हिंगोली जिल्हा
प्रस्तावना:
०१ मे १९९९ रोजी परभणी जिल्हयाचे विभाजन करुन हिंगोली जिल्हयाची निर्मिती झाली. मराठवाडा व विदर्भास जोडणारा हिंगोली हा महत्वाचा जिल्हा होय. महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणाऱ्या जिल्हयामध्ये हिंगोली जिल्हयाचा चौथा क्रमांक लागतो तसेच लोकसख्येच्या दृष्टिकोणातुन सर्वात कमी लोकसंख्या असणाऱ्या जिल्हयांपैकी एक होय.
स्थान-
हिंगोली जिल्हा १९०१४ ते २०००१ उत्तर अक्षांश व ७६०१६ ते ७७०२८ पुर्व रेखांश मध्ये वसलेला आहे. हिंगोली हा मराठवाडयाचा भाग असून तो पश्चिमेला परभणी जिल्हा उत्तरेला बुलढाणा, पुर्वेस यवतमाळ व वाशिम तर दक्षिणेस नांदेड या जिल्हयांनी वेढलेला आहे. जिल्हयातील पाचही तालुके हे शाश्वत पर्जन्यमानाच्या प्रदेशात येतात. जिल्हयाची सपाटीपासुन सरासरी उंची ५०० ते ६०० मिटर इतकी आहे. समुद्र सपाटीपासुन सरासरी 500 ते 600 मिटर इतकी आहे.
हिंगोली जिल्हयाचे क्षेत्रफळ ५ तालुक्यांमध्ये विभागले असून त्या मध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार ७११ गावे आहेत. जिल्हयामध्ये ३ नगर परिषद, २ नगर पंचायत, ५ पंचायत समिती व ५६३ ग्राम पंचायत आहेत.
लोकसंख्या :-
हिंगोली जिल्हयाची लोकसंख्या सन २०११ जनगणनेनुसार ११७७३४५ लक्ष एवढी आहे. त्यापैकी ०९.९८ लक्ष (८४.४० %) लोकसंख्या ग्रामिण भागातील आहे.
हवामान व पाऊस :-
हिंगोली जिल्हयात मुख्यत्वे नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासुन पाऊस पडतो. मान्सूनच्या पर्जन्यमानास साधारणतः जूनच्या दूसऱ्या आठवडयात सुरुवात होते व सप्टेंबर अखेर पर्यंत पाऊस असतो. साधारणतः ८३% पाऊस जुन ते सप्टेंबर महिण्यात पडतो. जिल्हयात नैऋत्य मोसमी वाऱ्याखेरीस ऑक्टोबर व नोव्हेंबर महिण्यात मोसमोत्तर पाऊस पडतो. जुलै महिना हा सर्वाधिक पावसाचा महिना म्हणून गणला जातो. जिल्हयामध्ये सर्वसाधारण पर्जन्यमान (Normall Rainfall) ७९०.५८ मी.मी. असून जिल्हयामध्ये मागील १० वर्षाच्या कालावधीमध्ये सन २००८ व २०१८ मध्ये फक्त सरासरी पर्जन्यमान झालेले आहे. अन्यथा उर्वरीत कालावधीमध्ये सातत्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. जिल्हयात सर्वसाधारण ४५ पर्जन्यदिन आढळून येतात जिल्हयातील उत्तर व पश्चिम भाग प्रामुख्याने शाश्वत पर्जन्यमान क्षेत्रात मोडतो यामध्ये सेनगांव, वसमत व औंढा या तालुक्यांचा समावेश होतो. उत्तरे कडील उर्वरीत हिंगोली तालुका व पुर्वे कडील कळमनुरी आवर्षण प्रवण क्षेत्रात मोडता.
तापमान :-
जिल्हयाचे सर्वसाधारण हवामान कोरडे व उष्ण कटीबंधीय प्रकारात मोडतील अतिशय कडक उन्हाळा व मध्यम स्वरुपाचा हिवाळा व दमट मध्यम स्वरुपाचा पावसाळा अशा प्रकारचे हवामान आढळून येते. जिल्हयाचे कमीत कमी तापमाण १२.६ सेंटीग्रेड व जास्तीत जास्त ४१.९ सेंटीग्रेड असते. जिल्हयाचे सर्वसाधारण हवा कारेडी असून मान्सून कालावधीमध्ये आद्रता वाढल्यामुळे दमट पणा जाणवतो. हिवाळयाचा कालावधी मुख्यत्वे ऑक्टोबर ते फेब्रुवारी असा आहे. हिवाळयात तापमान १२.६ इतके खाली उतरते. माहे मार्च ते जुन हा कालावधी कडक उन्हाळा असतो.
भूविज्ञानः-
जिल्हयातील ९३% भाग बेसाल्ट या अग्नीजन्य खडकाने व्यापला आहे उर्वरीत ७% भाग गाळाच्या थराने व्यापलेला असून त्यामध्ये पूर्णा व पैनगंगा नदीच्या परिसरातील भागाचा समावेश होता. त्याखालील भुस्तर हा बेसाल्ट खडकाचा आहे. जिल्हयाच्या भुजलाचा अभ्यास करुन असे आढळले की, भूर्गभातील बेसाल्ट खडकाच्या विघटनामुळे तयार झालेला विघटीत बेसाल्ट सांधी / भेगा असलेला खडक हे मुख्य जलधारक स्तर आहे. जिल्हाचा ३०% भाग पुर्णा नदी व ३०% भाग कयाधू नदीच्या खोऱ्यात येत असून सेनगांव व हिंगोली तालुक्यांमध्ये ४०% क्षेत्रा पैनगंगा नदीच्या खोऱ्यात येते.
जिल्हयाच्या सर्व भागात डेक्कन ट्रॅप नावाने ओळखले जाणारे बेसाल्ट खडकाचे आडवे पसरलेले थर पाहावयास मिळते. सामान्यतः आर्थिक दृष्टया महत्वाची खनिजे जिल्हयात आढळून येत नाहीत
भूगोल :
जिल्हा दखन पठारावरील महाराष्ट्र भागाच्या भागातील पुर्व महाराष्ट्र उपविभागाचा भाग आहे. जिल्हयाचा उददेश हा गोदावरी खोऱ्यात येत असला तरी पैनगंगा खोऱ्यातील कयाधु, पुर्णा या उपखोऱ्यात समावेश होतो. समुद्रसपाटी पासुन सर्वसाधारण उंची ५०० मी आहे माळहिवरा परिसरामध्ये ती ५९८ मी. पर्यंत उंच आहे. वसमत परिसरात ती काही ठिकाणी ४०० मी. पर्यंत खाली आहे. माळहिवराऱ्यांची डोंगररांग पैनगंगेचे खोरे वेगळे करते जिल्हयातील दृश्य प्रामुख्याने नैसर्गिक घटकांचा प्रभाव होऊन व झिजेमुळे तयार झालेला अपखंडीत पठारी प्रदेश आहे. हा पठारी प्रदेश उंच सखल असून त्यात नद्यांची खोरी आहे. जलप्रवाहाच्या झिजेमुळे काही ठिकाणी गाळाच्या जमीनी तयार झालेल्या आहेत.
पूर्णा, पैनगंगा व कयाधू या तीन जिल्हयातील प्रमुख नद्यास असून पुर्णा नदी जिल्हयाच्या पश्चिम सिमेवरुन सेनगांव, औंढा (ना) व वसमत या तालुक्यातून दक्षिणेकडे वाहते. नदी काठावर असलेल्या गावांना सिंचनासाठी फायदा होतो.
जलविज्ञान
जिल्हयाच्या ९३ टक्यापेक्षा असुन भुभाग अप्पर क्रिटशीयस ते लोअर इओसन काळातील असुन लावारस थंड होऊन तयार झालेल्या बहुस्तरीय दक्षिणी कातळ खडकाने व्यापरलेला आहे. दक्षिणी कातळ खडकांचे स्तर सर्व साधारणपणे समांतर वडीच्या आकाराचे असतात व त्याची क्षेत्रीय व्याप्ती बरीच मोठी असल्याने पठारी प्रदेश तयार होतात. या थरांची जाडी साधारणपणे ७ ते ४५ मीटर पर्यंत असुन या थरांच्या तळाशी कठीण प्रकारचा छिद्रे व रंद्रे नसलेला, खडक असून वरच्या भागत सच्छिद्र प्रकारचा खडक आढळतो सदर दोन्ही प्रकारचे खडका मध्ये गेरुचा थर आढळतो. या खडकाची भुजल धारण क्षमता ही त्यांच्या विघटनाच्या प्रमाणावर व त्यामध्ये उपलब्ध असलेल्या भेगा व फटी तसेच त्यामधील असलेल्या सांधी (दुय्यम सच्छीद्रता) यावर अवलंबुन असते. भुपृष्ठांवरील सखल भागामध्ये विघटीत आणि भेगायुक्त पाषणामध्ये चांगली भुजल उपलब्धता आढळुन येते या सर्व भूगर्भात खडकाच्या एकुण घनमानाच्या १ ते ३ टक्के व अपवादात्मक परिस्थितीत ५ टक्यापर्यंत भुजल साठा होत असल्याचे भुजल अंदाज अभ्यासाअंती दिसुन येते
हिंगोली जिल्हा प्रामुख्याने पुर्णा, पैनगंगा व कयाधु या नदीने व्यापलेला आहे. सदर नद्या उत्तरे कडुन दक्षिण पश्चिम व दक्षिण-पूर्व वाहतात परिसरात गाळाचा थर आढळतो गाळाच्या प्रदेशात ज्या ठिकाणी वाळुचा थर आढळते त्याप्रदेशात भुजलाची उपलब्धता आढळुन येते. तथापि हा प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने अत्यंत कमी असल्याने त्यामधुन उपलब्ध होणारे भुजल हे अत्यल्प आहे. ज्यामध्ये विघटित व संधीयुक्त बेसाल्ट हा मुख्य जलधारक असुन त्याची भूजल धारण अथवा देण्याची क्षमता त्याच्या एकुण घनमानाच्या १ ते ३ टक्के पर्यंत मर्यादित आहे.
ऐतिहासिक-
प्राचिन काळात वेंगुली, विंग मुल्ह, लिंगोली असा उल्लेख आहे हिंगोली हा एक समृध्द जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात नविन जिल्हयापैकी हिंगोली हा एक जिल्हा आहे. ऐतिहासिक व पौराणिक गोष्टीचे भांडार हया जिल्हयात भरपूर आहेत. निजामकाळामध्ये हिंगोली शहर हे निजामाचे लष्करी तळ होते (सन १९०३). लष्करी तळ असल्यामुळे हे निजामाच्या राज्यातील महत्वाच तसेच प्रसिध्द शहर होते. नागेशम दाउरुकाऊने हे १२ ज्योर्तिलिंगा पैकी
एक पवित्र ज्योतीलिंग हिंगोली जिल्हयातील औंढा येथे स्थित आहे. हिंगोली जिल्हयाला सातवाहन, चालुक्य, यादव, साम्राज्या पासुनचा इतिहास लाभलेला आहे. संत माहात्म्याच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन संत नामदेवांची जन्मभूमी हिंगोली जिल्हयातील नर्सी नामदेव असून त्यांचा जन्म इ.स. १२७० येथे झाला होता. शिखांच्या धर्मग्रथांमध्ये त्यांना मानाचे स्थान असून अंभगाचे प्रेरक मानले जाते. शिख समाजाच्या वतीने नर्सी येथे नवीन गुरुद्वारा बांधण्यात आलेला आहे. संत नामदेवांचे गुरु मानले गेलेले विसोबा खेचर यांचे स्मारक औंढा ना. येथे आहे.
भूजल मुल्यांकन सन २०२३-२०२४
वर्ष २०२३-२०२४ च्या भूजल अंदाज अहवाला नुसार जिल्हयाची निव्वळ वार्षिक मुजल उलब्धता ९७७७९.३८ कोटी लिटर असुन सर्व उपयोगा करीत भुजलाचा उपसा ३८४४८.७७
कोटी लिटर आहे. यामध्ये भविष्यातील सिंचना करीता भूजल उपलब्धता ९७७७९ ३८ कोटी लिटर इतका आहे. जिल्हयात ४३७७० (२०२२-२३) सिंचन विहिरी व विंधन विहिरीद्वारे सिंचनासाठी उपसा केला जातो. भुजल निव्वळ उपलब्धता व उपसा यांचे प्रमाणानुसार जिल्हयाची भुजल विकासाची स्थिती ३६ ३४% पर्यंत पोहचली आहे सिंचन विषयक वाढत्या गरजांमुळे जिल्हयातील विहिरी व विंधन विहिरींच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
भूजल गुणवत्ता
पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, हिंगोली कार्यालयाच्या अधिनस्त ०१ जिल्हा प्रयोगशाळा हिंगोली तर ०३ उपविभागीय प्रयोगशाळा वसमत, कळमनुरी व सेनगांव हया कार्यरत आहेत.
कार्यरत प्रयोगशाळां मध्ये जिल्हयातील ग्राम पंचायत अंतर्गत असलेली गावे/वाडी वस्ती मधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांच्या पाणी नमुन्यांची जलसुरक्षकां मार्फत वर्षातुन 01 वेळा रासायणीक (१५ घटकांची तपासणी करण्यात येते व तर वर्षातून ०२ वेळा जैविक (०२ घटकांची तपासणी करण्यात येते) तपासणी करण्यात येते.
रासायणीक तपासणीअंती मुख्यत्वे T.D.S., Fluoride, Nitrate, Iron हे घटक मानवी शरीरास घातक असून तपासण्यात आलेल्या २१५९ पाणी नमुन्यांपैकी ०६ गावातील ०८ पाणी नमुने T.D.S. घटकाने बाधित, १४१ गावातील २०९ पाणी नमुने Fluoride घटकाने बाधित, २१० गावातील ४३० पाणी नमुने Nitrate घटकाने बाधित तर २४ गावातील ३३ पाणी नमुने Iron घटकाने बाधित असल्याचे आढळुन आले आहे.
तर एकुण ३१२५ पाणी नमुने जैविक तपासणी करीता प्रयोगशाळेत प्राप्त झालेली असून त्यापैकी २७५९ पाणी नमुने पिण्या योग्य तर ३६६ पाणी नमुने जैविक दृष्टया पिण्या अयोग्य असल्याचे आढळुन आले आहे.
जैविक तपासणीअंती दुषित असलेल्या पाणी नमुन्यांची माहिती तालुकास्तरीय समिती व ग्राम पंचायतस्तरावर कळविण्यात आलेली आहे दुषित स्त्रोतांमध्ये योग्य ते शुध्दीकरण करुन सर्वसाधारण जनतेस शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्या बाबत कळविण्यात आलेले आहे.
भूजल संवर्धन आणि कृत्रिम पुनर्भरण :-
भूजल पुनर्भरण काळाची गरज आहे. प्रस्तुत विभागा तर्फे जिल्हयात शासनाने ठरवून दिलेल्या विविध योजनांमध्ये पुर्णपणे सहभाग घेवून भूजल पातळी उंचावणे व भूजल पुनर्भरण करण्याच्या दृष्टीने १००% उददीष्ट साध्य केले आहे. प्रामुख्याने खालील योजनांद्वारे पुनर्भरणाची कामे करण्यात आली.
१) जलजीवन कार्यक्रम २) जलयुक्त शिवार अभियान 3) कॅच द रेन ई.
वरील सर्व उपाययोजना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविणे करीता हाती घेण्यात आल्या त्यात नाला खोलीकरण, रिचार्ज शॉफट, जलभंजन इत्यादी स्त्रोत पुनरुजीवनाची कामे करण्यात येतात. गावातील पाण्याचा ताळेबंद मांडुन कोणत्या उपाययोजना हाती घ्यायच्या या बाबतीत गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते.
जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत वर्ष २०२२-२०२३ मध्ये एकूण ३२ गावांमध्ये १६० उपाययोजना (रिचार्ज शॉफट) करण्यात आल्या होत्या वरील सर्व उपाययोजनां पासुन १.६ कोटी लिटर एवढा पाणी साठा भूगर्भात निर्माण होणार आहे. हिंगोली जिल्हयात वर्ष २०२३-२०२४ मध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत एकूण ७१ गावांमध्ये ३९७ उपाययोजना (रिचार्ज शॉफट) करण्यात आल्या, वरील सर्व उपाययोजनां पासुन ३९.७ कोटी लिटर एवढा पाणी साठा भूगर्भात निर्माण होणार आहे.
भूजलाचा अतिउपसा रोकणे तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची शाश्वतता वाढविणे करीता भूजल अधिनियम २००९ चे कार्यशाळा जिल्हयात आयोजित करण्यात आल्या होत्या. नविन कायद्याअंतर्गत विंधन विहिरींच्या खोलीवर घालण्यात आलेली मर्यादा, भूजलाचा व्यावसायीक वहन, भूजल प्रदुषित करणे इत्यादी बाबींवर मागदर्शन करण्यात आले.
भूजल संबधीत समस्या –
हिंगोली जिल्हा शास्वत पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडतो. जिल्हयातील सर्व २३ पाणलोट, सुरक्षीत वर्गवारीत मोडतात. जिल्यातील ५ तालुक्यातील २३ पाणलोट क्षेत्रात निश्चित करण्यात आलेल्या ५० निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीचा अभ्यास केला असता असे निदर्शनास येते की, जिल्हयातील सरासरी भूजल पातळी खालावत आहे. पुर्वीचा भूजलाचा वापर व वर्तमानातील भूजलाचा वापर यामध्ये शेकडो पटटीने वाढ झाली आहे. यात मुख्यत्वे सिंचना करीता भूजलाचा वापर वाढला आहे. या सर्वांचा परिणाम पाणलोटाच्या विकासाच्या टक्केवारीवर पडतांना दिसून येतो. जिल्यामध्ये पाणी गुनवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम अंतर्गत केलेल्या पाणी नमुण्यांचे तपासणी अंती सेनगाव, हिंगोली व कळमनुरी तालुक्यातील काही गावे फ्लोराईड घटकाने बाधीत असल्याचे आढळुन आले आहे, तसेच वसमत तालुक्यातील काही भाग नायट्रेट घटकाने प्रभावीत आहे.
विशेष भूवैज्ञानिक वैशिष्टे –
जिल्ह्यामध्ये भूवैज्ञानिक दृष्टिकोणातून रेड बोल (Red bole) भूभाग विशेस करून सर्वत्र आढळुन येतो. दोन लावाफ्लोच्या दरम्यान ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे सर्वत्र पसरलेली एक प्रकारची राख असते.