भंडारा जिल्हाची संक्षिप्त माहिती
1.प्रस्तावना
भंडारा हा ‘भनारा’ या शब्दाचा अपभ्रंश असावा कारण रतनपुर येथील उत्खननात इ.स. 1100 मध्ये मिळालेल्या शिल्पलेखात ‘भनारा’ असा शब्द प्रयोग आढळतो. 1 मे 1999 रोजी ‘भंडारा’ जिल्हयाचे विभाजन करुन ‘गोंदिया’ जिल्हा अस्तित्वात आला. भंडारा जिल्हया हा तलावांचा जिल्हा ओळखला जातो.
महाराष्ट्राच्या ईशान्य भागात व वैनगंगा नदीच्या खोऱ्यात भंडारा होती. भंडारा तालुका मुख्यालय नंतर जिल्हा वसलेला आहे. जिल्हा उत्तर अक्षांश 20039″ ते 21035″ व पूर्व रेखांश 79030″ ते 8005″ या मध्ये पसरलेला असुन भारतीय सर्वेक्षण विभागाच्या 55 पी, 55 ओ, व 64 सी डिग्रीशिट मध्ये समाविष्ट आहे. जिल्हाच्या पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस गडचिरोली व चंद्रपूर, पश्चिमेस नागपूर व उत्तरेस मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हा आहे.
जनगणना 2011 नुसार भंडारा जिल्हयाचे क्षेत्रफळ 4087 चौ. किमी. असुन ते राज्याच्या क्षेत्रफळाच्या 1.3 टक्के एवढे आहे. भंडारा जिल्हा मुख्यत: 1011 चौ.किमी. (राखीव जंगल 551 चौ.किमी, संरक्षित जंगल 304 चौ.किमी व झुडूपी जंगल 156.600 चौ.किमी) जंगलाने व्यापलेला आहे.
भंडारा जिल्हयाचे प्रशासकीय दृष्टया जिल्ह्यात भंडारा, तुमसर आणि साकोली असे 3 उपविभाग आहेत व भंडारा जिल्हा हा सात तालुक्यात विभागला गेलेला असुन तालुके भंडारा, मोहाडी, लाखनी, साकोली, पवनी, तुमसर, लाखांदूर आहे. भंडारा जिल्हयाची एकुण लोकसंख्या 12,00,346 (2011 च्या जनगणनेनुसार ) असुन त्यापैकी 6,05,520 पुरुष व 5,94,814 स्त्रीया आहेत. जिल्हयातील एकुण लोकसंख्येपैकी ग्रामीण भागात 9,66,503 व नागरी भागात 2,33,831 लोकसंख्या आहे. जिल्हयाकरिता लोकसंख्येच्या प्रती चौ. किमी मधील घनता दर 294 माणसे एवढा असुन ग्रामीण भागातील 241 तर नागरी भागातील 3,232 इतका आहे. राज्याच्या तुलनेत जिल्हयाची लोकसंख्या ही 1.07 टक्के एवढी आहे. भंडारा जिल्हयात एकुण 871 गावे ,141 वाड्या व 80 गावे रिठी आहे.
2. हवामान आणि पाऊस
जिल्ह्याचे हवामान नैऋत्य मान्सून हंगाम वगळता, म्हणजेच जून ते सप्टेंबर वगळता संपूर्ण वर्षभर उष्ण उन्हाळा आणि सामान्यकोरडेपणाचे वैशिष्ट्य आहे. सरासरी किमान तापमान ६°C आणि सरासरी कमाल तापमान ४५°C आहे.जिल्ह्यात वार्षिक सरासरी पाऊस १२५० ते १५०० मिमी पर्यंत असतो. नैऋत्य मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात येतो. जून ते सप्टेंबर या कालावधीत होणारा पाऊस हा वार्षिक सामान्य पावसाच्या सुमारे ९० टक्के असतो. जुलै आणि ऑगस्ट हे मुसळधार पावसाचे महिने असतात, जुलै हा सर्वात जास्त पावसाचा महिना असतो.
3. जिल्ह्यातील भूपृष्ठीय स्थिती
भंडारा जिल्हयाचा भूभाग सर्वसाधारणपणे सपाट असुन उतार अल्प आहे. परंतु जिल्हयाचा उत्तरेकडील भाग सातपुडा पर्वताच्या श्रृखंलाद्वारे बनलेला आहे. त्यात भिमसेन, कोका, गंगाझरी इ. प्रमुख टेकडया आहेत. उत्तरेकडील भाग डोंगराळ असुन त्यात गायमुख, चांदपूर, अंबागड, गायखुरी डोंगराचा समावेश आहे. भंडारा जिल्हयाचे मध्य भागातील गायखुरी व आग्नेय भागातील प्रतापगडचा डोंगराळ प्रदेश, वायव्य भागातील अंबागडचा डोंगराळ प्रदेश व पश्चिम आणि दक्षिण तसेच पूर्व व ईशान्य भागातील वैनगंगेचा मैदानी प्रदेश आहे. जिल्हयात सर्वात कमी उंची जिल्हयाच्या दक्षिण पश्चिम भागात लाखांदूर तालुक्यात समुद्रसपाटीपासुन 213 मीटर आढळून येत असुन अधिक ऊंची समुद्रसपाटीपासुन 561 मीटर जिल्हयाच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात नवेगाव जवळ प्रतापगड येथे आढळून येते.
4. नदी नाले जाळे व पाणलोट क्षेत्रे
भंडारा जिल्हयात वैनगंगा (गोदावरी नदीचे उपखोरे) नदी ही सर्वात मोठी व महत्वाची नदी असुन ती जिल्हयात उत्तर-पूर्व भागात प्रवेश करुन दक्षिणेकडे चंद्रपुर जिल्हयात वाहत जाते. बावनथडी, सुर, मरु, चुलबंद आणि गाढवी या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. जिल्हयात एकुण 25 पाणलोट असुन या उपनद्यानिहाय पाणलोट पुढील प्रमाणे आहे.वैनगंगा नदीचे 8 पाणलोट, बावनथडीचे 3 पाणलोट, चुलबंदचे 8 पाणलोट, मरुचे 1 पाणलोट, सुरचे 5 पाणलोट तयार झालेले आहे.
5. जिल्ह्याची भूजल शास्त्रीय परिस्थिती
5.1 भूशास्त्रीय रचना :
भूशास्त्रीय दृष्टया भंडारा जिल्हा प्रामुख्याने अतिप्राचीन आरकीयन्स खडकाने व्यापलेला आहे. यामध्ये मुख्यत: रुपांतरित अग्निजन्य आणि रुपांतरित खडकांचा समावेश आहे. उदा. शिस्ट, फिलाईट, नाईस, ग्रेनाइट इ. खडकांचा समावेश आहे. गाळाचा प्रदेश लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील काही नदीकाठच्या भागात आढळून येतो. त्यास चौरासपट्टा असे संबोधले जाते. भंडारा जिल्हयातील भूशास्त्रीय रचना खालीलप्रमाणे आहे-
अ.क्र | वयोमान | भूस्तराचे नाव | क्षेत्र (तालुके) |
1 | रिसेंट व क्वाटर्नरी | ऍ़ल्यूव्हियम, लॅटेराईट,मृदा | जिल्हयात प्रमुख नदीच्या काठावरील प्रदेश |
2 | आर्कीयन | सॉसर ग्रुप | तुमसर, भंडारा, साकोली, पवनी |
3 | साकोली ग्रुप | लाखांदूर तालुका |
- साकोली ग्रुप : या भागात आढळून येणाऱ्या अतिप्राचीन खडकांचा समावेश होतो जसे फिलाईटस, सिस्टस, क्वार्टझाईटस , स्लेट, बॅन्डेड हेमॅटाईट क्वार्टझाईटस, नाईस वैगेरे या खडकांचे वैशिष्ट्य म्हणजे यात लोहाचे प्रमाण बरेच आहे. या ग्रुपचे खडक भुगर्भशास्त्रावरील साहित्यात भंडारा टॅ्रगल च्या नावाने प्रसिध्द आहेत. लोखंडाच्या खनिजाकरिता ह्या ग्रुपचे खडकांचे महत्व आहेत.
- सॉसर ग्रुप: या ग्रुप मध्ये अतिप्राचिन शिस्ट, नाईस, संगमरमर, डोलामाईट, ॲम्पीबोलाईट वैगेरे खडकांचा समावेश होतो. या खडकांचे वैशिश्ष्ट्य म्हणजे मैगनीजचे प्रमाण बरेच आहे. त्यामुळे मैगनिज धातुकरिता हया ग्रुपच्या खडकांवर बरेच संशोधन झालेले आहे.
- रिसेंट व क्वाटर्नरी फॉरमेशन्स : डोंगरगड ग्रुपच्या खडकानंतर (साधारणपणे प्रोटोझूईक/ विध्यन वयोमानानंतर) या जिल्हात नविन खड तयार झाले नाहीत दरम्यान या भागात झीज व विघटनाची प्रक्रीया ममोठया प्रमाणात झालेल्या आढळतात. त्यामुळे मृदा, लॅटेराईट व ॲल्युव्हीयम हे प्रस्तर जिल्हात सर्वदुर आढळुन येतात. ॲल्युमिनीयम जिल्ळ्यात मुख्यत: सर्वच प्रमुख नदीनाल्यांच्या काठांवर आढळून येतो. याची सर्वाधिक जाडी 20 ते 30 मी. असुन ती प्रामुख्याने लाखांदूर व पवनी नदी काठावरील भागात आढळते. या भुस्तराचा आधार चौरसाकृती असल्याने या परिसरातील चौरासक्षेत्र असे संबोधले जाते. हे क्षेत्र सिंचन विहिरींच्या बाबतीत जिल्हात सर्वाधिक विकसीत झाले आहे.
5.2 जिल्ह्याची भूजल शास्त्रीय माहिती:
भंडारा जिल्ह्यातील विविध प्रकारच्या जलधारक भूस्तरांची स्वभाव गुण वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. ग्रेनाईट नाईस, शिस्ट, फिलाईट, सँडस्टोन, क्वॉर्टझाईटस्, ऍ़डेसाईट, रायोलाईट या जलधारक भूस्तराची सच्छिद्रता, पाझर क्षमता देखील कमी असल्याने या जलधारक भूस्तराची विशिष्ट क्षमता फक्त 1% पावेतो आढळून येते. या जिल्ह्यात आढळून येणाऱ्या अतिप्राचीन भूस्तराचे विघटन प्रक्रियेमुळे क्ले मध्ये रुपांतर होऊन मुळ खडकावर याच्या मोठ्या जाडीचा थर जमा झाल्याचे आढळते. त्याची जाडी सरासरी 18 मी. ते 24 मी. एवढी आहे. त्यामुळे या भूस्तराच्या भूजल वहन क्षमता सच्छिद्रता, पाझर क्षमता यावर विपरीत परिणाम झालेला आहे. त्यामुळे या भागातील सिचंन विहिरीची क्षमता देखील अल्प आहे.
परंतू जिल्ह्यातील अस्तित्वात असलेला गाळाचा प्रदेश आणि अतिभेगाळ संधीयुक्त भूस्तरामध्ये विशिष्ट क्षमता, सच्छिद्रता, पाझर क्षमता व भूजल वहन क्षमता चांगल्या प्रकारे उपलब्ध असल्याने त्या भूस्तरामध्ये सिंचन विहिरीची घनता बऱ्यापैकी आढळून येते. परंतू सदर प्रकारचा भूस्तर जिल्ह्यामध्ये फार कमी प्रमाणात आढळून येते.
******