2010 रोजी दिलेल्या निर्णयानूसार कार्यवाही करणे अनिवार्य राहील.
  3. शासन शुध्दीपत्रक क्र. आपना 3700/प्र.क्र. 981 / पापु-15, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई दिनांक 31 जूलै, 2000 नूसार भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधूदूर्ग या जिल्हयांसाठी तसेच धडगाव व अक्कलकुवा या अतिदुर्गम तालुक्यातील आवेधन कामासाठी साहित्याची किंमत वगळून फक्त मजूरीचे बाबींकरीता मान्य दरांपेक्षा 10% अधिक रक्कम देय राहील.
  4. विंधण विहीर खोदकाम व तदनुषंगिक बाबींचे दर निश्चितीकरिता एच. एस. डिझेल, एम. एस. एच. आर. कॉईल इत्यांदींचे बाजारातील सध्याचे प्रचलित दर आधारभूत धरले आहेत. सदर दरामध्ये 10% च्या पूढे चढ अथवा उतार झाल्यास नव्याने दर निश्चित करणेबाबत विचार केला जाईल.
  5. सदर दर हे जी. एस. टी. धरून आहेत. यामध्ये कामगार कल्याण निधी, विमा इ. बाबींचा समावेश नाही.
  6. हे दर रिचार्ज शाफट अथवा इतर अंदाजपत्रकात वापरल्यास ते जी. एस. टी. सहीत आहेत. त्यावर पून्हा जी. एस. टी. देण्यात येऊ नये.

कंत्राटदार नेमताना आवश्यक अटी व शर्ती —

  1. विंधण यंत्र धारकाशीच (मालकाशीच) करारनामा करावा. आवश्यकतेनूसार पात्र कंत्राटदारांचा पॅनल तयार करुन जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजनेतून घेण्यात येणाऱ्या विंधण विहीरींची कामे पॅनल मधील कंत्राटदारांकडून गुणवत्तापुर्वक करुन घ्यावीत. ग्राम पंचायतींनी अथवा विविध योजने अंतर्गत केलेल्या कामाच्या गुणवत्तेची तपासणी उप अभियंता (यां) कार्यालयाकडील अभियंत्यांकडून करुन घेण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील विविध योजनेतंर्गत करावयाच्या विंधण विहीर खोदाईची कामे उपअभियंता(यां), यांत्रिकी उपविभाग या कार्यालयामार्फ़त या कार्यालयामार्फ़त घेण्यात यावीत.
  2. जिल्हा परिषद व भू.स.वि.यं.कडील विंधण विहीरी / रिचार्ज शाफट / अपांरपारिक उपाययोजना इ. साठी विंधण यंत्रे भाडयाने लावणेसाठी करारनामे करणेपूर्वी विंधणयंत्र सुस्थितीत असलेबाबत त्याची तपासणी ही वरिष्ठ खोदन अभियंता / उप अभियंता (यां), कनिष्ठ / शाखा अभियंता (यां), जिल्हा परिषदेकडील सहाय्यक / कनिष्ठ भूवैज्ञानिक यांची समिती स्थापन करुन करावी.
  3. विंधण विहीर खूदाईची कामे, हातपंप उभारणी व कट्‌टा बांधणीची कामे शक्यतो एकाच कंत्राटदाराकडून करुन घेण्यात यावीत. तथापि ज्या ठिकाणी हातपंप उभारणी व कटट्याची बांधणी करणारे कंत्राटदार उपलब्ध आहेत त्या ठिकाणी हातपंप उभारणी व कट्‌टा बांधणीची कामे हातपंप उभारणी व कट्‌टयाची बांधणी करणाऱ्या कंत्राटदाराकडून करुन घेण्यास हरकत नाही.
  4. विंधणयंत्र धारकाकडून करारनामा कालावधीपर्यंत किमान रु. 25,000 सुरक्षा अनामत रक्कम म्हणून घेण्यात यावी तसेच हातपंप उभारणी आणि कटटा बांधणीसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आला असेल तर त्याचेकडूनही करारनामा कालावधीपर्यंत किमान रु. 10,000 सुरक्षा अनामत रक्कम म्हणून घेण्यात यावी.
  5. विंधण विहीरीची खोदाई करतेवेळी (आदेशात दिल्याप्रमाणे एम. एस. / पी. व्ही. सी. ) केसिंग पाईप कठीण खडकात किमान 5 मीटर जाईपर्यंत तसेच जमिनीच्या वर 0.3 मीटर ठेवण्यात यावा व केसिंग पाईपला कॅप लावणे. हातपंप बसविणेपर्यंत विंधण विहीरीमध्ये दगड पडून बंद होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी कंत्राटदाराची राहील, याची जाणीव संबंधित कंत्राटदारास करुन द्यावी. करारनाम्यात तसा उल्लेख करावा.
  6. अपारंपारिक योजनांतर्गत घेण्यात येणारी विंधण छिद्रे ब्लास्टिंग कामानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव पूर्णपणे बुजविणे कंत्राटदारास बंधनकारक आहे. त्याअभावी काही अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कंत्राटदाराची राहील. छिद्रे बुजविणेच्या कामासाठीच्या दरांचा अनुसूची ” ब ” मध्ये समावेश आहे.
  7. हातपंपाच्या कट्‌टयाभोवती पाणी साठून दूषित होते व केसिंगच्या भोवतालच्या फटीमधून विंधण विहिरीत गेल्यामुळे विंधण विहीरीचे पाणी दूषित होते. विंधण विहिरींचे केसिंग पाईपला ग्राऊटिंग करणे अनिवार्य आहे. ग्राऊटिंग करुन घेणेबाबत कनिष्ठ / शाखा अभियंता, उप अभियंता (यां) यांची जबाबदारी राहील.
  8. विक्रीकर आयुक्त, विक्रीकर भवन, मुंबई यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचनेनूसार व त्यातील अटींनूसार कंत्राटदारांकडून कर वसूल करावा.
  9. सर्व विंधण विहिरींचे भूप्रस्तराचे (खडक / माती ) नमुने आणि बी.सी.आर. ( Bore well Completion Report ) जिल्हा परिषदेकडील सहाय्यक भूवैज्ञानिक / कनिष्ठ भूवैज्ञानिक यांचेकडे जमा करणे बंधनकारक आहे. बी. सी. आर दिल्याशिवाय कंत्राटदारांची देयके पारीत करण्यात येवू नयेत. या भूप्रस्तरांच्या नमुन्याचा अभ्यास करुन बी. सी. आर. ( Bore well completion Report)  जिल्हा परिषदेकडील सहाय्यक / कनिष्ठ भूवैज्ञानिक यांनी पूर्ण भरणे बंधनकारक राहील. याबाबतचे सर्व BCR ( Borewell complition Report)  जिल्हा परिषदेकडील सहाय्यक / कनिष्ठ भूवैज्ञानिक यांनी जिल्हा परिषदेमध्ये जतन करुन ठेवावेत.
  10. उप अभियंता (यां), जिल्हा परिषद यांनी दर वर्षी विविध योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या विंधण विहीर खोदाई कामांच्या तालूकानिहाय / गावनिहाय नोंदी नोंदवहीत घेण्यात याव्यात. त्याची नोंद देयकावर घेण्यात यावी व प्रमाणित करावे व त्या नोंदी जतन कराव्यात. उपअभियंता (यां) यांनी दरवर्षी विविध योजनेतून खोदाई केलेल्या विंधण विहिरींचा वार्षिक अहवाल  ( जून्या व नवीन विंधण विहीर खूदाईचा अद्ययावत अहवाल ) संचालनालयास सादर करावा. दरवर्षी  जिल्ह्यात विविध योजनेतंर्गत खोदलेल्या विंधण विहीरी व त्यावर बसविलेल्या हातपंपाच्या गाव / वाडी / तालूका निहाय नोंदी ठेवण्याची जबाबदारी उपअभियंता(यां) यांची राहील.
  11. अपवादात्मक परिस्थितीमध्ये दगड / गोटयांचा भूस्तर असलेल्या विशिष्ट ठिकाणी 40 फूटांपेक्षा जास्त केसिंग पाईप अत्यावश्यक असल्यास उप अभियंता (यां) / भूवैज्ञानिक यांचे तांत्रिक सल्ल्याने 180 मि.मी. व्यासाच्या 8 kg/cm2 पी.व्ही.सी. केसिंग पाईपचा वापर करण्यात यावा.

वर्ष 2022-23 विंधण विहिर कार्यक्रमासाठी विंधण यंत्रामार्फत करावयाच्या कामाचे व तदनुषंगिक बाबींचे दर

अ.क्रकामाचा तपशीलवर्ष 22 – 23 करिता मंजूर करण्यात आलेले दर
123
150 मि.मी. व्यासाचे  डी.टी.एच. विंधणकाम व तद्नुषंगिक कामांचे दर
1विंधण काम  (वाहतुकीसह.) (माती / मुरुमाच्या भूप्रस्तरात 200 / 215 मि.मी. व्यासाचे रिमिंग विंधणकाम व पक्क्या पाषाणात 150 मि.मी. व्यासाच्या विंधणकामाचा यात समावेश आहे. (वेट  ड्रिलिंग)रु. 424/- प्रति मीटर
2विंधण विहीर पूर्ण केल्यानंतर फ्लशिंग द्वारे (Air Lift Method)  क्षमता चाचणी 90 अंशाच्या “व्ही” नॉचने मोजणे. (अर्ध्या तासासाठी )रु. 1740/- प्रति विंधण विहीर
150 मि.मी. व्यासाच्या नलिकाकूपचे रोटरी विंधणकाम व तद्नुषंगिक कामांचे दर
1विंधणकामरु. 1197/- प्रति मीटर
2वाहतूक (3 वाहने वाहतुक)रु. 5497/- प्रति कूपनलिका
3ग्रॅव्हल पॅकिंगरु.505/-  प्रति मीटर
4डेव्हलपमेंटरु. 1305/- प्रति तास
5बेल प्लगरु. 305/- प्रति नग
6आंब्याचा लाकडी ठोकळा     (1 मि. लांब X 0.150 मि. रुंद X 0.200 मि. जाडी )रु. 1578/- प्रति नग
7क्लॅम्पस  (1 मि लांब X 0.10 मि. रुंद X 0.01 मि. जाडी )रु. 1122/- प्रति जोडी
 115 मि.मी व्यासाचे विंधणकामांचे (Surface Bore / Probe Bore /Inwell Bore/Recharge Shaft,Jacket Well,BBT,FSC,SBT, etc) दर
1विंधणकाम (वाहतुकीसह.) (माती/मुरुमाच्या भूप्रस्तरात 150 मि.मी व्यासाचे रिमिंग विंधणकाम व पक्क्या पाषाणात 115 मि.मी व्यासाच्या विंधणकामाचा (वेट ड्रिलींग) यात समावेश आहे. )रु. 368/- प्रति मीटर
2विंधण विहीर पुर्ण केल्यानंतर फ्लशिंग द्वारे ( Air Lift Method)  क्षमता चाचणी 90 अंशाच्या           ” व्ही ” नॉचने मोजणे ( अर्ध्या तासासाठी )रु. 1148/- प्रति विंधण विहीर
3विहिरीमध्ये बेंचर उतरविणे व परत वर काढणे तसेच विंधण कामाच्या वेळचे कटींग मटेरियल विहिरीबाहेर काढणेसाठीची मजूरीरु. 1650/- प्रति विहीर
4बेंचर आणि इतर साहित्य यंत्रावरुन खाली उतरविणे आणि विंधण काम पूर्ण  झाल्यानंतर पुन्हा यंत्रावर चढविणे. तसेच अपारंपारिक योजनेच्या विंधण कामाकरिता स्थळाची विंधण कामाच्या दृष्टीने अनुकुलता करणे (site preparation) आणि बेंचर प्रत्येक विंधण विहीर स्थळी हलविणे साठीची मजूरी.रु. 220/- प्रति विंधण छिद्र
5बोअर ब्लास्टिंगसाठी घेण्यात येणारी विंधण छिद्रे ब्लास्टिंगनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव पूर्णपणे बुजविणे. ( सदरचा दर फक्त Jacket well, BBT,SBT अंतर्गत खोदलेल्या विंधणछिद्रे बूजविण्यासाठीच लागू राहील. )रु. 220  प्रति विंधण छिद्र
लोखंडी केसिंग पाईपचे दर
1150  मि.मी. व्यासाचा आट्याचा लोखंडी केसिंग पाईप, एम.एस., ई.आर.डब्ल्यू. मेडियम क्लास ( IS: 1239) 4.80 मि.मी. जाडी ( सॉकेटसह )रु. 1477/- प्रति मीटर
2150   मि.मी..व्यासाचा आट्याचा लोखंडी केसिंग पाईप, 4.80 मि.मी.जाडी  लोअरिंग आणि ग्राऊटींगचे दररु.147/-  प्रति मीटर
3150   मि.मी.व्यासाच्या आट्याच्या लोखंडी केसिंग पाईपसाठी  कॅप  (IS : 1239)रु. 193/- प्रति नग
4150   मि.मी..व्यासाचा बीन आट्याचा  लोखंडी केसिंग पाईप, एम.एस.ई.आर.डब्ल्यू.मेडियम क्लास   (IS :  1239), 4.80 मि.मी. जाडी.रु. 1317/-  प्रति मीटर
लोखंडी केसिंग पाईपचे दर
5150  मि.मी..व्यासाचा एम. एस. ई.आर.डब्ल्यू. मिडियम क्लास  लोखंडी केसिंग पाईप (जाळीचा)    (IS :  1239)रु. 1515/- प्रति मीटर
6150 मि.मी.व्यासाच्या बीन आट्याचा व जाळीचा लोखंडी केसिंग पाईप,  लोअरींग व वेल्डींग कामासह  दर  (Basic Cost च्या 10 % )रु. 166/- प्रति मीटर
7125  मि.मी. व्यासाचा आट्याचा लोखंडी केसिंग पाईप, एम.एस., ई.आर.डब्ल्यू. मिडियम क्लास  ( IS: 1239) (सॉकेट सह.) 4.80 मि.मी.जाडी ( सॉकेटसह )रु. 1242/- प्रति मीटर
8125  मि.मी. व्यासाचा आट्याचा लोखंडी लोअरिंग व ग्राऊटिंग चे दर Basis Cost वरील दर.) 4.80  मि.मी. जाडी (Basic Cost च्या 10 % )रु. 123/- प्रति मीटर
9125 मि.मी व्यासाच्या आट्याच्या लोखंडी केसिंग पाईपसाठी कॅप (IS :  1239)रु. 166/- प्रति नग
पीव्हीसी केसिंग पाईपचे दर
1150 मि.मी. व्यासाचे डी.टी.एच. विंधणकामासाठी 180 मि.मी. व्यास 6 kg/cm2 पीव्हीसी केसिंग पाईप  (IS 4985-1988)रु. 1098/- प्रति मीटर
2अपवादात्मक परिस्थितीमध्ये / दगड गोटयांचा भूस्तर असलेल्या ठिकाणी व 40 फूटापेक्षा जास्त केसींग पाईप अत्यावश्यक असल्यास, उपअभियंता व भूवैज्ञानिक यांचे तांत्रिक मान्यतेने 150 मि.मी. व्यासाचे डी.टी.एच. विंधणकामासाठी 180 मि. मि. व्यास 8 kg/cm2) पीव्हीसी केसिंग पाईप  (IS 4985-1988) दररु. 1542/- प्रति मीटर
3150 मि.मी. व्यासाचे डी.टी.एच. विंधणकामासाठी 180 मि. मि. व्यास 6 kg/cm2)/ 8 kr/cm2 पीव्हीसी केसिंग पाईप ,केसिंग लोअरिंग हॅन्डलिंग व ग्राऊटिंग चे दर  12 मी पर्यंतरु. 109/- प्रति मीटर
12 मी  पेक्षा जास्त  केसिंगसाठीरु. 218/- प्रति मीटर
4180 मि.मी. व्यासाच्या पीव्हीसी पाईपसाठी कॅपरु. 200/- प्रति नग
5115 मि.मी. व्यासाच्या विंवि/छिद्रासाठी 140 मि.मी. व्यासाच्या 4 kg/cm2  पीव्हीसी केसिंग पाईप       IS 4985-1988.रु. 433/- प्रति मीटर
6115 मि.मी. व्यासाच्या विंधण विहीर/छिद्रासाठी 140 मि. मी. व्यासाच्या 6 kg/cm2  पीव्हीसी केसिंग पाईप (As per IS 4985-1988)रु. 640/- प्रति मिटर
7140 मि.मी. व्यासाच्या 4 kg/cm2 पीव्हीसी केसिंग पाईप लोअरिंग  आणि ग्राऊटींगचे दर (Basic Cost च्या 10%)रु. 43/- प्रति मिटर
8140 मि.मी. व्यासाच्या 6 kg/cm2 पीव्हीसी केसिंग पाईप लोअरिंग  आणि ग्राऊटींगचे दर (Basic Cost च्या 10%)रु. 64/- प्रति मिटर
9140 मि.मी. व्यासाच्या पीव्हीसी पाईपसाठी कॅपरु. 100/- प्रति नग
10रिचार्ज शाफ़्टसाठी वापरावयाच्या  पी. व्ही.सी.  केसिंग पाईप योग्य त्या ठिकाणी जाळीचा बणविणेकरितारु. 150/- प्रति रिचार्ज शाफ़्ट
हातपंप उभारणी व हातपंप ओटा बांधणीचे दर
1हातपंप उभारणी इंडिया मार्क 2/इंडिया मार्क 3 / एक्स्ट्रा डिपवेल / व्हीएलओएम 50 पंप ( रायझिंग पाईप आणि कनेक्टिंग रॉड विंधण विहीरीत सोडणे )रु. 1628/- प्रति पंप
2खोदकामरु. 177/- प्रति घनमीटर
3ड्राय रबल स्टोन फिलिंगरु. 553/- प्रति घनमीटर
41:2:4  (  M – 150 ) सिमेंट काँक्रिट प्रत्यक्ष मोजमापाप्रमाणेरु. 6655/- प्रति घनमीटर
5वाहतूक ( 40 किमी कमाल मर्यादेत ) प्रति हातपंप उभारणी व कट्‌टा बांधणी कामाकरिता ( वाहन टेम्पो / मिनी ट्रक )रु .626/-  प्रति हातपंप व कटटा बांधणीसाठी
ड्युएल पंप उभारणीचे दर
1ड्युएल पंप उभारणी कामासाठी खास विकसित केलेले स्पेशल वॉटर चेंबरचे दर.(गॅलव्हनायझिंग केलेले.)रु. 2300/- प्रति नग
2ड्युएल पंप उभारणी कामासाठी आवश्यक स्टेनलेस स्टीलचे बॉटम निप्पल.रु. 575/- प्रति नग
विंधण विहिरीची विद्युतपंपाद्वारे क्षमता चाचणी घेणे
1विंधण विहिरीची विद्युतपंपाद्वारे क्षमता चाचणी घेणे.प्रति विंधण विहिर विद्युत जनित्रासह.रु. 4278/- प्रति विंधण विहीर
2विंधण विहिरीची जलभंजनाची कामे करणेकरीता, फ्लशिग करणेकरिता, क्षमता चाचणी घेणेकरीता हातपंप काढणे व बसविणे. विंधण विहीर विशेष दुरूस्ती करिता.रु 1628/- प्रति विंधण विहीर
150 / 115 मि.मी. व्यासाच्या विंधण विहिरींचे पुनरुज्जीवन / रिड्रिलिंग / फ़्लशिंग करणे कामाचे वाहतूकीसह दर
1150 /115 मि.मी. व्यासाचे  विंधन विहिरीचे पुनरुज्जीवन / रिड्रीलिंग / फ्लशिंग करणे कामाचे वाहतूकीसह दर प्रति विंधण विहीर.रु. 8576/- प्रति विंधण विहीर

आयुक्त
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
महाराष्ट्र राज्य, पुणे  5

Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.