GSDAGSDAGSDA

Aurangabad

छत्रपती संभाजीनगर विभागाची संक्षिप्त माहिती

 प्रस्तावना :

           मराठवाडा विभागात आठ (8) जिल्हयाचा समावेश आहे. प्रादेशिक मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. हा प्रदेश 17० 371   ते 20० 391   उत्तर अक्षांश ते 74० 331  ते  78० 221   पुर्व रेखांश दरम्यान आहे. भौगोलिक क्षेत्रफळ 64,590 चौ.कि. मी.आहे. या विभागात एकूण 76 तालुक्यांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजनगर विभागाची ठळक वैशिष्टये :

अ.क्र.

बाब

वैशिष्टये

1

एकूण जिल्हे

08

2

एकूण तालुके

76

3

एकूण गावे/वाडया

8051 / 4037

4

क्षेत्रफळ

64,590 (महाराष्ट्राच्या 21.06 %)

5

लोकसंख्या

1.87 कोटी (महाराष्ट्राच्या 13.87 %)

6

पर्जन्यमान (मी.मी.)

720

7

प्रमुख नद्यांचे खोरे

गोदावरी, पूर्णा, मांजरा, सिंदफना,कयाधू

8

भूस्तर

99 % बेसाल्ट प्रदेश

1% गाळाचा प्रदेश

9

निरीक्षण विहिरी (नियमित)

875

10

निरीक्षण विहिरी (जलस्वराज्य-2)

6377

2.भूगोल:

          हा प्रदेश पठारावर वसलेला आहे आणि त्यात सपाट भूभाग व खाच-खळगे आहेत.  हा प्रदेश राज्याच्या मध्यभागी आहे. या प्रदेशातून गोदावरी ही मुख्य नदी वाहते जी ‘दख्खन गंगा’ म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यात अनेक मोठे आणि लहान प्रकल्प समाविष्ट आहेत. या प्रदेशात अजंठा आणि बालाघाट पर्वतरांगांचा विस्तार देखील आहे. हा प्रदेश उत्तरेला अमरावती प्रदेश, पश्चिमेला नाशिक प्रदेश, दक्षिणेला पुणे प्रदेश आणि दक्षिण आणि आग्नेयेला कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांनी वेढलेला आहे. या प्रदेशात खूप अनियमित व कमी पाऊस असून सलग दोन पावसांमधील कालावधी जास्त असतो.

3.भूविज्ञान :

     या प्रदेशात कठीण पाषाण (Deccan Tarp) ने व्यापलेला आहे. नांदेड जिल्हयात ग्रॅनाईट आणि विंध्यन या रूपांतरित खडकांचे अवशेष आढळतात. डेक्कन ट्रॅप्स हे अप्पर  क्रिटेशियस ते खालचा इओसिन या युगातील आहेत. प्रत्येक लावा प्रवाहाची जाडी काही मीटर ते 40-45 मीटर पर्यंत बदलते. बेसाल्ट हे वेसिक्युलार, झिओलिटिक,सांध्यासारखे,स्तंभीय स्वरूपात असतात जे झिजलेल्या अवस्थेत आढळून येतात. प्रमुख  नदयांच्या काठावर डेक्कन ट्रॅप्सच्या वर  गाळाचे साठे आढळतात.

  1. जलविज्ञान:-

  या खडकाची भूजल धारण क्षमता (पार्यता व पारगम्यता) त्याच्या विघटनाच्या प्रमाणावर,त्यामध्ये निर्माण झालेल्या संधी यावर अवलंबून असते. मुख्य नद्यांच्या काठाच्या क्षेत्रामध्ये या खडकावर स्थानिक गाळाचा थर आढ़ळतो. असा गाळाचा (वाळूचा) थर भूजल धारण करण्यास उपयुक्त आहे तथापि त्याचे व्याप्त क्षेत्र अत्यल्प आहे. या प्रदेशात भूजल मुख्यत: सांधि आणि अस्थिभंग आणि बेसॉल्टिक लावाच्या वाहत्या भागामध्ये येते. या विभागाचे क्षेत्र बहुस्तरीय  दक्षिणी कातळ (बेसाल्ट)  खडकाने व्यापलेले आहे व संधीयुक्त बेसाल्ट हा मुख्य जलधारक असून त्याची भूजल धारण अथवा देण्याची क्षमता त्याच्या एकुण घनमानाच्या 1 ते 3 टक्के पर्यंत मर्यादित आहे.

  1. ऐतिहासिक:

मराठवाडा ऐतिहासिकदृष्टया निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी  महाराष्ट्र राज्यात विलिन झाला. स्वामी रामानंद तिर्थ यांनी अहिंसक चळवळीमुळे मराठवाडयाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

            रामायण आणि महाभारताच्या काळात  विशेषत: लातूर, जालना इत्यादी ठिकाणी या प्रदेशाचे अवशेष आढळतात. अशोक साम्राज्याने बराच काळ या प्रदेशावर राज्य केले. त्यानंतर सातवाहन आणि राष्ट्रकुट यांचे राज्य अस्‍तित्वात आले.  विविध लेण्या, मंदिरे, स्मारके आणि किल्ले इत्यादीव्दारे हया प्रदेशाच्या इतिहासाचे ठसे आढळतात.

6.सांस्कृतिक:-

       या प्रदेशाला महान सांस्कृतिक वारसा लाभला आहे. लातूर जिल्हयातील सिध्देश्वर यात्रा, नांदेड जिल्हयातील मराठी साहित्य संमेलन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील वेरूळ महोत्सव हे या प्रदेशातील सांस्कृतिक उपक्रमांचे मुख्य आकर्षण आहेत.

             संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान नरसी (नामदेव), संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान आपेगाव, संत जनाबाईचे जन्मगाव गंगाखेड, शिर्डीच्या साईबाबांचे जन्मगाव पाथरी, संत एकनाथांचे पैठण,समर्थ रामदासाचे जन्मगाव जांब, देवीचे शक्तीपीठ माहूर, ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ, ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर, शीख धर्मीयांचा नांदेड येथील सचखंड गुरूव्दारा इत्यादी धार्मिक स्थाने य विभागात येतात.

आशिया खंडातील पहिली प्राचीन लेणी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पितळखोरे येथे  पूर्ण आकारातील या बौध्द लेण्या आहेत.

  1. पाणी गुणवत्ता तपासणी :

               भूजलाची गुणवत्ता तपासणीसाठी  एप्रिल 1988 पासून प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर  यांच्या ‍ अधिपत्याखाली विभागीय रासायनिक  प्रयोगशाळा  स्थापना झालेली आहे. प्रयोगशाळेच्या स्थापनेचे मुख्य उद्दिष्ट भूजल गुणवत्तेची तपासणी करून पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व उद्योगधद्यांसाठी योग्य आहे किंवा नाही याची शिफारस करणे, हा आहे.

          या विभागात 1 विभागीय, 8 जिल्हास्तरीय व 31 उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत. या प्रयोगशाळेमध्ये पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक गुणवत्ता तपासणी करण्यात येते. सध्या विभागात  कार्यरत  असलेल्या प्रयोगशाळेच्या इमारती व NABL बाबतचे सदयस्थिती खालीलप्रमाणे आहे.

प्रयोगशाळा स्तर

प्रयोगशाळाची संख्या

स्वतंत्र शासकीय इमारती  मध्ये  कार्यरत

आरोग्य विभागाचे आवरात कार्यरत

खाजगी  इमारती  मध्ये  कार्यरत

NABL प्रमाणित

विभाग़ीय

1

1

0

0

1

जिल्हा

8

8

0

0

8

उपविभागीय

31

0

22

9

31

 

Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.