GSDAGSDAGSDA

स्त्रोत बळकटीकरणाच्या उपाय योजना

  • Home
  • स्त्रोत बळकटीकरणाच्या उपाय योजना
स्त्रोत बळकटीकरणाच्या अपारंपारीक उपाय योजना :-
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडुन अपारंपारीक उपाययोजनांचा वापर करुन स्तित्वातील भूजल स्त्रोतांचे बळकटीकरण करुन त्याची क्षमता वाढविण्यासाठी खालील योजना राबविण्यात येतात. आतापर्यंत केलेले प्रकल्प
१. फ्रॅक्चर सिल सिमटेशन (एफ.एस.सी.) १००१
२. जॅकेटवेल टेक्नीक (जे. डब्ल्यु.टी.) ६४१
३. बोअर ब्लास्ट टेक्नीक (बी.बी.टी.) ५४९
फ्रॅक्चर सिल सिमेंटेशन :- भूशास्त्रीय आणि भौगोलिक परिस्थितीप्रमाणे, काही स्थळी नाल्याचे खालील प्रस्तरातून सतत भूजल वहन होत असते. त्यामुळे नाल्याचे बाजूस असलेल्या उद्भव विहिरीस आवश्यक प्रमाणात पाणी उन्हाळयापर्यंत उपलब्ध राहत नाही. भूजलाचे वहन रोखल्यास, हे वाहून जाणारे भूजल, विहिरी नजिकचे परिसरात साठून राहून विहिरीत आवश्यकतेप्रमाणे पाझरते आणि पर्यायाने पाण्याच्या साठयात वाढ होण्यास मदत होते. प्रस्तुत, प्रकल्पांतर्गत उद्भव विहिरींच्या खालच्या बाजूस ठराविक अंतरावर नाल्याच्या पात्रात पक्क्या        प्रस्तरापर्यंतच्या खोलीची विंधण छिद्रे घेण्यात येतात. सदर विंधण छिद्रात उच्च दाबाने सिमेंटचे द्रावण    सोडण्यात येते, जॅकेटवेल भूप्रस्तरातील भेगा व सांधे सिमेंटमुळे बूजविले जावून भूपृष्ठाखाली भूमिगत     बंधा-यासदृष्य जलावरोधी भिंत तयार होते, त्यामुळे भूजल साठयात वृध्दी होते. बोअर ब्लास्ट टेक्निक :- जास्त किंवा निश्चित पर्जन्यमान असूनही काही भागातील उद्भव भूस्तरातील सच्छिद्रता कमी     असल्याने कोरडे पडतात. असा भूस्तर कृत्रिमरित्या सच्छिद्रकरुन, त्यांची साठवण क्षमता वाढविणे हा या  प्रकल्पाचा मुख्यउद्देश आहे. या तंत्रामध्ये उद्भवाच्या परिसरामध्ये आवश्यक त्या खोलीची विंधण छिद्रे     घेऊन त्यामध्ये सुरुंगाव्दारे स्फोट करण्यात येतो. स्फोटामुळे परिसरातील भूस्तर सच्छिद्र होवून त्याची    साठवण क्षमता वाढल्याने पेयजल उद्भवास अतिरिक्त भूजल उपलबध होते.
Bore blast technique
Boreholes for blasting
Source well
Underground bandhara
Highly weathered zone soil
Top view
Ground level
Boreholes for blasting
Source well
Moderately weathered zone
Highly weathered zone
Section a-a
Boreholes for FSC
बोअर ब्लास्ट टेक्निकचे दोन प्रकार आहेत. १.  जॅकेट वेल २. स्‍ट्रीम ब्लास्टिंग .   जॅकेटवेल:- नळ पाणी पुरवठा योजनेच्या उद्भवाची स्थिती, त्या भागातील भूस्तरावर अवलंबून असते.          भूपृष्ठाखालील सच्छिद्र पाषाणस्तर पाणी साठवून ठेवतात आणि भेगा, फटी, सांधे असलेले प्रस्तर हे      भूजल वाहून नेण्यासाठी मदत करतात. उद्भव विहिरी भोवतीच्या परिसरात नैसर्गिक प्रक्रियेमुळे अशा       प्रकारची अनुकूल भूशास्त्रीय परिस्थिती असल्यास, भूजल पुनर्भरण प्रक्रियेने विहिरीस पुरेशा प्रमाणात      पाणी उपलब्ध राहते. मात्र काही ठिकाणी खडकातील सच्छिद्रता मुळातच कमी असते, तसेच भेगा   किंवाफटी एकमेकांशी नैसर्गिकरित्या जोडल्या गेलेल्या नसतात, त्यामुळे पाण्याचा साठा आणि  वहन प्रक्रिया  मंदावते. परिणामत: उद्भव विहिरीस पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही आणि कालपरत्वे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. खडकांमध्ये कृत्रिमरित्या सच्छिद्रता निर्माण करुन उद्भव विहिरीची पाणी पुरवठयाची क्षमता          वाढविण्यासाठी जॅकेटवेल या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. या प्रकल्पांतर्गत उद्भव विहिरीभोवतीच्या  परिसरात भूशास्त्रीय परिस्थितीप्रमाणे वर्तुळाकारात विंधणछिद्रे घेवून विहिरीभेवती एक प्रकारे जॅकेट       तयार करण्यात येते. विंधण छिद्राची खोली विहिरीच्या खोलीपेक्षा थोडी कमी असते.                        सदरविंधण छिद्रांमध्ये दारूगोळाभरुन स्फोट करण्यात येतो. त्यामुळे भूपृष्ठाखालील स्तरांची सच्छिद्रता  वाढून भेगा व फटी विहिरीशी जोडल्या जातात. त्यामुळे भूजल वहन प्रक्रियेचा वेग वाढून विहिरी भोवतीच्या प्रस्तरातील भूजल विहिरीत पाझरते. पर्यायाने विहिरीच्या पाणी पुरवठा क्षमतेत वाढ होते. स्ट्रीम ब्लास्टिंग :- पिण्याच्या पाण्याचा उद्भव विहिरी बहुतांश नाल्याच्या काठावर असतात. काही ठिकाणी नालापात्राच्या भूपृष्ठाखालील भूजल वहन प्रणाली, विहिरींशी जोडली गेली नसल्याने त्यातून वाहून               जाणा-या भूजलाचा उपयोग उद्भव विहिरीस होत नाही. स्ट्रीम ब्लास्टिंग या तंत्रामध्ये नालापात्रात, भूशास्त्रीय दृष्टीकोनातून आवश्यक त्या प्रमाणातविंधण छिद्रे घेण्यात येतात व त्यामध्ये दारुगोळाभरुन स्फोट करण्यात येतो. त्यामुळे नालापात्रतील भूप्रस्तरात      कृत्रिमरित्या भेगा व फटी निर्माण होऊन, तसेच अस्तित्वात असलेल्या भेगा व फटींचा विस्तार होऊन     अतिरिक्त भूजल साठा निर्माण होण्यास मदत होते, आणि त्याचा लाभ नालाकाठावरील उद्भव विहिरीस  होतो.
Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.