धाराशिव जिल्ह्याची माहिती
परिचय:
धाराशिव हे महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील एक जिल्हा आहे. या जिल्हयात मांजरा व तेरणा नदयाचे पाञ येतात. धाराशिव हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे आणि धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, भूम व परंडा अशा 08 तालुक्यांचा समावेश होतो. जिल्ह्यात एकूण 127 गावे आहेत.
स्थान:
हा जिल्हा 17.35’ ते 18.40’ उत्तर अक्षांश आणि 75.16’ ते 76.40’ पूर्व रेखांश दरम्यान आहे. जिल्हयाच्या नैऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येस अहमदनगर जिल्हा, उत्तरेला बीड जिल्हा, पुर्वेला लातूर जिल्हा व दक्षीणेला कर्नाटकातील बिदर व गुलबर्गा हे जिल्हे आहेत. जिल्हयाचा बहूतांश भाग खडकाळ तर उर्वरित सपाट आहे. जिल्हयाचा बहूतांश भाग बालाघाट नावाच्या डोंगर रांगानी व्यापलेला आहे. जिल्हयाचे एकूण क्षेञफळ 7,569 चौरस कि.मी. आहे. पैकी शहरी भागाचे क्षेञफळ 241.4 चौ. कि.मी. (एकूण क्षेञफळाच्या 3.21%) आणि ग्रामीण भागाचे क्षेञफळ 7271 चौ. कि.मी. (एकूण क्षेञफळाच्या 96.79%) आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 16,57,576 एवढी आहे. त्यापैकी 861535 पुरुष व 796041 स्त्रिया आहेत. ग्रामीण भागातील लोकसंख्या 1376519 आहे तर नागरी भागातील लोकसंख्या 281057 आहे. जिल्ह्याचे एकुण लोकसंख्येशी तालुकानिहाय लोकसंख्येच्या विभागणीची टक्केवारी उस्मानाबाद 24.48%, कळंब 13.13%, उमरगा 16.26%, तुळजापूर 16.82%, परंडा 8.46%, भूम 8.25%, वाशी 5.56% व लोहारा 7.04% आहे
हवामान आणि पाऊस:
धाराशिव जिहयाचे हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळयाचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान 600 ते 700 मिलीमीटर आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमट असते. डिसेंबर- जानेवारी शीत हवामानाचा कालखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते.
जमिनीचा प्रकार:-
जिल्ह्यातील जमिनीची विभागणी ढोबळमानाने दोन विभागात करणे शक्य आहे. पहिल्या विभागात काळ्या व सुपिक मातीचा थर असलेली काळीभोर सुपिक जमिन तसेच हलक्या प्रतीची जमीन आढळते. जमिनीच्या या वैशिष्ट्यामुळे या भागात खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिके घेतली जातात. कळंब व उस्मानाबाद या तहसील चा समावेश या विभागात होतो. या तहसीलच्या पुर्व भागात खरीप व पश्चिमे कडील भागात रब्बी पिके घेतली जातात. दुस-या विभागात प्रामुख्याने सुपिक जमिनीचा समावेश आहे. येथे मुख्यत्वे रब्बी पिके घेतली जातात
भूविज्ञान:
धाराशिव जिल्हा अग्निजन्य खडक घटकांनी अधोरेखित आहे.
भूगोल:
धाराशिव जिल्हा दक्षीण पठाराच्या क्षेञात येतो. जिल्हयाचा भाग खडकाळ उर्वरीत भाग सपाट असून धाराशिव जिल्हा हा समुद्रसपाटीपासून 600 मीटर उंचीवर आहे. हा जिल्हा बालाघाट डोंगर रांगाच्या लहान कक्षेत असून काही तहसील सपाट प्रदेशावर आहेत. जिल्हयाचा काही भाग गोदावरी नदीच्या खो-यात व काही भीमा नदीच्या खो-यात मोडतो. गोदावरी नदीची उपनदी मांजरा या नदीच्या खो-यात कळंब व वाशी तहसील आहेत. मांजरा नदीच्या तेरणा या उपनदीच्या कक्षेत उस्मानाबाद, उमरगा व लोहारा हे तहसील येतात. परंडा, भूम, तुळजापूर आणि उमरगा या तहसीलचा काही भाग सिना नदीच्या खो-यात मोडतो. सिना नदी ही भीमा नदीची उपनदी आहे.
जलविज्ञान:
जिल्ह्य़ातील मुख्य जलवाहक रचना म्हणजे जलोदर, डेक्कन ट्रॅप्स आहेत. डेक्कन ट्रॅप्स एक मल्टिपल अॅक्विफर सिस्टीम तयार करतात, जी ५५ मी ते १४० मी खोलीपर्यंत विस्तारते. बेसाल्टमधील पाणी सांधे आणि फ्रॅक्चरमध्ये आढळते. हवामानाची परिस्थिती आणि सांधे आणि फ्रॅक्चरची तीव्रता यावर अवलंबून जलचर परिस्थिती निश्चित केली जाऊ शकते. डेक्कन ट्रॅप्समधील पाण्याच्या पातळीत खोली खोदलेल्या विहिरींमध्ये २ मी ते १५ मी आणि बोअरवेलमध्ये १० मी ते ९० मी दरम्यान असते. बेसाल्ट कठोर आणि संक्षिप्त असतात आणि कोणत्याही प्राथमिक सच्छिद्रता नसतात, दुय्यम सच्छिद्रता बेसाल्टमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
ऐतिहासिक:
आई तुळजाभवानी ही धाराशिव कुलस्वामीनी म्हणून मानली जाते.तुळजाभवानीचे हे देवस्थान देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे. तसेच धाराशिव शहरालगत असलेले हातलाई देवीचे मंदिर प्रसिध्द आहे. श्रीदत्त मंदिर संस्थान, रुईभर हे धाराशिवपासून 15 किमी अंतरावर दत्त महाराजांच एक अतिभव्य मंदिर आहे. त्यातील बांधकाम काळयापाषणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम आहे. धाराशिव शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जिल्हयातील नळदूर्ग येथील जलदूर्ग आणि परंडा भूईकोट किल्ला प्रसिध्द आहे. नळदूर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा प्रसिध्द आहे. हा किल्ला बोरी नदीला खंदक समजून त्यानुसार बांधलेला असून येथील जलमहाल हा वास्तूशास्ञाचा उत्कृष्ट नमुना आहे. नळदूर्ग जवळील अणदूर येथील खंडोबाचे मंदिर तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर, डोमगांव येथील कल्याण स्वामीचे मंदिर प्रसिध्द आहेत.
भूजल मूल्यांकन:
2020-2021 या वर्षासाठी जिल्ह्याचा भूजल संसाधन अंदाज काढण्यात आला. जिल्ह्यातील एकूण 42 पाणलोट क्षेञापैकी 08 पाणलोट क्षेञ हे अंशत: शोषीत व 34 पाणलोट सुरक्षित श्रेणीत येतात.
भूजल गुणवत्ता:
वातावरणातील पाण्यात विरघळणारे विविध वायू आणि आयन यांची सांद्रता, मातीचा स्तर आणि खनिजे आणि खडक हे पाण्याचे वैशिष्ट्य आहेत. हे शेवटी भूजलाची गुणवत्ता ठरवते. पाण्यातील विविध रासायनिक घटकांचा मानवाच्या जैविक व्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पिण्याच्या उद्देशाने भूजलाची उपयुक्तता निश्चित केली जाते. पिण्याच्या पाण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने प्रस्तावित केलेली मानके) पिण्याच्या उद्देशासाठी भूजलाची योग्यता ठरवण्यासाठी वापरली जातात. रासायनिक आणि बॅक्टेरियोलॉजिकल पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने प्रयोगशाळेद्वारे तपासले जातात. एक जिल्हास्तरीय NABL आधीस्वीकृती पाणी गुणवत्ता प्रयोगशाळा जिल्हा मुख्यालयात आहे. NABL Recognition मान्यताप्राप्त तीन उपविभागीय प्रयोगशाळा जिल्ह्यात तहसील स्तरावर आहेत. उमरगा, परंडा व वाशी ही त्यांची नावे आहेत. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जातात.
भूजल संवर्धन आणि कृत्रिम पुनर्भरण :
जिल्ह्यातील विविध जलसंधारण विभागामार्फत जिल्ह्यात भूजल संवर्धन प्रस्तावित आहे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जलसंधारणाचे काम हाती घेतले आहे आणि जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतासाठी कृत्रिम पुनर्भरण रचना प्रस्तावित आहे.