भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, कोंकण विभाग
- प्रशासकीय रचना–
विभागीय रचनेनुसार कोंकण या प्रशासकीय विभागाकरीता स्वतंत्र उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, कोंकण विभाग या कार्यालयाचे कामकाज दिनांक 01 जून 1984 पासून कोंकण भवन, सी.बी.डी.बेलापूर, नवी मुंबई येथे सुरू झाले. कॊकण विभागामध्ये अंतर्भूत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये विभागातील कामकाज चालते. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, कॊकण विभागातील कार्यालयांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
कार्यालयाचे नाव | पत्ता | दुरध्वनी क्रमांक | इमेल आय डी |
उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, कोंकण विभाग, नवी मुंबई | रुमनं. 709, सातवा मजला, कोंकण भवन, सी.बी.डी. बेलापुर, नवी मुंबई. 400614 | 022-27572457 | konkandd@gmail.com |
वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, ठाणे | 5 वा मजला, नियोजन भवन इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे (प) 400601 | 022-25333109 | gsdasgthane@gmail.com |
वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पालघर | 201, प्रशासकीय कार्यालय इमारत, अ, पालघर-बॊईसर रॊड, कॊळगाव, ता. जि. पालघर 401404 | 02525-256656 | gsdapalghar@gmail.com |
वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रायगड. | दुसरा मजला, नगरपरिषद–अलिबाग नविन प्रशासकिय इमारत, रायगड, अलिबाग – 402201 | 02141-222178 | gsdaraigad@gmail.com |
वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रत्नागिरी | क–हाडे ब्राम्हण संघ इमारत, सदाचार मंदिर, शेरे नाका, झाडगाव, रत्नागिरी–415612 | 02352-222671 | gsdaratnagiri@gmail.com |
वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सिंधुदूर्ग | दालन क्र.311, दुसरा मजला, बी. ब्लॉक. प्रशासकिय भवन, सिंधुदुर्ग, ओरोस – 416812 | 02362-228713 | srgeologistoros@gmail.com |
मुंबई शहर व उपनगर हा पूर्णत: शहरी भाग असल्याने या जिल्हयांकरिता स्वतंत्र कार्यालय नाही. शासन, संचालनालयाकडील सूचनांनुसार जिल्हा कार्यालयांचे कामकाजावर नियंत्रण व मार्गदर्शन तसेच प्रशासकीय सनियंत्रण विभागीय कार्यालयाकडून केले जाते.
- भौगोलिक / भूपृष्ठीय रचना –
- स्थळ निर्देशांक -72°75’ ते 74°45’ पूर्वेकडे व 15°30’ ते 20°20 उत्तरेकडे.
- समुद्र तट लांबी – 720 कि.मी.
- पूर्व पश्चिम लांबी – 65 किमी.
- समुद्र सपाटीपासून उंची – 1425.50 मी. (हरीश्चंद्र गड)
- विभागातील एकूण जिल्हे (5) व तालुके (47)– पालघर (8), ठाणे (7), रायगड (15), रत्नागिरी (9), सिंधुदूर्ग (8).
- एकूण गावे – 5681
- 2011 नुसार लॊकसंख्या (मुंबई शहर व उपनगर मिळून) – 2,87,39,397
- सरासरी पर्जन्यमान – 2961.5 मिमि.
- एकूण पाणलॊटांची संख्या – 82 (सर्व सुरक्षित)
- निरीक्षण विहीरी – नियमित 245, जलस्वराज्य – 4939
- जलवेधशाळा – अंजरुण, ता. खालापूर, जिल्हा – रायगड.
- भूस्तर – मुख्यत्वे – बेसॉल्ट
- सीमा – पूर्वेकडे सह्याद्रीच्या डॊंगररांगा, पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेकडे गुजरात राज्य व दक्षिणेकडे गॊवा व कर्नाटक राज्य.
भूस्तररचनेनुसार विभागाचे मुख्यत्वे तीन भागांमध्ये वर्गीकरण करता येते.
अ. क्र. | प्रदेश | समाविष्ट तालुके |
1 | डोंगराळ प्रदेश | पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हाचा पूर्वेकडील भूभाग |
2 | मध्यम उताराचा पठारी प्रदेश | मुख्यत्वे पालघर, ठाणे व रायगड जिल्हयातील डोंगराळ प्रदेश व किनारपटटीचा प्रदेश मधील भूभाग |
3 | किनारपटटीचा प्रदेश | पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हाचा पश्चिमेकडील भूभाग. विभागास सुमारे 720 कि.मी. लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे. |
- भूशास्त्रीय रचना :- महाराष्ट्र राज्याचा बहुतांश भूभाग बेसाल्ट खडकांनी व्यापलेला असला तरी कोकण विभागातील भूभाग बेसाल्ट खडकाशिवाय अतिप्राचिन आर्कियन आणि कलादगी या प्रकारच्या रुपांतरीत खडक तसेच वालुकामय आणि जांभ्या खडकांनी व्यापलेला आहे. यात प्रामुख्याने आर्कियन खडकामध्ये मुख्यताः ग्रॅनाईट नाईस, फ़ेरोजिनस क्कॉर्ड्झाइटस, सॅडस्टोन आणि शेल आढळून येतात. यामध्ये जांभा खडक डोंगरमाथ्यावर सर्वसाधारणपणे तीन ते तीस मिटर खोलीपर्यत आढ्ळून येतात. ऊर्वरित भूभाग तसेच दक्षिणेकडील काही भाग़ हा धारवार आणि कलादगी सेरीज नावानी ओळखल्या जाणा-या रुपांतरित थरांनी व्यापलेला आहे.
- मुख्य नद्या– कोंकण विभागातील नद्या पश्चिमवाहीनी आहेत. सहयाद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये उगम पावून या नद्या अरबी समुद्रास मिळतात. त्यामुळे या नदयांची लांबी अत्यंत कमी आहे.
पालघर – वैतरणा, दहेरजा,पिंजाळ, सूर्या, तानसा.
ठाणे – वैतरणा, उल्हास.
रायगड – पाताळगंगा, अंबा, कुंडलिका
रत्नागिरी – सावित्री, वासिष्ठी, शास्त्री, जगबुडी,काजळी, बाव,मुचकुंदी, जैतापूर.
सिंधुदूर्ग – वाघॊटन, देवगड, गड, कर्ली, आचरा, तेरेखॊल.
- भूजल उपलब्धता – डोंगराळ भागामध्ये लॅटराईट खडक मोठ्या प्रमाणात उंचीवर असून यामध्ये जलधारण क्षमता खूपच कमी आहे. या क्षेत्रात पावसाचे पाणी भूपृष्ठावरुन अधिक प्रमाणात वाहून जाते. या क्षेत्रात भूगर्भात मुरणाऱ्या पाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच पठारी क्षेत्रात भूगर्भातून मुरणाऱ्या पाण्याचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे असून तेथील भूजलाचा वापर हंगामी स्वरुपाचा राहतो. ग्रॅनाईट व वालुकामय आणि रुपांतरित खडकामध्ये प्रामुख्याने चिरा व फ़टीव्दारा भूजल उपलब्धता असल्याचे दिसून येते.
एकंदरीतच भूपृष्टीय संरचनेमध्ये प्रामुख्याने अस्तित्वात असलेला उघडा कठीण बेसाल्ट, जमिनीचा तीव्र उतार व ओढया नाल्यांत निसर्गत: वाहून जाणारा प्रवाह (BASE FLOW) जास्त प्रमाणातील म्हणजेच साधारण 90% पेक्षा जास्त अपधाव (Run Off). या नैसर्गिक घटकांमुळे विभागामध्ये भूजल पुर्नभरणमध्ये मर्यादा असून भूजल पाणी पातळीत घट होते.
पडणा-या पावसापैकी 80% पेक्षा जास्त पाणी जमीनीवरुन वाहून जाते. जमीनीतील तसेच जमिनीवरील उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करुनसुध्दा जास्तीत जास्त 30% जमीन ओलीताखाली येऊ शकेल त्यानुसार 70% अधिक क्षेत्रातील शेती पावसावर अबलंबून आहे.
- यंत्रणेचे कामकाज –
- सखोल भूजल सर्वेक्षण
- भूजल मुल्यांकन-
महाराष्ट्र राज्यामध्ये भूजल स्थिती जाणून घेण्यासाठी पाणलॊट क्षेत्र निहाय भूजल मूल्यांकन करण्यात येते. सदरचे भूजल मूल्यांकन केंद्रीय
भूमीजल मंडळ व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात येते. सन 2023 पासून पाणलॊट क्षेत्राचे भूजल
मूल्यांकन दरवर्षी करण्यात येते.
- उद्भव स्थळनिश्चिती
- ग्रामीण पाणी पुरवठा कार्यमक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनांअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येतात. या योजनांकरिता शाश्वत पाणी पुरवठा उपलब्ध होणेकरिता विहिरींचे स्थळनिश्चितीकरण कामी सर्वेक्षणांती शिफारस करण्यात येते.
- याचप्रमाणे वैयक्तिक लाभार्थींसाठी सिंचनासाठी विहिरींकरिताही स्थळनिश्चितीकरण कामी सर्वेक्षणांती अथवा भूजल उपलब्धता माहितीचे आधारे शिफारस करण्यात येते.
- खाजगी मागणी अंतर्गत स्थानिक भूजल सर्वेक्षण करून पिण्याच्या पाण्यासाठी अर्जदारास 2500/- रूपये शुल्क आकारून विहिर/ विंधण विहीर स्थळनिश्चिती कामी सर्वेक्षणांती शिफारस करण्यात येते.
- आपत्कालीन परिस्थितीमध्ये भूस्खलन, जमिनीतून गरम पाण्याचा प्रवाह निर्माण होणे, भूकंप इ. प्रकरणांमध्ये सर्वेक्षणांती जिल्हा आपत्कालीन विभागास तांत्रिक सल्ला देण्यात येतो.
- वाळू उत्ख्नन तसेच नागरी क्षेत्रातील घनकचरा प्रकल्पांसाठी संयुक्त सर्वेक्षणांती तांत्रिक सल्ला देण्यात येतो.
- भूजल पुर्नभरण योजना राबविणेकामी तांत्रिक सल्ला देण्यात येतो.
- सर्वांना माहिती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जलविज्ञान विषयक आधार सामुग्री उपभोक्ता गटाची (HDUG) जलविज्ञान प्रकल्पांतर्गत नोंदणी करण्यात येत असून उपभोक्त्यास सशुल्क माहिती उपलब्ध करून देण्यात येते.
- अंजरूण, तालुका- खालापूर जिल्हा- रायगड येथे जलवेधशाळा स्थापन करण्यात आली. या जलवेधशाळेमार्फत सिंचनासाठी वापरण्यात येणारे भूपृष्ठीय पाणी व त्याचा भूजलाशी असणारा संबंध यांच्या संयुक्तिक अभ्यासाचे कार्य होत आहे.
- निरिक्षण विहिरीतील पाणी पातळीच्या नोंदी व संभाव्य टंचाई अहवाल– ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील दिनांक 8 एप्रिल, 1994 चा शासन निर्णय तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडील दिनांक 3 फेब्रुवारी, 1999 चा शासन निर्णयामधील तरतुदी व मार्गदर्शक सूचनांचे आधारे प्रतिवर्षी माहे ऑक्टोंबर मध्ये मान्सून पर्जन्यमान व स्थिर भूजल पाणी पातळी यांचे तुलनात्मक अभ्यासाअंती जिल्हयाचा संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई अहवाल तयार केला जातो. सदर अहवालास जिल्हाधिकारी यांचे मान्यतेअंती जिल्हयामध्ये निकषानुसार पाणी टंचाई घोषित करण्यात येते. संबंधीत जिल्हा परिषदेकडून टंचाई निवारण कार्यक्रम राबविण्यात येतो.
- स्त्रोत बळकटीकरण योजनांमध्ये सहभाग.
- भूजल पुनर्भरण प्राधान्यक्रम नकाशे – यंत्रणेच्या संकेतस्थाळावर उपल्ब्ध आहेत.
- पाणी गुणवत्ता तपासणी– भूजलाची गुणवत्ता तपासणीसाठी विभागीय स्तरावर प्रयोगशाळा स्थापित करण्यात आल्या आहेत. यामध्ये विभागामधून संकलित करण्यात आलेल्या पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक गुणवत्ता तपासणी करण्यात येते.
प्रयोगशाळा स्तर | प्रयोगशाळांची संख्या | स्वतंत्र शासकीय इमारतीमध्ये कार्यरत | आरोगय विभागाचे आवारात कार्यरत | खाजगी इमारतीमध्ये कार्यरत | NABL प्रमाणित |
विभागीय | 1 | 1 | 0 | 0 | 1 |
जिल्हा | 4 | 3 | 0 | 1 | 4 |
उपविभागीय | 18 | 0 | 9 | 9 | 18 |
- कॊकण विभागातील महत्त्वाची वैशिष्ट्ये – महाराष्ट्रात कॊकण हे प्रमुख पर्यटन क्षेत्र आहे. सांस्कृतिक वारसा, निळाशार समुद्र किनारा, हिरवळ, लाल माती, कौलारू घरे, प्राचिन मंदिरे, गरम पाण्याचे झरे, सागरी किल्ले यामुळे नैसर्गिक रित्या कॊकण अतिशय समृद्ध आहे.
- कॊकण विभागाला पश्चिमेकडे समुद्रकिनारा लाभला आहे. भारताचे प्रवेशद्वार असलेले मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर तसेच जवाहरलाल नेहरू बंदर हे प्रमुख बंदर आणि न्हावा शेवा, श्रीवर्धन, हर्णे दाभॊळ, रत्नागिरी, जयगड, विजयदुर्ग, देवगड, मालवण व वेंगुर्ला अशी बंदरे आहेत. त्यामुळे मासेमारी व्यवसाय मॊठ्या प्रमाणात आहे.
- अतिवृष्टीचा प्रदेश असल्याने या ठिकाणी प्रमुख पिक भात हे आहे. तसेच नाचणी, कुळीथ, तूर, वाल अशी पिकेही घेतली जातात. तसेच नारळ, सुपारी, आंबा, फणस, काजू, कॊकम याची लागवड प्रामुख्याने केली जाते.
- प्रमुख अन्न मासे व भात हे आहे.
- मुरुड जंजिरा व सिंधुदूर्ग किल्ला असे सागरी किल्ले तसेच किल्ले रायगड, कुलाबा, रेवदंडा, कॊलॊई, खांदेरी, वसई, कर्नाळा,बाणकॊट,सुवर्णदुर्ग, गॊपाळगड, जयगड, रत्नदुर्ग, पूर्णगड, विजयदुर्ग असे ऐतिहासिक किल्ले आहेत.
- जगप्रसिद्ध वारली कला, पारंपारीक दशावतार नाट्यकला व इतर क्षेत्रातील अनेक कलांचा वारसा लाभला आहे.
- माथेरान, जव्हार, आंबॊली, माळशेज घाट इ. थंड हवेची ठिकाणे आहेत.
- डहाणू व बॊर्डी, तारकर्ली, तॊडवली, अलिबाग. किहिम, हरीहरेश्वर, गणपतीपुळे, आंजर्ले, चिवला, मिठबाव, वरसॊली, श्रीवर्धन ,दिवेआगार, वेंगुर्ला, सागरेश्वर, कुणकेशवर असे अनेक समुद्र किनारे आहेत.
- ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये गरम पाण्याचे झरे आहेत.