1 ) भू.स.वि.यं. काय आहे ?
भू.स.वि.यं. विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील भूजलांच्या संसाधनांच्या अन्वेषण, विकास आणि वाढीशी निगडीत आहे. यात मुख्यतः पाणीपुरवठा केलेल्या भूजल स्रोतांचा शोध करून, भूजल पातळीसाठी कृत्रिम रिचार्ज प्रकल्प, विशिष्ट अभ्यास संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाअंतर्गत बोर विहिरी / ट्यूबवेलचे ड्रिलिंग, अल्पवहन सिंचन कार्यक्रमा अंतर्गत तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते. भूजल उपस्थिती इत्यादीच्या तांत्रिक साहाय्याने विद्यमान भूजल संसाधनांचे संरक्षण करणे इ.
अभियांत्रिकी शाखा
1″ = 597 लिटर/तास.
अजून अधिकच्या माहितीसाठी ज्ञानकेंद्र – विंधन विहीर पाणी क्षमता चाचणी येथे पहावे.
विंधन विहीरीतील निश्चित केलेल्या वेगवेगळया भूस्तरामध्ये अतिउच्च पाण्याच्या दाबाचा वापर करुन भूस्तरातील/खडकातील भेगा, फटी विकसित करणे, विस्तारित करणे, भेगांची रुंदी वाढविणे या तंत्राला जलभंजन (हायड्रोफ्रॅक्चरींग) असे म्हणतात.
पाण्यासाठी विंधण विहिर खुदाईसाठी डीटीएच रीगचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो. डीटीएच म्हणजे डाऊन द हॅमर ड्रिलींग पध्दत. यामध्ये एअर हॅमर व बीट हे छिद्रात/ विंधण विहिरीत असते व त्याला बीट जोडलेले असते. हॅमर व बीट दोन्हीही विंधण विहिर खुदाई करतांना विंधण विहिरीत खाली राहत असल्याने या पध्दतीला डाऊन द हॅमर ड्रिलींग पध्दत (डी. टी. एच.) म्हटले जाते. या पध्दतीमध्ये हॅमर मधून निर्माण केलेली उर्जा पूर्ण क्षमतेने वापरात येते व विंधण कामाचा वेग वाढतो.
या पध्दतीच्या ड्रिलींगमध्ये मड पीट मधून मड पंपाव्दारे ड्रिलींग फ्लूईड वॉटर स्वीवेल – ड्रिल पाईप मधून छिद्राच्या तळाशी सोडले जाते. ड्रिलींग फ्लूईड हे पाणी आणि बेन्टोनाईटचे मिश्रण असते. योग्य पध्दतीच्या रोटरी ड्रिलींगसाठी या मिश्रणाची व्हिस्कॉसीटी (चिकटपणा) योग्य मर्यादेत ठेवण्याची काळजी घ्यावी लागते. बीट फिरवल्याने भूस्तरात छिद्र केले जाते आणि त्यामुळे मोकळे झालेले मटेरियल / कटिंगज् छिद्राच्या तळाशी सोडलेल्या ड्रिलींग फ्लूईड बरोबर बाहेर काढले जाते. बाहेर आलेले हे मिश्रण जमिनीवरुन सेटलींग पीट मध्ये सोडण्यात येते. या पीटमध्ये ड्रिलींग फ्लूईड सोबत आलेले कटिंगज् पीटच्या तळाशी जमा होते आणि डिलींग फ्लूईड मड पीट मध्ये पून्हा वापरण्यासाठी घेतले जाते. ढासळणाऱ्या भूप्रस्तरात ड्रिलींग फ्लूईड छिद्राच्या बाजूवर पूरेसा दाब निर्माण करुन छिद्राचे कॅव्हिटी (पोकळी) होण्याचे टाळते.
विंधनयंत्राद्वारे विंधन विहीर खेदतांना ज्या खोली पर्यंत माती लागते, तिथ पर्यंत माती विंधन विहीरीत ढासळू नये म्हणुन केसिंग पाईप घातले जाते. खोदलेली विंधन विहीर व केसिंग पाईपमधील मोकळया जागेतून जमिनीवरचे दुषित पाणी विंधन विहीरीत जाऊ नये म्हणुन केसिंग भोवती सिमेंटचे मिश्रण करुन सोडले जाते. त्याला ग्राऊटिंग म्हणतात. त्यामुळे जमिनीवरील दुषित पाणी विंधन विहीरींमध्ये जात नाही.
विंधन विहीरीमध्ये माती ढासळू नये, म्हणुन खडक लागेपर्यंत केसिंग पाईप टाकण्यात येतो. जमिनीखाली भूप्रस्तर रचनेनुसार केसिंग पाईप वापरावा लागतो. कोकणमध्ये माती लागण्याचे प्रमाणजास्त आहे. त्यामुळे तेथे केसिंग पाईप जास्त लागतो. मध्य महाराष्ट्रात साधारण २० ते ४० फुटापर्यंत खडक लागत असल्याने केसिंग पाईप कमी लागतो.
पिण्याच्या पाण्यासाठी विविध स्त्रोत जसे की, विहीर, विंधन विहीर, कुपनलिका वापरात असतात, पाणी पुरवठयाचे हे उद्भव कालांतराने कमी पाणी देतात. अशा स्त्रोतांचे पाणी क्षमता वाढविणे करीता विविध पारंपारिक /अपारंपारिक उपाययोजनांचा वापर करतात. त्यास स्त्रोत बळकटीकरण असे म्हणतात.
अशा बाबतीत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेत विकसित केलेले विविध उपाय योजना राबवून विंधन विहीरींचे स्त्रोत बळकटीकरण केले जाते.
Brushless Direct Current Motor.सौर उर्जेवर आधारीत पंपिंग योजनेत 10 अश्वशक्ती (HP) पर्यंत या मोटारीचा वापर करतात. A.C. पेक्षा या मोटारीची कार्यक्षमता जास्त असते.
सौर प्रणालीद्वारे निर्माण झालेली उर्जा ग्रीडला देणे व आवश्यकतेनुसार ग्रीड वरुन घेणे. नळ पाणी पुरवठा योजनेवरील सौर उर्जेवर आधारीत पंपीगसाठी ही प्रणाली उपयुक्त आहे. यामुळे पंप पूर्ण वेळ क्षमतेने पाणी उपसा करतो.
कंट्रोल बॉक्समध्ये प्राधान्याने सौर उर्जा घेऊन कमी पडलेली उर्जा ग्रीडमधून घेवून त्यावर पंप चालतो. त्याला हायब्रीड सिस्टीम म्हणतात.
नेट मिटरिंगमध्ये विद्युत पुरवठा खंडीत झाल्यावर सौर उर्जा उपलब्ध असूनही त्याचा वापर करता येत नाही. संपुर्ण कार्यप्रणाली बंद पडते. नेट मिटरिंग प्रणाली कार्यरत करण्यासाठी MSEB चे नाहरकत प्रमाणपत्र लागते. हायब्रीड प्रणालीची अंमलबजावणी करणेसाठी MSEB चे नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
रेखा अंशानुसार दक्षिण दिशेला झुकलेला असावा.
सौर पंपाची क्षमता लिटर प्रती दिवसमध्ये मोजतात. सौरपंपाची क्षमता प्रति तास न मोजता दिवसाला मोजली जाते. कारण सौर उर्जेची निर्मिती, सकाळ, दुपार, संध्याकाळ वेळेनुसार कमी जास्त प्रमाणात होते.
1 kw/m२ च्या पॅनेलकडून दिवसाला सरासरी 4-5 kw/m२ प्रती दिन उर्जा मिळते. ऋुतुमानानुसार जागेच्या स्थळानुसार त्यामध्ये बदल होतो.
१. Stand Alone 2. Grid Connected
एकाच विंधन विहीरीमध्ये हातपंपासोबत सबमर्सिबल पंप बसवून कार्यरत केला जातो.
पाणी गुणवत्ता
पाण्याची भैतीक, रासायनिक व जैविक तपासणी करून पाण्याची उपयुक्तता निश्चित करणे .
होय. भूसवियंच्या विभागीय, जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची तपासणी केली जाते.
पाणी नमूना तपासण्याची सविस्तर माहिती भूसवियंच्या विभागीय, जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये प्रत्यक्ष किंवा दुरध्वनीद्वारे मिळेल.
शासन निर्णयानुसार वेळोवेळी घटकनिहाय फी निश्चित केली जाते त्यानुसार फी भरणे आवश्यक आहे.