GSDAGSDAGSDA

पाणी उपसा उपकरणे

  • Home
  • पाणी उपसा उपकरणे

संशोधनात्मक पाणी उपसा उपकरणे – पार्श्वभूमी

       ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला शाश्वत पिण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी व इतर घरगूती गरजांसाठी शाश्वत पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देणे हे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचे मुख्य ध्येय आहे.

       योग्य त्या गुणवत्तेचे पाणी सहजतेने, सुलभतेने सर्व परिस्थितीत वर्षभर उपलब्ध व्हावे, ही प्राथमिक आवश्यकता आहे. या योजनेमुळे ग्रामीण स्त्रियांना व मुलींचा पाणी मिळवण्यासाठी जाणारा वेळ वाचवून त्यांना त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा शिक्षण व इतर कामांसाठी वापरला जाऊ शकतो. इतर ठिकाणांहून पाणी वाहून आणतांना पाणी प्रदूषित होण्याचा धोकाही टाळता येतो.महाराष्ट्रात ९०% पेक्षा जास्त ग्रामीण वाडी/वस्त्यांमध्ये स्वच्छ पिण्या योग्य उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि अजून बऱ्याच ठिकाणी व्यवस्था करणे प्रलंबीत आहे.सहयाद्री व सातपुडा पर्वतरागांमध्ये ज्या वाडया/वस्त्या आहेत. अशा ठिकाणी शाश्वत, गुणवत्तापूर्ण वेळेत पाणी पुरवठा करण्याची गरज आहे.

       भूजल सर्वेक्षणआणिविकास यंत्रणेने एक कार्यक्रम हाती घेऊन, सहयाद्री व सातपुडा पर्वतरागांतील २१६ लहान, डोंगरी, दुर्गम वाडया /वस्त्यांचे सर्वेक्षणकेले आहे. त्यानंतर असे निदर्शनास आले की, सदर वाडया/ वस्त्यांपैकी जास्तीत जास्त वाडया/वस्त्या हया डोंगरउतारावर, डोंगरमाथ्यावर असून त्यांचा पारंपारिकपाण्याचे स्त्रोत हे नैसर्गिक झरे आहेत. संकलनालनासाठी लहान तळे/विहिरीही आढळून आल्या. सदर ठिकाणांहून पाणी मिळवण्यासाठी त्यांना घसरगुंडीचे रस्त्यांचा सामना करावा लागतो. ते लोकपारंपारिक/अतिप्राचीन लाकूड/झाडाच्या सहाय्याने झऱ्यांपासून पाणी मिळवतात. त्यामुळे पाणी उपसा उपकरणे हाच मुख्य प्रश्न असल्याचे निदर्शनास आले.मुख्यत्वेकरुन ग्रामीणस्त्रियांना व मुलींना उन्हाळयात व पावसाळयात पाणी मिळविणे अतिशय कष्टप्रद होते. शाळकरी लहान­मुले / मुलींना दूरवर¸असलेल्या विहिरीवरुन पाणी वाहून आणावे लागत असे अशा भागात शाश्वत विजपुरवठा उपलब्ध नसतो. सदर उंच डोंगरी ठिकाणी विंधणविहिर घेणेसुध्दा सुलभ होत नाही. भौगोलिकदृष्टया सदर ठिकाणी अवजड वाहने पोहचणे शक्य नसते.पारंपारिकविहिरी हया हंगामी असल्याने त्यांच्यामार्फत उन्हाळयात मागणीनुसार पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही.

       भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत महाराष्ट्र राज्यात खालीलप्रमाणे नाविण्यापुर्ण योजना राबविण्यात येत आहेत. ज्यांची उभारणी किंमत अत्यंत कमी खर्चाची असुन पाणी उपसा करण्यासाठी माणसांना कमी कष्ट लागतात.

  • युनिव्हर्सल पंप – a) वायर रोप टाईप b) सक्शन पंप
  • वाहत्या पाण्याच्या गतीत ऊर्जेचा वापर करुन दोन लहान गावांच्या ठिकाणी हायड्रॅम पंप बसविण्यात आले आहेत.
  • भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत विकसित करण्यात आलेल्या सौर ऊर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजनांचे अनुकरण इतर राज्याकडुन ही होत असुन सदर राज्यांमध्ये हजारोंच्या संख्येने या योजना राबविण्यात येत आहेत.

झऱ्यावर आधारीत नळ पाणी पुरवठा योजना ही संबंधित क्षेत्राच्या भौगोलिकि परिस्थितीनुसार ज्या भागात वर्षभर नैसर्गिक वाहणारे झरे आहेत, अशा झऱ्यांवर नळ पाणी पुरवठा योजना राबवुन घरोघरी नळांव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो.

हायड्रॉलिक रॅम पंप (हायड्रॅम)
हायड्रॉलिक रॅम पंप (हायड्रॅम) नैसर्गिक उंचावरुन वाहणाऱ्या पाण्याच्या गतीज ऊर्जेचा उपयोग करुन पाणी उपसा करण्यात येतो. पाणी एका ठराविक उंचीवर नेण्यासाठी (Lift) हायड्रॅम पंपाचा वापर होतो.डोंगर/दरीमध्ये झऱ्याचे/प्रवाहाचे वाहणारे पाणी पंपींगव्दारे डोंगरावरील/उंचीवरील खेडयांना पुरविले जाते.

सतत वाहणारे झरे/प्रवाह यांच्या ऊर्जेचा वापर करुन हायड्रॅम पंप आपोआप व सतत कार्यरत राहतो. उर्जेसाठी कोणताही बाहयस्त्रोत वापरण्यात येत नाही. त्यामुळे कार्यचलनासाठी तसेच देखभाल दुरुस्तीसाठी कमी खर्च येतो. प्राथमिकदृष्टया भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत घोटावडे व ऐनगर या दोन लहान गावांच्या ठिकाणी हायड्रॅमपंप बसविण्यात आलेले आहेत.

नंबरवाडी
रायगड जिल्हयातील रोहा तालुकयात सहयाद्री पर्वत रांगामध्ये नंबरवाडी हे गाव छोटया नदी किनारी वसलेले आहे. सदर गाव हे सुरक्षीत, स्वच्छ पाण्यापासून वंचीत होते. सदर गावात राहणारे गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने ते गावकरी पाणी पुरवठा योजनांची वर्गणी भरु शकणार नव्हते. त्यामुळे त्यांच्या गावाचा विकास दर ही कमी होता.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत सदर गावाचे पिण्याच्या पाण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. सदर सर्वेक्षण अंती असे निदर्शनास आले की, सदर गावाच्या शेजारुन छोटी नदी वाहत असुन त्यामध्ये २ मीटर उंचीवरुन पाणी प्रवाह पडत आहे. त्याचा उपयोग करुन घेत जुन्याच पध्दीने हायड्रॅमपंपाव्दारे पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्याचे ठरविले.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या लघु नळ पाणी पुरवठा योजनांमध्ये जे 3 मीटर उंचीचे लोखंडी मनोरे व ५००० लीटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीचा उपयोग करुन घेत या गावामध्ये हायड्रॅम पंपाव्दारे पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत केली. हायडॅमपंपाव्दारे या गावास २४x ७ दिवस रोज ५००००लीटर पाणी मिळु लागले. ५००० लीटर टाकीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्यात आला व उर्वरीत ४५००० लीटर पाणी हे गावातील शेतीच्या सिंचनासाठी व इतर लघू उद्योगासाठी वापरण्यात आल्याने सदर गावाची आर्थिक परिस्थितीमध्ये ही सुधारणा झाल्याचे निदर्शनास आले.
सहयाद्री पर्वत रांगांमधील याच क्षेत्रातीत अजून २० योजना प्रगती पथावर आहेत.

युनिव्हर्सल हातपंप (Universal handpump)
(जिल्हा रायगड, ता. खालापूर, चावणी, मौजे गावधनवाडी)
आपल्या राज्याचा २०% भाग दुर्गम डोंगराळ असून सह्याद्री व सातपुडा पर्वतांच्या रांगामध्ये अनेक लहान वाड्या वस्त्या आहेत. या वाड्या वस्त्यांना पिण्याचे शुध्द पाणी पुरवठा करणे अत्यंत बिकट आहे. कारण प्रचलित पध्दतीने विंधण विहीर अशा भागात घेणे शक्य नसते. कारण विंधण यंत्र इतक्या दुर्गम भागात रस्त्या अभावी व कठीण चढांमुळे पोहोचू शकत नाही. साध्या विहीरीनाही या भागात पाणी लागत नाही अथवा तीव्र उतारामुळे टिकत नाही. परिणामी या वाड्या वस्त्या अनादी कालापासून डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्यांमधून किंवा नजीकच्या झ-यामधून पाणी घेतात. तथापि इतक्या खाली उतरुन ते देखील पावसात व उन्हाळयात कठीण खडकाळ वाटेने पाणी नेणे अत्यंत कष्टाचे व संकटाचे काम आहे. विशेषत: ही जबाबदारी स्त्रिया व लहान मुलींनाच पार पाडावी लागते.

अशा ठिकाणी कमी कष्टात व घरापर्यंत पाणी आणण्याची अत्यंत कमी खर्चाची युनीव्हर्सल हातपंप ही संकल्पना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने संशोधीत करुन विकसीत केली आहे. या मध्ये अस्तित्वातील ओढ्यांमधून, झ-यांमधून, कुंडामधून, तळ्यामधून माथ्यावरील घरांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रचलित हातपंपाची उभारणी घरांच्या नजीक करण्यात येते. परंतु या हातपंपाखाली विंधण विहीर नसते. फक्त हातपंपाचा ओटा व त्यावर हातपंपाचे पेडस्टल, हेड हॅन्डल बसविण्यात येते.

या हातपंपाच्या हँन्डलच्या समोरच्या टोकाला वायर रोपचे टोक गतविण्यात येते व ही वायररोप पेडस्टलच्या तळाशी बसविण्यात आलेल्या पुलीवरुन झ-यापर्यंत / ओढ्यापर्यंत/ तळ्यापर्यंत/ कुंडापर्यंत/ विहीरीपर्यंत अनेकपुलींवरुन नेण्यात येते. या सर्व पुल्या जमीनीत लोखंडी अँगलच्या सहाय्याने बसविल्या जातात. वायर रोपचे शेवटचे टोक नजीकच्या झ-यात / ओढ्यात / विहीरीत सोडलेल्या हातपंपाच्या सिलेंडरमधील कनेक्टींग रॉडला जोडण्यात येते. अशा त-हेने वस्तीमधील हातपंप ते नजीकच्या झ-यात / ओढ्यात / कुंडात / तळ्यात / विहीरीत सोडलेल्या हातपंपाच्या सिलेंडर पर्यंत एक मॅकेनिझम तयार करण्यात येते. त्यामुळे हातपंपाच्या हँन्डलच्या सहाय्याने पाणी उपसता येते.हे उपसलेले पाणी एचडीपीई पाईपच्या सहाय्याने वस्तीपर्यंत आणले जाते.ह्या युनीव्हर्सल हातपंपामध्ये भौगोलिक परिस्थितीनुरूप काही बदल करणे आवश्यक असते.वस्तीपासून लांब अंतरावरील उपलब्ध पाणी स्त्रोतामधून घराजवळ उभारणेत आलेल्या हातपंपाव्दारे कमीत कमी कष्टात पाणी उपसणे आता शक्य झाले आहे.

युनिव्हर्सल सक्शन पंप
काही डोंगरी भागामध्ये पाण्याचा उद्भव हे वस्तीपासून दूर अंतरावर असतात. अशा ठिकाणी सक्शन पध्दतीचे युनिव्हर्सल पंप भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने विकसीत करुन बसविले आहेत.१० मिटर पेक्षा कमी खोलीवरून या पंपाव्दारे सक्शन पध्दतीने पाणी काढता येते. ज्या लहान वाड्या वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या विहिरीं अथवा नैसर्गिक झरे, कुंड वस्त्यांपासून दूर आहेत त्याठिकाणी कष्ट कमी करण्याच्या दृष्टीने सक्शन पंप बसवून वस्तीमध्ये पाणी पुरवठा करणे शक्य होते.

(जिल्हा रायगड, ता.खालापूर, चावणी, मौजे गावधनवाडी)

यामध्ये हातपंपाची बॉडी व सिलेंडर वस्तीजवळ बसविण्यात येतो व हातपंपाच्या सिलेंडरपासून विहिरीपर्यंत २५ मि. मी. व्यासाचा एचडीपीई पाईप टाकून त्यास नॉन रिटर्न व्हॉल्व जोडून तो विहिरीत सोडण्यात येतो. हातपंपाव्दारे विहिरीतील पाणी वस्तीपर्यंत सक्शन पध्दतीने ओढले जाते. अशा पंपामुळे स्त्रियांचे कष्ट कमी होण्यास मदत होते. विशेषत: पावसाळयामध्ये पाणी आणणे अत्यंत सुलभ होते.

Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.