कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि यंत्र अध्ययनाचा वापर करून भूजल व्यवस्थापन
“कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर भूजलाच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी करुन सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी भूजल विभागाने इतिहासात प्रथमच पाऊले उचलल्याची माहिती राज्याचे भूजल आयुक्त श्री. चिंतामणी जोशी यांनी दिली”
शुक्रवार दिनांक 21.4.2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई आणि विश्वकर्मा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्टीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव श्री. संजीव जयस्वाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यशाळेच्या प्रसंगी जोशी यांनी प्रतिपादन केले की एकीकडे वाढती लोकसंख्या, हवामानातील होणारे बदल, भूजलाचे प्रदूषण, सततचे बदलते भूभाग यांमुळे भूजलावर होणारा परिणाम व या सोबतच राज्यातील दोलायमान पर्जन्यमान व कठीण पाषाणाची भूरूपीय संरचना या सर्व बाबींमुळे भूजलाचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक झालेले आहे. यासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता आणि यंत्र अध्ययनाचा वापर करुन उपयुक्त प्रणाली जसे की भूजल पातळीचा अंदाज, भूजल गुणवत्तेचे अनुमान, पर्जन्यमान व पुनर्भरणचा परस्पर संबंध इ. उपक्रम हाती घेणेबाबत कार्यशाळेमधे चर्चा झाली. याचा उपयोग भूजलाचा ऱ्हास होऊ नये म्हणून धोरणात्मक उपाययोजना आखण्याकरिता होणार आहे. तसेच भूजलाच्या वापरकर्त्यांना पीक-पाणी नियोजन, आजुबाजूच्या परिसरातील भूजल गुणवत्ता राखणे, नवीन विहिरी व बोअरवेल घेणे इ. साठी होणार आहे. त्याची पुर्वतयारी म्हणून भूजल विभागाने १:१०,००० स्केल वर मॅपिंग करणे, डेटा डिजिटायझेशन व निर्णय आधार प्रणाली विकसित करण्याचे काम सुरु केले असल्याची माहिती जोशी यांनी दिली.
कार्यशाळेमधे विविध शासकीय संस्था तसेच शैक्षणिक संस्थां जसे की भारतीय हवामान विभाग, भारतीय भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जलसंपदा विभाग येथील अधिकारी तसेच व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री एच.डी. धुमाळ हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. भूजल व भुपृष्टीय जल या दोन्हीची सांगड घालून समाजउपयोगी प्रणाली तयार करण्यात यावी असे मत श्री. धुमाळ यांनी या ठिकाणी व्यक्त केले. डॉ. विजय वाघमोडे, डॉ. श्रीकांत शिंदे आदींची उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या पूर्वार्धात आयआयटी, मुंबई येथील प्रा. इंदू यांनी कृत्रिम बुध्दिमत्तेच्या आधारे भूजलामधे केलेले पथदर्शी प्रकल्पांबाबत दूरस्थ पध्दतीने सादरीकरण केले. डॉ. सेन यांनी भूजल विषयी विविध माहितीचे संस्करणाबाबत व्याख्यान दिले. प्राध्यापक श्रीनिवास लोंढे यांनी जलसंसाधनामधे कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर यावर विस्तृत सादरीकरण केले. प्राध्यापक महाले यांनी डेटा इंजीनियरिंग फॉर कॅपिटल बाबत तर डॉ. प्रज्ञा दीक्षित आणि डॉ. प्रीती कुलकर्णी यांनी प्रेडिक्टिव्ह मॉडेल बाबत सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाच्या उपसंचालिका भाग्यश्री मग्गीरवार यांनी तर सूत्रसंचालन डॉ. प्रज्ञा दीक्षित यांनी केले.
Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.