जिल्हा छत्रपती संभाजीनगर
प्रस्तावना:
छत्रपती संभाजीनगर जिल्हयामध्ये भूजल संपत्तीचा अभ्यास करणेकरीता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे जिल्हयातील 03 उपखो-यांचे विभाजन 52 पाणलोट क्षेत्रामध्ये करुन प्रत्येक पाणलोट क्षेत्रामधील पाणवहन, पुनर्भरण आणि साठवन उपक्षेत्रातील भूजल पातळीचे प्रतिनिधीत्व करेल अशा 141 निरीक्षण विहीरी निश्चित केलेल्या आहेत. सदर पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या विहिरीमधील भूजल पातळीच्या अभ्यासाआधारे (एक जलवर्षातुन चार वेळा , माहे सप्टेंबर, जानेवारी ,मार्च व मे ) पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत संभाव्यता वर्तविली जाते. मात्र , जिल्हयाची भौगोलीकता, भुशास्त्रीय संरचना आणि दिवसंदिवस वाढता भूजल उपसा या बाबी विचारात घेवुन जिल्हयातील गाव पातळीवरील भूजल पातळीचे विचलन कळणेकरीता जलस्वराज्य-2 प्रकल्पांतर्गत जिल्हयातील 1267 गावांमध्ये निरीक्षण विहीरीचं जाळे विस्तारण्यात आले आहे. जिल्हयामध्ये पहिल्यांदाच एवढया मोठया संख्येत निरीक्षण विहीरीमधील भूजल पातळीचा अभ्यास करण्यात आलेला आहे.
भूजलाची क्षेत्रीय उपलब्धता ही पर्जन्यमान, भौगोलीक परिस्थिती , भुशास्त्रीय रचना, आणि भूजलाचा वापर (उपसा) यावर अवलंबुन असुन याबाबतची संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे आहे.
स्थान:
हा जिल्हा १९०१५’ ते २००4०’ उत्तर अक्षांश आणि ७4०३७’ ते ७५०५२’ पूर्व रेखांश दरम्यान आहे. याच्या उत्तरेस जळगांव जिल्हा, पश्चिमेस नाशिक जिल्हा, अहमदनगर,बीड ही जिल्ह्याची अनुक्रमे दक्षिण आणि पूर्वेस परभणी आणि बुलढाणा जिल्हा सीमा आहेत. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १०१०७ किमी२ आहे.
पर्जन्यमान :-
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त तालुकानिहाय वार्षिक सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी उपलब्ध करुन त्याची तुलना चालु वर्षी झालेल्या तालुकानिहाय पर्जन्यमानाशी केली जाते.
पर्जन्यमानाच्या क्षेत्रीय वैविध्यतेवरुन जिल्हयाची तालुका निहाय विभागणी खालील प्रमाणे तीन पर्जन्यक्षेत्रा मध्ये करण्यात आलेली आहे.
1. छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पर्जन्यक्षेत्र विभागणी
अ.क्र. पर्जन्यक्षेत्र वर्गवारी वार्षिक सरासरी पर्जन्यमान क्षेत्र
1 शाश्वत पर्जन्यमान प्रदेश 700 ते 1200 मि.मी. सिल्लोड , सोयगाव , खुलताबाद
2 अवर्षण प्रवण प्रदेश 700 मि.मी. पेक्षा कमी छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, गंगापुर, पैठण, वैजापुर, कन्नड
2. भौगोलिक संरचना :-
छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा दख्खनच्या पठाराने बनलेला असून प्राकृतिक दृष्ट्या जिल्ह्याचे खालीलप्रमाणे तीन प्रमुख भाग आहेत.
1 .अतिविच्छेदित व डोंगराळ भाग
2. पठारी भाग
3 सपाट व नदीलगतचा भाग
भूजल उपलब्धत्तेच्या दृष्टीने या चार भागांचे वर्गीकरण खालीलप्रकारे करता येईल-
1. अतिविच्छेदित व डोंगराळ भाग – डोंगरी भागात प्रामुख्याने असलेले पाणलोट क्षेत्र यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हयाच्या उत्तरेकडील भागातील कन्नड सिल्लोड सोयगाव या तालुक्यामध्ये एकुण 11 पाणलोट क्षेत्राचा समावेश होता. यामध्ये सहयाद्री पर्वतरांगाचा पुर्वेकडील टेकडया, डोंगररांगा याचा समावेश होतो. हा प्रदेश रन ऑफ झोन (A) या वर्गवारी मध्ये मोडतो. या प्रदेशामध्ये भुजल उपलब्धता कमी असते.
2. पठारी भाग – छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील एकुण 52 पाणलोट क्षेत्रापैकी 32 पाणलोट क्षेत्र पठारीभागात आहे. यामध्ये प्रामुख्याने सिल्लोड व कन्नड तालुक्याचे दक्षिणेकडील भाग , फुलंब्री ,छत्रपती संभाजीनगर,वैजापुर, व गंगापुर या तालुक्याचा समावेश होतो हा सर्व भुभाग रिचार्ज झोन (B) या वर्गवारी मध्ये मोडतो. या पठारी भागामध्ये भुजलाची मध्यम व काही भागामध्ये चांगली असते अशा प्रकारची आढळुन आली आहे.
3. सपाट व नदीलगतचा सखल भाग u छत्रपती संभाजीनगर ü जिल्हयातील एकुण 9 पाणलोट क्षेत्र यामध्ये वर्गीकृत होतात. हि पाणलोट क्षेत्र प्रामुख्याने वैजापुर, गंगापुर व पैठण तालुक्यातील दक्षिण भाग या तालुक्यांचा
समावेश होतो. यामध्ये जमिनीचा उतार अंत्यंत कमी असलेने तसेच काहि भाग सखल असल्याने भूगर्भात पाणी मुरण्याचे व साठवून ठेवण्याचे प्रमाण जास्त आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील प्रमुख नदी गोदावरी असुन तिच्या तीन उपनदया (शिवना, गिरजा, पुर्णा) आहेत. जिल्हयाचा 80 टक्के भाग गोदावरी खो-यात येत असुन सोयगाव व सिल्लोड तालुक्यातील 20 टक्के क्षेत्र तापी खो-यात येते. या उपखो-यांची विभागणी 52 पाणलोट क्षेत्रामध्ये करण्यात आलेली असून प्रत्येक क्षेत्राची विभागणी पाणवहन (A-Zone), पुनर्भरण(B-Zone), साठवण क्षेत्र (C-Zone) यामध्ये करण्यात आलेली आहे. क्षेत्रनिहाय क्षेत्रफळ खालीलप्रमाणे आहे.
अ) अतिविच्छेदीत व डोंगराळ भाग प्रामुख्याने असलेले
पाणलोट क्षेत्र (11) (Run off Zone) = 1353.15 हे.- 13% – ‘A’ Zone
ब) पठारी भाग प्रामुख्याने असलेले पाणलोट क्षेत्र (32)(Recharge Zone) = 7274.96 हे. – 68%-‘B’ Zone
क) सपाट व नदी लगत असलेले पाणलोट क्षेत्र ( 9) (Storage Zone) = 1968.36 हे. – 19%- ‘C’ Zone
भूशास्त्रीय संरचना :-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे क्षेत्र बहुस्तरीय दक्षिणी कातळ (बेसाल्ट) खडकाने व्यापलेले आहे. या खडकाची भूजल धारण क्षमता (पार्यता व पारगम्यता) त्याच्या विघटनाच्या प्रमाणावर,त्यामध्ये निर्माण झालेल्या संधी यावर अवलंबून असते. जिल्ह्यातील मुख्य नद्यांच्या काठाच्या क्षेत्रामध्ये या खडकावर स्थानिक गाळाचा थर आढ़ळतो. असा गाळाचा (वाळूचा) थर भूजल धारण करण्यास उपयुक्त आहे तथापि त्याचे व्याप्त क्षेत्र अत्य»¯Ö आहे. जिल्ह्यामध्ये विघटित व संधीयुक्त बेसाल्ट हा मुख्य जलधारक असून त्याची भूजल धारण अथवा देण्याची क्षमता त्याच्या एकुण घनमानाच्या 1 ते 3 टक्के पर्यंत मर्यादित आहे.
भूजलाचा वापर (उपसा ) व पाणी टंचाईची कारणे :-
भुजल पातळी खोल जाणे व पाणी टंचाई उदभवणे हे मुख्यत्वे खाली घटकांवर अवलंबुन आहे.
पर्जन्यमानातील स्थळ व वेळ सापेक्ष दोलायनमानता (Spatial and temporal Variation) आणि दोन पावसामधील खंड पडल्यास ज्यांच्याकडे सिंचनाची सोय (विहीरी) उपलब्ध आहे असे शेतकरी खरीप पिकांसाठी भूजलाचा उपसा करुन संरक्षित सिंचन देतात. त्यामुळे कमी पावसाचे वर्षी तसेच पावसामध्ये खंडाचे काळात मुख्यत्वे खरीप हंगामात सर्वसामान्य वर्षापेक्षा भूजलाचा उपसा जास्त होतो आणि त्यामुळे पर्जन्यमानाच्या तुलनेत भूजल पातळी वाढणे अपेक्षित असतांना त्यापूर्वी भूजल उपसा सुरु झाल्यामुळे मान्सुन्नोत्तर भूजल पातळीत अपेक्षीत वाढ होत नाही.
छत्रपती संभाजीनगर जिल्हयामध्ये प्रामुख्याने खालील नमुद बाबीमुळे भुजल उपलब्धतेसाठी मर्यादा आहेत.
भूजल उपलब्धतेच्या मर्यादा
• जिल्हयाच्या उत्तरेकडील अधिकांश भाग डोंगराळ ,अतिउताराचा व कठीण पाषाणाने व्यापलेला असल्याने पुनर्भरणास उपयुक्त नाही.
• मॅसिव्ह बेसॉल्ट फलो ब-याच ठिकाणी च्त्रपती संभाजीनगर,फुलंब्री, कन्नड चा काहीभाग पॉरफेरीटीक बेसाल्ट खड्काच्या प्रमाण जास्त असल्याने भूजल धारण क्षमतेच्या नैसर्गिक मर्यादा .
• जिल्हयाच्या पर्जन्यमानामध्ये सातत्याने तुट असल्याने परिणामी भूजल पातळी मध्ये मोठया प्रमाणात दिसुन येते.
अति-उपश्याचे ढोबळ कारणे
छत्रपती संभाजीनगर ü जिल्हयातील विशिष्ट भुशास्त्रीय सरचनेमुळे पडणा-या पावसाची ग्रहण करण्याची क्षमता भुस्तरामध्ये मुळातच अत्यंत कमी आहे. तसेच पर्जन्यमानाचे प्रमाण दरवर्षी सरासरीच्या तुलनेत कमी होते याचा परिणाम प्रामुख्याने भुजल पातळीतील घट होण्यामागे आढळुन येते अधिक तपशिलाने भुजल पातळीतील घट होण्यामागचे कारणे खालील प्रमाणे नमुद करण्यात येत आहे.
• पावसाची अनियमीतता अथवा कमी तिव्रता.
• मान्सुन महिन्यातील पडणा-या पावसातील खंड.
• जिल्हयातील काही भागात भूजल पूर्नभरणाला पुरक नसलेली भूशास्त्रीय सरंचना व पर्यायाने अति कमी प्रमाणात होत असलेले भूजल पुर्नभरण.
• नियमीत पर्जन्यमानात झालेली घट व त्यासोबत विविध साधनांनी उपसा केल्यामुळे खालावलेली भूजल पातळी.
• पर्जन्यमानातील सलग अनियमीततेमुळे पुर्नभरण व पर्यायाने भूजलात झालेली घट नंतर येणा-या वर्षात भरुन न येणे.
• नियमीतपणे विहिरींची व विंधन विहिरींच्या संख्येमध्ये होणारी लक्षणिय वाढ.
• पर्जन्यमानातील लहरीपणामुळे तसेच दोन पर्जन्यमानातील खंडामुळे खरीप पिकांसाठी होत असलेला अतिरिक्त उपसा (पिक पध्दतीतील बदल).
• रब्बी हंगामातील उत्पन्नाच्या अवाजवी अपेक्षेने जास्त पाण्याची आवश्यकता असलेली वाण (पिके) लावण्याची बदलेली पध्दत व त्यासाठी भूजलाचा अतिउपसा.
• सिंचनासाठी प्रवाहीत सिंचनापध्दतीचा मोठया प्रमाणात वापर.
सिंचनासाठी वापरण्यात येणारी पांरपारिक प्रवाही पध्दत व त्याद्वारे पाण्याचा होणारा अपव्यय :-
सुक्ष्म सिंचनावरील क्षेत्र अद्यापही मर्यादीत असल्यामुळे तसेच पारंपारिक पिकांसाठी 100% सुक्ष्म सिंचन व्यवस्था अस्तित्वात न आल्यामुळे ब-याच भागामध्ये प्रवाही पध्दतीने सिंचन केले जाते, त्यामुळे सुध्दा पाण्याचा मोठया प्रमाणात अपव्यय होतो.
पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन यांचा अभाव :-
पिक पध्दत निवड ही पाण्याच्या ( भूजल व भूपृष्ठीय ) उपलब्धतेच्या अनुसार केली जात नसल्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेमधील बदलाचा थेट परिणाम पिकांवर होतो. कमी पर्जन्यमानाच्या वर्षामध्ये धरणात कमी पाणी साठल्यामुळे लाभ क्षेत्रात अपेक्षित कोणतेही सिंचन होत नाही. तथापि त्या भागामध्ये उभ्या असणा-या पिकांसाठी भूजलाचा वापर मोठया प्रमाणात होतो परिणामी भूजलपातळी मध्ये मोठया प्रमाणात घसरण पहावयास मिळते. करीता प्रत्येक गावामध्ये पाण्याचा अंदाज (ताळेबंद) मांडुनच त्याच्या उपलब्धतेनुसारच पिक पध्दतीची रचना करणे अपेक्षीत आहे.
संभाव्य पाणी टंचाई अनुमान काढण्याची कार्यपध्दती :-
• छत्रपती संभाजीनगर जिल्हा भूजल (पिण्याचे पाण्याचे नियोजन) अधिनियम, 1993 व नियम 1995 मध्ये विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार पर्जन्यमानाचा व भुजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास करुन सन 1996-97 पासून दरवर्षी ऑक्टोबर महिण्यात माहे सप्टेंबर अखेर चालू वर्षात झालेले पर्जन्यमान व माहे ऑक्टोबर (सप्टेंबर अखेरील ) मधील भूजल पातळी यांचा सरासरी पर्जन्यमान व सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक अभ्यास करुन सरासरीपेक्षा पर्जन्यमानामध्ये झालेली वाढ अथवा घट व सरासरी भूजल पातळीत झालेली वाढ अथवा घट यांच्या अभ्यासाद्वारे संभाव्य पाणी टंचाई ( पिण्याच्या पाण्याची)अहवाल तयार करुन संभाव्य टंचाई कालावधी अनुमानातीत केला जातो. (तक्ता क्रं -02)
महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन ) अधिनियम 2009 मधील कलम 25 अन्वये सुध्दा पाणी टंचाई घोषित करण्याचे प्रयोजन करण्यात आलेले आहे.
तक्ता क्रं -02 संभाव्य पाणी टंचाई कालावधी अनुमानीत करण्याची पध्दती
अ.क्र. क्षेत्र सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत चालू वर्षाच्या पर्जन्यमानातील तुटीची टक्केवारी सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत चालू वर्षाच्या स्थिर भूजल पातळीतील घट संभाव्य टंचाई कालावधी
1 अवर्षण प्रवण व शाश्वत पर्जन्यमान क्षेत्र
(1200 मि.मी. पेक्षा कमी) 20 % पेक्षा जास्त 3 मी. पेक्षा जास्त ऑक्टोंबर पासून पुढे
2 ते 3 मी.जानेवारी पासून पुढे
1 ते 2 मी.एप्रिल पासून पुढे
0 ते 1 मी.नियंत्रणायोग्य टंचाई
छत्रपती संभाजीनगर जिल्हयामध्ये चालु पर्जन्यमान कालावधी म्हणजेच जुन ते ऑक्टोंबर या कालावधीमध्ये प्रामुख्याने पर्जन्यमान होत असते. ऑक्टोंबर अखेर झालेले पर्जन्यमान व भूजल पातळी याचा तुलनात्मक अभ्यास करुन संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात येतो तथापि चालु हंगामामध्ये ऑक्टोंबर महिन्यातही पर्जन्यमान झालेले असल्याने ऑक्टोंबर अखेरचे झालेले एकुण पर्जन्यमान व ऑक्टोंबर अखेरची निरीक्षण विहीरीची भूजल पातळी याचा तुलनात्मक अभ्यास करुन हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
संभाव्य पाणी टंचाई व त्याचा कालावधी निश्चित करण्यासाठी खालील महत्वाच्या तत्वांचा अंगीकार केला जातो.
• छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील भौगोलिक व भूस्तरीय रचनेमुळे ( Difference in porosity and permeability) सरासरी पर्जन्यमान होवून देखील वेगवेगळया तालुक्यांमध्ये भूजल पुनर्भरणाचे प्रमाण वेगवेगळे असते.
• वरील कोष्टकानुसार (अवर्षण प्रवण व शाश्वत पर्जन्यमान क्षेत्र ) मधील ज्या तालुक्यांमध्ये त्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत चालु वर्षामध्ये 20 % पेक्षा जास्त तूट आढळून आली असेल अशाच तालुक्यांमधील जर निरीक्षण विहीरींच्या चालू वर्षातील माहे सप्टेंबर मधील भूजल पातळीत सरासरी (मागील 5 वर्षाची ) भूजल पातळीच्या तुलनेत 1 मी. पेक्षा जास्त घट आढळून आल्यास कोष्टकात दिलेल्या घटीच्या तिव्रतेवरुन त्या त्या निरीक्षण विहीरींच्या प्रभाव क्षेत्रामधील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याचा संभाव्य कालावधी निर्धारित केला जातो.
• पर्जन्यामानामध्ये 20 % पेक्षा ü कमी पर्जन्यमानात तूट असल्यास त्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता कमी असते. तसेच सरासरीच्या तुलनेत भूजल पातळी 1 मी. पेक्षा कमी घट असल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता कमी असुन सदर टंचाई नियंत्रित ठेवण्यासारखी असते.
• 20% पेक्षा जास्त पर्जन्यमानात तूट असल्यास व 1 मी. पेक्षा जास्त भूजल पातळीत घट आढळल्यासच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे असे गृहीत धरुन भूजल पातळीतील घटीच्या वर्गवारीनुसार संभाव्य टंचाई कालावधी निर्धारित केला जातो.
• भूजल पातळीत 3 मी. पेक्षा जास्त घट असल्यास माहे ऑक्टोबर पासुन टंचाई भासते.
• भूजल पातळीत 2 ते3 मी. घट असल्यास माहे जानेवारी पासून पासुन टंचाई भासते.
• भूजल पातळीत 1 ते 2 मी.घट असल्यास माहे एप्रिल पासुन टंचाई भासण्याची शक्यता वर्तविली जाते.