राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प जलविज्ञान प्रकल्प टप्पा-2 चा पुढील टप्पा म्हणजेच राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प आहे. राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प हा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातील महाराष्ट्र भूजल या घटकाची अंमलबजावणी करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही अंमलबजावणी यंत्रणा आहे. सदरील प्रकल्प हा 8 वर्षाच्या कालावधीसाठी असून, त्यास रुपये 27.00 कोटीची केन्द्र शासनाची मान्यता मिळालेली आहे. सदर प्रकल्पामध्ये खालील घटकाचा समावेश आहे.
Component A – जलसंपत्तीबाबत माहिती संपादित करणे (Water Resources Data Acquisition) Component B – जलसंपत्ती माहिती प्रणाली तयार करणे (Water Resource Information System) Component C – जलसंपत्तीचे नियोजन व व्यवस्थापन करणे (Water Resources Operation and planning) Component D- संस्थात्मक क्षमता उंचावणे (Institutions Capacity Enhancement)
राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे स्वयंचलित संयंत्राची (Digital Water Level Recorder) उभारणी करण्यात आली. कठीण पाषाणात खोदण्यात आलेल्या मोठ्या रुंदीच्या विहिरींवरती स्वयंचलित संयंत्र बसवण्याचा हा देशातील पहिल्याच नाविन्यपूर्ण प्रकल्प आहे, यामधे अस्तित्वातील निरिक्षण विहिरीवरती एकूण 336 संयंत्रांची यशस्वी उभारणी करून त्याची माहिती डेटा सेंटरमधे व WIMS या वेब पोर्टल वरती यशस्वीरित्या लिंक करण्यात आलेली आहे.
या उपक्रमामुळे राज्यभरातून प्रत्येक तालुक्यातील निरीक्षण विहिरींची भूजल पातळीची दर सहा तासाला वेळ सापेक्ष माहिती प्राप्त होते. या माहितीचा उपयोग सर्व नागरिकांना माहिती करून देणे, जलसुरक्षा आराखडा बनविणे आणि विविध भूजल विषयी धोरण आखणे इत्यादींकरिता करण्यात येणार आहे.
https://indiawris.gov.in/wris/#/
या संकेत स्थळावर याबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे
राज्याचे ‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ (डेटा सेंटर) उभारणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. या भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रामध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त अशी यंत्रणा, विविध यंत्र – सामग्री देण्यात आलेली आहे या भूजल माहिती तंत्रज्ञान केंद्रामार्फत भूजल विषयी सर्व माहितीचे संकलन आणि विश्लेषण करून ही माहिती राज्याला वेळोवेळी भूजलाचे नियंत्रण, घ्यावयाचे निर्णय आणि एकूणच भूजल व्यवस्थापना मध्ये मुख्य कामकाज होणार आहे.
अस्तित्वातील इमारतीचे नूतनीकरण देखील एक वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आले. यामध्ये सुसज्ज असा यंत्रणांनी युक्त बैठक व प्रशिक्षण कक्षाचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
जलधर क्षमता चाचणी करिता दोन मोबाईल वाहने तयार करण्यात आली आहेत. यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया व येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यात आले. अशा प्रकारची क्षमता चाचणीचे वाहन तयार करणे हा देखील देशातील सर्वप्रथमच प्रयोग करण्यात आला. जलधर क्षमता साठी लागणारे सर्व साहित्य जसे की पंप, फ्लोमीटर, जनरेटर व अनुषंगिक व्यवस्था इत्यादीची उभारणी केलेली आहे. या वाहनांची क्षेत्रीय अंमलबजावणी सुरु आहे.
राज्यातील भूजल संपत्तीचे एकात्मिक पद्धतीने सनियंत्रण व व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या निर्णय आधार प्रणालीचे (Decision Support System) कामकाज सुरू आहे. सदर प्रणाली ही महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे. यामधे विंधण विहिरींची नोंदणी व ट्रॅकिंग करणे; शहरी व ग्रामीण भागातील विहिरींची नोंदणी करणे; भूजल उपसा व इतर महत्त्वाची ना-हरकत प्रमाणपत्रे देणे; MIS-GIS dataset तयार करुन भूजल व्यवस्थापनाचे विविध मॉडेल तयार करणे; संभाव्य पेयजल टंचाईचे मॉडेल तयार करणे; शहरी भागाकरिता भूजल पुर्नभरण नकाशे तयार करणे; India WRIS चे धर्तीवर भूजलाचे पोर्टल विकसित करणे अशी विविध उद्दिष्ट आहेत. एकूण ९ मोबाईल अॅप व ३३ वेब मोड्युल तयार करण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील कामकाज पूर्ण केले आहे. भूजल संपत्तीकरिता समर्पित अशी निर्णय आधार प्रणाली तयार करणे हा देखील देशातील पहिलाच उपक्रम आहे
भूजलाच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता जनजागृती आणि जलसाक्षरता होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत सर्व विभागांमध्ये ‘भूजल साक्षरता व जनजागृती कार्यशाळा घेण्यात येतात. प्रत्येक महसुली विभागामध्ये या कार्यशाळांचे आयोजन करून यामध्ये शहरी भागातील नागरीक, विद्यार्थी, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, जलसुरक्षक, ग्रामस्थ, महिला इत्यादींचा सहभाग लक्षणीय पद्धतीने दिसून येतो. या कार्यशाळांमध्ये भूजल / पाणी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात येते.
विविध विषयावर विचारमंथन कार्यशाळा राष्ट्रिय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत विविध विषयावर विचारमंथन कार्यशाळांचे आयोजन केले जाते.
पार पडलेल्या काही मुख्य कार्यशाळा खालीलप्रमाणे आहेत.
Urban groundwater recharge and management
Avenues of AI/ML in groundwater
Exploring deep aquifers
जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च २०२३ रोजी पाणी क्षेत्रात महिलांचा सहभाग’ या महत्त्वाच्या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करून भूजल भवन येथे महिला दिन साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामधे महाराष्ट्र राज्याचा भूजल विभाग देशात प्रथम क्रमांकावर आहे. याबाबत जागतिक बँकेकडून गौरव चिन्ह देऊन हैदराबाद येथे जागतिक बँकेमार्फत झालेल्या मिशन आढाव्यामधे सन्मान चिन्ह देऊन यंत्रणेस सन्मानित करण्यात आले.
Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.