GSDAGSDAGSDA

Nashik

 

नाशिक विभाग हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सहा विभागांपैकी एक आहे आणि त्याला उत्तर महाराष्ट्र म्हणूनही ओळखले जाते. तापी नदीच्या खोऱ्यातवसलेला ऐतिहासिक खान्देश प्रदेश विभागाचा उत्तरेकडील भाग व्यापतो. नाशिक विभागाच्या पश्चिमेला कोकण विभाग आणि गुजरात राज्य, उत्तरेस मध्य प्रदेश राज्य, पूर्वेस अमरावती व मराठवाडा विभाग आणि दक्षिणेस पुणे विभाग आहे. नाशिक प्रदेश १९ ५१’ २१ ४६’ उत्तर अक्षांश आणि ७५ ५७’ व ७८ २७’ पूर्व रेखांश दरम्यान आहे.

नाशिक विभागात नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर या 5 जिल्ह्यांचा समावेश होत असून विभाग अंशतः तापी खोऱ्यात आणि अंशतः गोदावरी खोऱ्यात येतो. 2001 च्या जनगणनेनुसार त्याचे क्षेत्रफळ 57426 चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या 185.77 लाख आहे. यामध्ये 6719 वस्ती गावे आणि 4969 ग्रामपंचायती आहेत.

. क्र.जिल्हाक्षेत्रफ़ळतालुकापंचायत समित्याग्राम पंचायतगावेलोकसंख्या
1नाशिक1552915151383196061.07
2धुळे7185040454168220.50
3नंदूरबार5955060659593816.48
4जळगाव1176515151150153842.29
5अहिल्यानगर1704814141300160145.43
 एकूण57426545449696719185.77

भूगोल

नाशिक विभागात सह्याद्री आणि सातपुडा या दोन प्रमुख पर्वतरांगा आहेत. सह्याद्री पर्वतरांग उत्तर दक्षिण असून विभागाच्या पश्चिम भागात आहे तर सातपुडापर्वत रांगा विभागाच्या उत्तर भागात पूर्व-पश्चिम आहे. मुख्य सह्याद्री पर्वतरांगेच्या सेलबारी, सातमाळा आणि अजिंठा या तीन प्रमुख उप पर्वत रांगा आहेत.

विभागात प्रामुख्याने गोदावरी खोरे आणि तापी खोरे यांचा समावेश होतो. गोदावरी, तापी, गिरणा, प्रवरा, भीमा, सीना, मुळा आणि मुठा या प्रमुख नद्या आहेत.

पाऊस

प्रदेशात पर्जन्यमानात स्थळ काळा परत्वे मोठ्या प्रमाणात भिन्नत व विचलन आढळुन येते, ज्याच्यावर भुपृष्ठीय संरचनेचा जोरदार प्रभाव पडतो. विभागाच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांगांच्या भागात 3000 मिमी पर्यंत मुसळधार पाऊस पडतो. उत्तरेकडीलसातपुडापर्वतरांगाच्या भागात 1800 मिमी पर्यंत पाऊस पडतो. विभागाच्या मध्य भागात सरासरी 700 – 800 मिमी पाऊस पडतो, तर पूर्व आणि दक्षिण-पूर्व भागात सरासरी 550 मिमी पाऊस पडतो. विभागातील जास्तीत जास्त तालूके हे अवर्षण प्रवण क्षेत्रांतर्गत येतात.

भूशास्त्र

विभागाचा बहुतांश भूभाग हा बेसॉल्टिकलाव्हाच्या प्रवाहाने एकसारख्या दगडाने व्यापलेला आहे, ज्याला डेक्कनट्रॅप म्हणतात. हे खडक क्रिटेशियसइओसीन कालावधी दरम्यान लाव्हा उद्रेकाच्या फ़िशर प्रकाराने बनल्याचे मानले गेले आहेत. डेक्कनट्रॅपचे वय सुमारे 45 दशलक्ष वर्षे असून, काही मीटर ते 30 मीटर जाडीच्या प्रत्येक लावा प्रवाहाचा समावेश असलेल्या पठाराच्या भूभागाला जन्म देणा-या सपाट टेकड्यां पासून बनलेला आहे. वैयक्तिक लाव्हा प्रवाह तीन भागात विभागला जाऊ शकतो. 1) वरचा अमिग्ड्युलर भाग  2) मधला वेसिक्युलर भाग आणि 3) तळाशी कठीण पाषाणाचा भाग. यातील भेगा या झिओलिटिक गट, स्टिलबाइट, नॅट्रोलाइट, कॅल्साइट आणि क्वार्ट्जच्या इतर प्रकारांच्या दुय्यम खनिजांनी भरलेल्या असतात. (एगेट, ऍमेथिस्ट इ.)

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला तापी नदी काठालगतचा भूभाग हा तापी नदीच्या गाळाने बनलेला असूनसदरील भूभाग हा बझाडाझोन म्हणून प्रसिद्ध आहे. सदर स्थानिक गालाचा भूभाग हा विभागाच्या उत्तरेला पूर्व – पश्चिम तापि नदीच्या काठालगत पसरलेला आहे. असून त्याची खोली भुपृष्ठाच्या खाली 100 ते 125 मीटरपर्यंत जाते. गोदावरी, गिरणा, पांझरा, प्रवरा यांसारख्या प्रमुख नद्यांच्या पातालगतचा भूभाग त्या नद्यांच्या स्थानिक गाळाने बनलेला असून त्याची सरासरी खोली भूपृष्ठाखालीकाही मीटर ते 50 मीटर पर्यंत आहे.

जलविज्ञान

नाशिक विभागात मुख्यत्वेकरूनहार्ड रॉक आणि ॲल्युव्हियम या दोन वेगवेगळ्याजलधारकप्रणाली आहेत.

कठीण खडकातभूजल परस्पर जोडणाऱ्यापुटिका, सांधे, फ्रॅक्चर आणि इतर दुय्यम छिद्रांमध्ये आढळते. भूजल प्राप्त करण्याच्या, रिचार्ज करण्याच्या, साठवण्याच्या आणि प्रसारित करण्याच्या त्यांच्या क्षमतेच्या संदर्भात लाव्हा प्रवाहात खूप भिन्नता आहे. त्यांच्या भूजल उत्पादकतेच्या अनुषंगाने लाव्हा प्रवाहातील फरक त्यांच्या सच्छिद्रता आणि पारगम्यता या त्यांच्या अंगभूत भौतिक वैशिष्ट्यांमुळे उद्भवतात.

विहिरींची सरासरी खोली भूपृष्ठापासून खाली 9-15 मीटर आणि व्यास 4-6 मीटर पर्यंत आहे. पाण्याची पातळी हिवाळ्यात 3-7 मीटर, उन्हाळ्यात 7-14 मीटर आणि साधारणपणे हिवाळ्यात 50 ते 100 घमी/दिवस आणि उन्हाळ्यात 15- 50 घमी/दिवस पर्यंत विहिरींची उत्पादकता आहे.

सर्व प्रमुख नद्यांच्या काठाचा भूभाग हा त्या नध्यांच्या स्थानिक गाळाने बनलेला आहे. गाळाच्या भूभागांपैकीबझाडा झोन हा सर्वात जास्त उत्पादक आणि भूगर्भातील पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे. बझाडाझोनच्या तुलनेत इतर स्थानिक गाळाचे भूभाग उथळ आहेत आणि फारसे उत्पादक नाहीत.

कठीण खडकांमधील विहिरींची सरासरी खोली 5 -20 m bglआणि व्यास 3 – 8 मीटर पर्यंत बदलते. हिवाळ्यात पाण्याच्या पातळीची श्रेणी 2 – 10 मीटर आणि उन्हाळ्यात 6 – 20 मीटर आणि हिवाळ्यात 50 ते 100 m3/दिवस आणि उन्हाळ्यात 15-50 m3/दिवसापर्यंत उत्पादनाची श्रेणी असते.

गाळाच्या भूभागातील विहिरींची सरासरी खोली भुपृष्ठाखाली 15 ते 50 मीटर आहे आणि व्यास 3 ते 6 मीटर पर्यंत आहे. हिवाळ्यात पाण्याची पातळी भुपृष्ठाखाली 15 – 30 मीटर आणि उन्हाळ्यात 30 – 45 मीटरअसते. सदर विहिरींपासून हिवाळ्यात 80 ते 150 m3/दिवस आणि उन्हाळ्यात 55-75 m3/दिवस इतके पाणी उपलब्ध होते. पण आता काही वर्षातया भूभगातीलविहिरींची संख्या खूपच कमी झाली आहे.

बझाडा झोन आणि काही स्थानिक जलोळ भागात फक्त 300 मिमीच्या सरासरी व्यासासह 60 ते 300 मीटरखोली असलेल्या नलिका विहिरीच आढळटत. बहुतेक सर्व नलिका विहिरी हिवाळ्यात 200 ते 300 m3/दिवस आणि उन्हाळ्यात 150 ते 200 m3/दिवस पाणी देतात.

पाणलोट

नाशिक विभागात प्रामुख्याने गोदावरी आणि तापी खोऱ्याचा समावेश होतो. या दोन मुख्य खोऱ्यांव्यतिरिक्त महत्त्वाची खोरे म्हणजे नर्मदा, सीना, भीमा आणि पश्चिम वाहिन्या खोरे.

. क्र.खोरे नावमुख्य पाणलोट क्षेत्रे संख्यासमाविष्ट जिल्हे
1नर्मदा08नंदूरबार
2तापी163नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक
3पूर्णा – तापी04जळगाव
4गोदावरी87नाशिक, अहिल्यानगर
5भीमा12अहिल्यानगर
6सीना17अहिल्यानगर
7पश्चिम वाहिन्या09नाशिक, अहिल्यानगर
Total300 

भूजलसंसाधन मूल्यमापन हे भूजल स्त्रोतांचे स्त्रोत, व्याप्ती, अवलंबूनता आणि गुणवत्ता यांचे निर्धारण आहे ज्यावर वापर आणि नियंत्रणाच्या शक्यतांचेमूल्यांकनअवलंबून असते. विशेषत: भूजलावरअवलंबून असलेल्या जिल्हा पाणीपुरवठा पायाभूत सुविधांच्या बांधकाम आणि देखभालीसाठी भूजलाचा अंदाज देखील महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील भूजलमूल्यांकनासाठी पाणलोट हा अधिक इष्ट पर्याय म्हणून प्रस्तावित करण्यात आला आहे.

भूजलमूल्यांकनाच्या अचूक अंदाजासाठी, विभाग 300 मुख्य पाणलोटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

. क्र.जिल्हाएकूण पाणलोट क्षेत्रेनिरीक्षण विहिरी (नियमित)निरीक्षण विहिरी (जलस्व– 2)एकूण
1नाशिक8018512601445
2धुळे45107490597
3नंदूरबार2950377427
4जलगाव6616610821248
5अहिल्यानगर8020213271529
एकूण30071043515246

पाण्याची गुणवत्ता

            प्रदेशात पाण्याची गुणवत्तासनियंत्रणासाठीप्रयोगशाळांचे जाळे असून त्याची  प्रादेशिक, जिल्हा आणि उपविभागीयप्रयोगशाळांचा समावेश असलेली त्रीस्तरीय रचना आहे. सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांची पर्जन्य पूर्व व पर्जन्यपश्चातअशी वर्षातून 2 वेळा रासायनिक आणि जैवीकचाचणी केली जाते. सर्व 5 जिल्हा आणि 1 प्रादेशिक प्रयोगशाळाNABL मान्यताप्राप्त आहेत.

प्रयोगशाळा / जिल्हा नाशिकधुळेजळगावनंदूरबारअहिल्यानगरएकूण
विभ्गागीय100001
जिल्हा111115
उपविभागिय6254522
एकूण8365628
Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.