जलविज्ञान प्रकल्प
जलविज्ञान प्रकल्प टप्पा – १
प्रकल्पाची व्याप्ती :
जागतिक बँकेच्या सहाय्याने भारतातील ९ राज्यात हा प्रकल्प सन १९९५-९६ वर्षात सुरु करण्यांत आला. महाराष्ट्रात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखाली भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांचेमार्फत महाराष्ट्र राज्यातील ३३ जिल्हयात सन १९९५-९६ ते सन २००३-२००४ या सहा वर्षांच्या कालावधीत राबविण्यात आला.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे सन १९९५-९६ ते डिसेंबर २००४ या कालावधीसाठी रु.४१३२.८१ लक्ष विविध कामांकरीता उपलब्ध करुन देण्यांत आले होते व त्यापैकी रु. ३०१०.०९ लक्ष विविध कामांसाठी खर्च करण्यांत आला.
प्रकल्पाची संकल्पना :
भूजल संपत्तीशी संबंधीत यंत्रणांना अधिक व्यापक अचूक माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करणे ही या प्रकल्पाची मुख्य संकल्पना आहे.
प्रकल्पाचा उद्येश्य :
१) तांत्रिक व भौतिक साधन व क्षमता विकसित करणे.
२) संघटनात्मक बळकटीकरण व सुधारणा करणे.
३) केंद्र शासनाशी संलग्न संस्थांशी व सहभागी राज्यांशी समन्वय ठेऊन भूजलाच्या माहितीत अचूकता आणणे.
प्रकल्पांतर्गत केलेली कामे :
१) तांत्रिक व भौतिक साधन व क्षमता विकसित करणे.
- ११३६ पिझोमीटर्स खोदण्यांत आले. त्यापैकी ९९९ पिझोमीटर्सवर स्वयंचलीत पाणी पातळी मोजमाप यंत्रे बसविण्यांत येऊन दर महीन्याला पाणी पातळीच्या नोंदी घेण्यांत येतात.
- ६ रासायनिक प्रयोगशाळा उच्चस्तरीय करण्यांत आल्या. पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी ३३७० पिझोमीटर्स व विंधण विहीरींचे Baseline Stations, Trend-cum-Surveillance Stations, Trendline Stations निश्चित करण्यांत येऊन वर्षातुन एकदा पाण्याचे पृथ:करण व माहितीचे नूतनीकरण करण्यांत येते.
- संचालनालय, ६ विभागीय कार्यालये व ३३ जिल्हे या ठिकाणी डाटा प्रोसेसिंग सेंटर कार्यरत करण्यांत आले आहे. GEMS प WISDOM सॉफटवेअरद्वारे माहितीचे संकलन व विश्लेषण करण्यांत येत आहे. GIS सॉफटवेअरसाठी MRSAC, Nagpur व GSI, Nagpur यांचेकडून डिजीटल नकाशे व माहिती खरेदी करण्यांत आली आहे.
- मौजे ओझर, जिल्हा नाशिक व चांदगुडेवाडी, जिल्हा पुणे येथे जलवेधशाळा स्थापन करण्यांत आल्या आहेत.
- जलविज्ञान प्रकल्पांतर्गत संशोधनाच्या दृष्टीकोनातून खालीलप्रमाणे ३ जिल्हयात संशोधनाचे प्रकल्प राबविण्यांत आले.
- मौजे ओझर, जिल्हा नाशिक येथे भूजल व भूपृष्ठाच्या पाण्याचा संयुक्त वापर.
- मौजे बामनोद, जिल्हा जळगांव येथे विहीरीच्या पुनर्भरणाचा प्रयोग.
- तालुका बारामती, जिल्हा पुणे अंतर्गत बीएम-६० पाणलोट क्षेत्रातील भूजल प्रणाली विकासाचा अभ्यास.
- संचालनालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची प्रशासकीय इमारत व नाशिक येथे प्रयोगशाळा व प्रशिक्षण केंद्र बांधण्यांत आले.
२) संघटनात्मक बळकटीकरण व सुधारणा करणे.
- २२४६ अधिकारी / कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील बाबींचे प्रशिक्षण देण्यांत आलेे.(संगणक, खरेदी प्रणाली, रासायनिक पृथ:करणाबाबत, मनुष्यबळ विकास, व्यक्तीगत विकास व सादरीकरण, भूजल व्यवस्थापन इ.
३) केंद्र शासनाशी संलग्न संस्थांशी व सहभागी राज्यांशी समन्वय ठेऊन भूजलाच्या माहितीत अचूकता आणणे.
– उपभोक्ता गट स्थापना.
आधार सामग्री उपभोक्ता गटाचे सभासद झाल्यानंतर महाराष्ट्र, इतर सहभागी राज्ये व केंद्रीय संस्थांची (भूजल), जलशास्त्रीय व हवामान विषयक इ. माहिती शासन मान्य दराप्रमाणे उपलब्ध होत आहे.या क्षेत्रात काम करणा-या विविध शासकीय, स्वयंसेवी संस्थांना लागणारी भूजलाबाबतची सन १९७१ पासूनची माहिती उपलब्ध करुन देणेत येंत आहे. या कार्यालयाकडे आंतापर्यंत ३६४ सदस्य झालेले असून माहितीसाठी रु .२१.६२ लक्ष एवढी रक्कम प्राप्त झाली असून कोषागारात जमा करण्यांत आली आहे.
– संकेत स्थळ http://gsda.maharashtra.gov.in सुरु करण्यांत आले आहे,
उपरोक्त सर्व साधन सामुग्रीचा उपयोग या कार्यालयाद्वारे राज्यातील विविध भागांत होणा-या भूजल पातळीतील विविध घडामोडींचा अभ्यास करुन भूजल मुल्यांकन, टंचाई सदृश्य परिस्थितीचे आराखडे तयार करणेसाठी होत आहे.
जलविज्ञान प्रकल्प टप्पा – २
भारताच्या सन २००२ च्या “राष्ट्रीय जलनीतीचा” मुख्य भर भूजल व्यवस्थापनासाठी पाण्याशी संबंधीत “संपूर्ण विकसित माहिती प्रणाली” तयार करणे हा आहे, त्या करीता, वेगवेगळया विभागात उपलब्ध असलेल्या माहितीचे आदान-प्रदान करणे. जल माहिती प्रणाली अद्ययावत ठेवण्याकरीता माहिती परस्पर सहकार्याने गोळा करणे. हायड्रॉलॉजीकल डिझाईन एडस़, निर्णय आधार प्रणालीे सॉफटवेअर तयार करणे व विशिष्ट हेतूप्रेरीत अभ्यास करणे हा प्रकल्पाचा उद्येश असून यासाठी संघटनात्मक बळकटीकरण व सुधारणा करणे, तांत्रिक व भौतिक साधन क्षमता विकसीत करण्यांत येणार आहे.
जागतिक बँकेच्या सहाय्याने भारतातील १३ राज्यात व ८ केंद्रीय संस्थांमध्ये हा प्रकल्प सुरु करण्यात आला असून महाराष्ट्रात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखाली भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांच्या मार्फत हा प्रकल्प सन २००६-२००७ ते सन २०११-२०१२ या सहा वर्षांच्या कालावधी करीता प्रस्तावित होता. या प्रकल्पासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला एकूण रु.१३.०३ कोटी अनुदान उपलब्ध होणार होते. सदर प्रकल्पाचा कालावधी मे २०१४ पर्यंत वाढविण्यात आले आहे.सदर प्रकल्प हा भारत सरकारने जागतिक बॅकेकडून घेतलेल्या कर्जावर आधारित आहे.केंद्र शासनाच्या जलसंसाधन मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फ़त याप्रकल्पाचे संनियंत्रण केले जाते.महाराष्ट्रा मध्ये सदर प्रकल्प भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (भूजल) व सिंचन विभाग नाशिक (भूपृष्ठ जल ) यांचेद्वारे राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पात २ मुख्य घटक समाविष्ट आहेत.
अ) संघटना / संस्थात्मक बळकटीकरण
या अंतर्गत जलविज्ञान प्रकल्प टप्पा १ च्या अंतिम टप्यामध्ये राहिलेली कामे पूर्ण करणे, डेटा प्रोसेसिंग सेंटर/स्टोअरेजचे सॉफटवेअरचे प्रशिक्षण. पाण्याच्या गुणवत्तेचा अभ्यास करणे, उपभोक्ता गटाकरीता ज्ञान प्रसार
या प्रकाराची कामे समाविष्ट आहेत.
ब) उर्ध्वगामी विस्तारीकरण –
१. हायड्रोलॉजीकल डिझाईन एडस –
जलसंपत्ती मुल्यांकन व गुणवत्तेसाठी समान कार्यप्रणाली व मार्गदर्शक सूचना निश्चित करणे.
२. निर्णय आधार प्रणाली ( Decision Support System ) –
भूपृष्टावरील व भूजलाची माहिती एकत्रित करुन त्या आधारे नदी खो-यातील एकात्मीक जलक्षेत्र व्यवस्थापनासाठी निर्णय आधार प्रणाली, सॉफटवेअर तयार करणे. याकरीता भिमा पाणलोट (उजनी धरण क्षेत्रापर्यंत) खो-याची निवड करण्यांत आली आहे. जलसंपदा व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत एकत्रितपणे राबविण्यांत येत आहे. या अंतर्गत DHI Consultant यांचे तांत्रिक मार्गदर्शना खाली software तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सदर software मध्ये खालील बाबींचा अंतर्भाव असणाऱ आहे.
- Drought monitoring
- Seasonal Planning
- Conjunctive use of surface and ground water.
- Artificial recharge.
- Chemical quality assessment.
३. विशिष्ट हेतूपे्ररीत अभ्यास ( Purpose Driven Study ) –
एखाद्याभागातील विशिष्ट प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यास करणे व जलविज्ञान प्रणालीचा वापर करुन उपाय योजना सूचविणे की ज्यात कमी खर्चाच्या कायमस्वरुपी व हाताळण्यास सोप्या असतील ज्यायोगे जल उपभोक्त्यांची सामाजिक व आर्थिक उन्नती साधता येईल. तसेच, ज्या ठिकाणी असे प्रश्न आहेत तेथे गरजेनुसार या आधारे कार्यक्रम राबवून लोकांचे प्रश्न सोडविता येतील. या अंतर्गत पुढील 3 प्रकल्प हाती घेण्यांत आले आहेत.
- ठाणे जिल्हयातील केळवा माहीम, पालघर येथे समुद्राचे पाणी भूजलामध्ये शिरुन त्याचा भूजलावर होणा-या परिणामाबाबत संशोधन प्रकल्प.
- लातूर जिल्हयात मांजरा खो-यातील भूकंपग्रस्त भागात भूजलावर होणा-या परिणामाबाबत संशोधन.
- यवतमाळ जिल्हयातील फलोराईडमुळे भूजलावर होणा-या परिणामाबाबत संशोधन प्रकल्प.
प्रकल्पाचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे.
जलविज्ञान प्रकल्पांतर्गत करण्यांत आलेली वैशिष्ठयपूर्ण कामे खालीलप्रमाणे आहेत.
- मोशी, जिल्हा पुणे येथे आयोजित किसान प्रदर्शनात सन २००८ पासून दर वर्षी सहभाग घेतला.
- २६ जानेवारीचे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणा-या कार्यक्रमांमध्ये चित्ररथाद्वारे जलजागृति व यंत्रणेच्या कार्याची माहितीबाबत जनजागृति करण्यात आले.
- विभागीय स्तरावर १२ जलविषयक आधारभूत माहिती गरजांबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या.
- जलजागृति व उपभोक्ता गटांच्या जिल्हास्तरीय ३२ कार्यशाळा करण्यात आल्या.
- जलजागृति व उपभोक्ता गटांच्या तालुकास्तरीय २६५ कार्यशाळा.
२६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन कार्यक्रमातील चित्ररथ. प्रदर्शनास दिलेला प्रतिसाद.
जलजागृतीसाठी तयार केलेले ब्रोशर, reference book व कॅलेंडर
आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण
- डेहराडून येथे ७८ अधिका-यांना, तसेच विभागीय स्तरावर १९० अधिकारी / कर्मचा-यांना मॅपइन्फ़ो (GIS) प्रशिक्षण देण्यात आले.
- २५ अधिका-यंना Oracle Software प्रशिक्षण देण्यात आले (२०१०-११).
- ५० अधिका-यंत्रणा प्रशासन व लेखा बाबत प्रशिक्षण देण्यात आले (२०११-१२).
- २५ अधिका-यंत्रणा मानव संसाधन विकास (HRD) प्रशिक्षण देण्यात आले(२०११-१२).
- २५ अधिका-यंत्रणा Project Proposal and Report writing बाबत प्रशिक्षण देण्यात आले(२००९-१०).
- ८० भूवैज्ञानिकांना Geological Mapping व Hydrological Exploration या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले (२०११-१२ व २०१२-१३).
- यंत्रणेतील ३ अधिका-यांना अंतरराष्ट्रीय प्रशिक्षण देण्यात आले (२०११-१२).
आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळा
- प्रकल्प राबविणे बाबत कार्यशाळा.
- भूजल अधिनियम बाबत कार्यशाळा.
- भूजल शाश्वतता व सुरक्षितता बाबत कार्यशाळा.
राज्या बाहेरील अभ्यास सहल
- इतर राज्यामध्ये राबविण्यात आलेल्या कामांची पाहणी करीता आंध्रप्रदेश, ओरिसा, केरळ व तमिळ्नाडू येथे अभ्यास सहल आयोजित करण्यात आली.
महत्वाचे खरेदी / काम
- ३५ सर्वेक्ष्ण वाहन (महिंद्रा बोलेरो)
- ५ कार (टाटा इंडिगो)
- एक प्रदर्शन वाहन – बस.
- संगणक- १३०. प्रिंटर – १००.
- मॅप इन्फ़ो सॅाफ़्टवेर – ४०.
- GIS data.
- तालूका (केडस्ट्रल) नकाशे -३५३.
- टोपोशीट -७७०.
- निरीक्षण विहिरी जवळ नामफ़लक लावणे – ३४०४.
- Digital Water Level Recorder – १०.
- लॉपटॅप – १५.
- ABEM WADI भूभौतिक सर्वेक्षण उपकरण -१.